Advertisements
Advertisements
Question
गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.
Solution
प्रथिनांची निर्मिती पुढील टप्प्यात होते: (१) प्रतिलेखन (२) भाषांतरण (३) स्थानांतरण. प्रथिनांची निर्मिती DNA वरील जनुकांच्या संकेतानुसार आणि RNA च्या माध्यमातून होते. यालाच प्रथिने निर्मिती सेंट्रल डॉग्मा असे म्हटले आहे.
- प्रतिलेखन:
या प्रक्रियेत DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार m-RNA तयार होतो. यासाठी DNA चे दोन्ही धागे अलग होतात आणि त्यातील एका धाग्यातील न्युक्लिओटाइडच्या क्रमवार रचनेनुसार m-RNA वर न्युक्लिओटाइड्सचा पूरक क्रम येतो. DNA तील थायमिन ऐवजी m-RNA मध्ये युरॅसिलचा अंतर्भाव होतो. प्रतिलेखन पेशीकेंद्रकात होते. मात्र DNA वरील सांकेतिक संदेश घेऊन तयार झालेला m-RNA पेशीद्रव्यात येतो. हा संदेश 'ट्रिप्लेट कोडॉन'च्या स्वरूपात असतो. म्हणजेच प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेला संकेत तीन न्युक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो. - भाषांतरण:
प्रत्येक m-RNA मध्ये हजारो कोडॉन असतात. ठरावीक कोडॉन ठरावीकच अमिनो आम्लांचीच ओळख पटवतात. ही योग्य ती अमिनो आम्ले पुरवण्याचे काम t-RNA करतो. त्याकरिता m-RNA वर जसा कोडॉन असतो, तसाच त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन t- RNA वर असतो. या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात. - स्थानांतरण:
t-RNA चे कार्य पुढीलप्रमाणे असते t-RNA ने आणलेल्या अमिनो आम्लांची पेप्टाईड बंधाने शंखला तयार करण्याचे काम पूर्ण करणे. या दरम्यान रायबोझोम, m-RNA च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक-एक ट्रिप्लेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेस स्थानांतरण असे म्हणतात, प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे _______ म्हणतात.
वेगळा घटक ओळखा.
खालील आकृतीत कोणती क्रिया दाखवली आहे?
खालील आकृतीत कोणती क्रिया दाखवली आहे?
न्यूक्लिओटाईडची जागा बदलणे : उत्परिवर्तन : : रायबोझोमची जागा बदलणे : ____________
व्याख्या लिहा.
भाषांतरण
व्याख्या लिहा.
स्थानांतरण
व्याख्या लिहा.
उत्परिवर्तन
शास्त्रीय कारणे लिहा.
आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात.
जनुकातील एखादे न्युक्लिओटाईड़ अचानक आपली जागा बदलते, यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला ______ असे म्हणतात.