Advertisements
Advertisements
Question
ग्रामीण व नागरी वस्त्यांमधील आंतरक्रिया
Solution
शहरांचे सीमावर्ती प्रदेशातील झालर क्षेत्राला नागरी झालर संक्रमण क्षेत्र म्हणतात, तर ग्रामीण वस्त्यांच्या सीमावर्ती क्षेत्राला ग्रामीण झालर क्षेत्र म्हणतात.
शहरांच्या झालर क्षेत्रात भूमी उपयोजन हे मिश्र भूमी उपयोजन दर्शवते. नागरी प्रदेशाच्या झालर संक्रमण क्षेत्रात काही वेळेस प्रभाव नागरी क्षेत्राचा परंतु भूमी आच्छादन हे ग्रामीण वस्तीत दृश्य असते. कृषिक्षेत्र, वनक्षेत्र, जलक्षेत्र, मोकळी जागा, गायरान असे भूमी आच्छादन असणारा झालर क्षेत्रात हळूहळू नागरी विस्ताराचा प्रभावही दिसू लागतो. शहरांच्या या झालर क्षेत्रात शहरांचा विस्तार होतो, निवासी बांधकाम क्षेत्र वाढते, उद्योग, खाणकाम, शासकीय संस्था, शैक्षणिक संस्था या स्वरूपात भूमी उपयोजनाचे स्वरूप बदलते. त्यामुळेच या झालर क्षेत्रात भूमी आच्छादन हे ग्रामीण स्वरूपाचे, तर भूमी उपयोजन हे नागरी क्षेत्राचे अशा आंतरक्रिया दिसून येतात.
झालर क्षेत्रातील हे संक्रमण नेहमीच स्वेच्छेने आणि सुगमतेने होतेच असे नाही. काही वेळेस झालर क्षेत्रात प्रशासन ग्रामीण क्षेत्राचे आणि विस्तार नागरीक भूमी उपयोजनाचा अशी प्रशासकीय गुंतागुंत निर्माण होते. त्यामुळे ग्रामपंचायत आणि नगरपालिका असा संघर्षही कधी कधी पाहायला मिळतो. संक्रमणाच्या कालखंडात ग्रामीण झालर क्षेत्र हळूहळू आपली ओळख होते. संक्रमण क्षेत्रातील या लोकांना शहरी सेवा-सुविधांची भुरळ पडते. मात्र, तेव्हाच त्यांना आपली ग्रामीण ओळख ठेवायचे असते. मात्र या संघर्षात काळाच्या ओघात हा संक्रमण प्रदेश आपली स्वतःची ओळख हरवून बसतो आणि हे क्षेत्र शहरी क्षेत्रात पूर्णपणे विलीन होऊन जाते. शहरांच्या प्रभावामुळे या संक्रमण क्षेत्रातील जमिनीच्या किमतीही खूप वाढतात आणि एकूणच शहरीकरणाचा वेग या प्रदेशात सर्वाधिक असतो.