English

फुलाफुलांचे दाट ताटवे, जिथे पोचते दृष्टी रंग मजेचे, रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी... धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू मातीमध्ये जे हात राबती, तयांस देऊ पुष्टी ... - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०८)

i. आकृतिबंध पूर्ण करा. गुण(०२)

 १.

 २. 

  1.   गच्च माजतील राने -
  2.   रुजतील देशी झाडे –

फुलाफुलांचे दाट ताटवे, जिथे पोचते दृष्टी
रंग मजेचे, रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी...

धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू
मातीमध्ये जे हात राबती, तयांस देऊ पुष्टी ...
रंग मजेचे, रंग उद्याचे

उधळू, फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे
गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी ...
रंग मजेचे, रंग उद्याचे

डोंगरातून वाहात येते, खळाळते हे पाणी
फेनधवलशा तुषारांमध्ये, राहाल कैसे कष्टी?
रंग मजेचे, रंग उद्याचे

मिळेल पैसा, मिळेल दौलत, यंत्रांच्या संगती
आभाळाच्या छत्राखाली, एक अनोखी तुष्टी...
रंग मजेचे, रंग उद्याचे

हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या
गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी ...
रंग मजेचे, रंग उद्याचे

ii. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)

अ. दाट ताटवे कशाचे आहेत?

आ. मने कोणत्या रंगाची असावीत?

iii. कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. (०२)

१. सृष्टी - 

२. पुष्टी -

३. वृष्टी -

४. तुष्टी -

iv. काव्यसाैंदय

वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी पर्याय सुचवा. (०२)

Long Answer

Solution

i.

 १.

 २. 

  1. जेव्हा आभाळातून वृष्टी होईल.
  2. जेव्हा डोंगरांवर बिया उधळल्या जातील.

ii. 

अ. दाट ताटवे विविधरंगी फुलांचे आहेत.

आ. मने हिरव्या रंगाची असावीत.

iii.

१. जग

२. दुजोरा, पाठबळ

३. पाऊस

४. तृप्ती

iv.

पावसात न्हाऊन निघालेली, जणू हिरवा शालू नेसलेली वसुंधरा (पृथ्वी) दिवसेंदिवस कुरूप होत चालली आहे. प्रगतिच्या नावाखाली तिचे साैंदर्य ओरबाडले जात आहे. तिचे हिरवेपण जपण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात वृक्षारोपण/वृक्षलागवड आणि वृक्षसंगोपन करण्याची खूप आवश्यकता आहे.
केवळ 'झाडे लावा' असे म्हणून चालणार नाही, तर लावलेली झाडे 'जगवा' असे म्हणावे लागेल. त्याकरता प्रत्येकाने आपल्या नावाने किंवा आपल्या प्रिय व्यक्तीच्या नावाने एकतरी झाड लावून जोपासले पाहिजे. तसेच, झाडापासून बनवलेल्या प्रत्येक वस्तूचा व निसर्गातील साधनसंपत्तीचा जपून व काटकसरीने वापर केला पाहिजे. उदाहरणार्थ, कागद. कागद बनवण्यासाठी झाडे कापावी लागतात. त्यामुळे, कागदाचा योग्य तेवढा वापर करायला हवा किंवा उसाच्या चिपाडापासून बनवलेल्या पर्यायी कागदाचा वापर करून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी व्हायला हवे.
तसेच, वनांसाठी राखीव जागा ठेवणे, इमारतींच्या आवारात शाळा-महाविद्यालयांत झाडे लावणे, पाण्याचा थेंब न् थेंब जपून वापरण्यासाठी कार्यशाळा राबवणे असे उपक्रम घेता येतील. पर्यावरण संवर्धनाशी संबंधित स्पर्धा आयोजित करून लोकसहभागातून वसुंधरेचे संवर्धन व संगोपन करण्याकरता पुढाकार घेता येईल, असे मला वाटते.

shaalaa.com
रंग मजेचे रंग उदयाचे
  Is there an error in this question or solution?
Chapter 12.1: रंग मजेचे रंग उदयाचे - स्वाध्याय

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi (Second Language) 10 Standard SSC
Chapter 12.1 रंग मजेचे रंग उदयाचे
स्वाध्याय | Q २. अ.

RELATED QUESTIONS

कवितेच्या आधारे बी रुजण्याच्या क्रियेचा ओघतक्ता तयार करा.


आकृती पूर्ण करा.


वाक्य पूर्ण करा.

जेथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण- 


वाक्य पूर्ण करा.

कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट-


कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा.

आभाळाचे छत्र-


कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा.

गर्भरेशमी सळसळ-


कृती पूर्ण करा.

‘दौलत’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या
गर्भरेशमी सळसळण्याच्या जगात सांगू गोष्टी’


पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करावे असे कवयित्रीला वाटते.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेच्या कृती सोडवा. गुण (०८)

फुलाफुलांचे दाट ताटवे, जिथे पोचते दृष्टी
रंग मजेचे, रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी...

धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू
मातीमध्ये जे हात राबती, तयांस देऊ पुष्टी...
रंग मजेचे, रंग उद्याचे

उधळू, फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे
गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी...
रंग मजेचे, रंग उद्याचे

डोंगरातून वाहात येते, खळाळते हे पाणी
फेनधवलशा तुषारांमध्ये, राहाल कैसे कष्टी?
रंग मजेचे, रंग उद्याचे

मिळेल पैसा, मिळेल दौलत, यंत्रांच्या संगती
आभाळाच्या छत्राखाली, एक अनोखी तुष्टी...
रंग मजेचे, रंग उद्याचे

हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या
गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी...
रंग मजेचे, रंग उद्याचे

मुद्दे:

१. कवयित्री- (०१)

२. कवितेचा विषय- (०१)

३. कवितेतून मिळणारा संदेश- (०२)

४. कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण- (०२)

५. ओळींचा सरळ अर्थ लिहा. (०२)

धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू

मातीमध्ये जे हात राबती, तयांस देऊ पुष्टी...

६. शब्दांचे अर्थ लिहा. (०२)

१. दृष्टी

२. हात

३. वृक्ष

४. दौलत


खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘रंग मजेचे रंग उदयाचे’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी।
रंग मजेचे, रंग उदयाचे॥’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) ताटवे -
(ii) माजतील -
(iii) आभाळ - 
(iv) रुजतील -

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×