Advertisements
Advertisements
Question
हेन्री फेयॉल यांची 'व्यवस्थापनाची' कोणतीही चार तत्त्वे स्पष्ट करा.
Long Answer
Solution
- कामाच्या विभागणीचे तत्त्व (Principle of Division of Work): या तत्त्वानुसार एकूण कामाचे अनेक छोटे विभाग करावेत. जसे की, तांत्रिक, आर्थिक, व्यावसायिक, सुरक्षाव्यवस्था, लेखा आणि व्यवस्थापकीय इ. कामाची विभागणी ही त्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्यानुसार व कुवतीनुसार करावी. यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता व कौशल्य सुधारते. ज्यामुळे अपेक्षित उत्पादन पातळी साधणे शक्य होते.
- अधिकार आणि जबाबदारीचे तत्त्व (Principle of Authority and Responsibility): व्यवस्थापकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. हाताखालच्या लोकांकडून योग्य प्रकारे काम पूर्ण करून घेणे आवश्यक असते. अधिकार हे कायम जबाबदारीसह येतात. जर व्यवस्थापकाला एखादे काम ठरावीक वेळात पूर्ण करण्याचे अधिकार दिले असतील तर ते काम वेळेत पूर्ण न झाल्यास त्याला जबाबदार धरावे. ध्येयप्राप्तीसाठी काही निर्णय स्वत:च्या जबाबदारीवर घेण्याचे अधिकार व्यवस्थापकाला असावेत.
- शिस्तीचे तत्त्व (Principle of Discipline): फेयॉल यांच्या मते कोणत्याही संघटनेत शिस्त असणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या नियमांचा आदर केला पाहिजे व त्यांचे पालन केले पाहिजे. शिस्तीमुळे संघटनेची उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होते. चांगली शिस्त हा प्रभावी नेतृत्वाचा परिणाम आहे. व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमध्ये संघटनेच्या नियमांबद्दल पूर्ण जाणीव असली पाहिजे. मुलभूत शिस्त व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांत पाळली पाहिजे.
- निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्त्व (Principle of Unity of Direction): ह्या तत्त्वांनुसार प्रत्येक संघटनेत 'एक प्रमुख आणि एकच योजना' असावी. संघटनेतील प्रत्येक गट एकाच उद्दिष्टासाठी काम करत असला पाहिजे आणि या गटाला एकाच व्यवस्थापकाने एकच आराखडा वापरून सूचना दिल्या पाहिजेत.
- मोबदला तत्त्व (Principle of Remuneration): प्रत्येक कर्मचाऱ्याला योग्य तो मोबदला देऊन आर्थिक समाधान देणे तसेच संघटनेत दीर्घ काळासाठी टिकवणे असे या तत्त्वात अभिप्रेत आहे. मोबदल्याचा परिणाम उत्पादकता आणि एकूण कार्यक्षमता यांवर दिसून येतो. कर्मचाऱ्याचा मोबदला निश्चित करताना त्यांचे कौशल्य, अनुभव, ज्ञान, कार्यकाळ, राहणीमानाचा खर्च, बाजारातील कल व संघटनेचा नफा इत्यादी गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.
- आदेशातील एकवाक्यतेचे तत्त्व (Principle of Unity of Command): संघटनेमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला एकाच वरिष्ठाकडून आदेश दिले गेले पाहिजेत. ह्या तत्त्वांमुळे संघटनेतील कर्मचाऱ्यांमधील संघर्ष मिटविण्यास व वादविवाद सोडविण्यास मदत होते. तसेच गोंधळ टाळण्यासदेखील मदत होते. जर एखाद्या कर्मचाऱ्याला एकापेक्षा अधिक वरिष्ठांकडून आदेश दिले गेले तर कोणाच्या आदेशाचे पालन करावे हे न कळल्याने तो कर्मचारी गोंधळून जाईल. हा चुकीचा दृष्टिकोन आहे. यासाठी संघटनेतील पदांचा अनुक्रम स्पष्ट केला पाहिजे. प्रत्येक कर्मचाऱ्यास त्याच्या वारिष्ठांची माहिती असावी आणि फक्त त्यांच्याकडूनच आदेश प्राप्त व्हावेत.
- सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुब्यम स्थान देणारे तत्त्व (Principle of Subordination of Individual Interest to Organisational Interest): या तत्त्वानुसार वैयक्तिक हिताला संघटनेच्या हितापेक्षा कमी महत्त्व दिले पाहिजे. संघटनेमध्ये निर्णय घेताना व्यवस्थापकाने नेहमीच एका कर्मचाऱ्याच्या हिताऐवजी संपूर्ण समूहाच्या हिताचा विचार केला पाहिजे. तसेच कर्मचाऱ्याने देखील स्वत:च्या हितापेक्षा संघटनेचे हित जपले पाहिजे आणि स्वत:च्या हिताला दुय्यम स्थान दिले पाहिजे. उदा. प्रत्येक खेळामध्ये खेळाडूने नेहमी वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक भावनेतून सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत.
- केंद्रीकरणाचे तत्त्व (Principle of Centralization): केंद्रीकरण म्हणजे अधिकार एकवटणे किंवा अधिकारांचे केंद्रीकरण काही संघटनामध्ये हे अधिकार एका व्यक्तीच्या किंवा अगदी कमी व्यक्तींच्या हातात असतात. अशी परिस्थिती लहान संघटनांमध्ये दिसून येते. परंतु जर संघटना मोठी असेल तर अशा वेळेस अधिकारांचे विकेंद्रीकरण केले जाते. या तत्त्वांनुसार संघटनेमध्ये केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण यांचा समतोल साधणे अत्यावश्यक आहे. हे करताना संघटनेचा आकार व कामाचे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे.
- अधिकार साखळीचे तत्त्व (Principle of Scalar Chain): साधारणपणे संघटनेत परस्परांमध्ये संवाद साधण्यासाठी उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत एक विशिष्ट साखळी असते. यामुळे माहिती व संप्रेषणाचा प्रवाह व्यवस्थित राहण्यास मदत होते. पूर्वीपासून संघटनेमध्ये मोठ्या संज्ञापन साखळीचा वापर केला जायचा. जी खूप वेळ खाऊ आहे. उदा. अधिकार स्तरानुसार व्यवस्थापक एखाद्या निर्णयाची माहिती विभाग प्रमुखाला द्यायचा, विभागप्रमुख पर्यवेक्षकाला ही माहिती द्यायचा, पर्यवेक्षक फोरमनला आणि फोरमन कामगारांना ही माहिती पुरवायचा. ही मोठी साखळी टाळण्यासाठी आणि जलद गतीने निर्णय घेण्यासाठी काही संघटना थेट संप्रेषण करतात त्याला गँग प्लँक म्हणजेच जोडफळी असे म्हणतात. थेट संप्रेषणासाठी म्हणजेच जोडफळीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी असणे आवश्यक असते.
- सुव्यवस्थेचे तत्त्व (Principle of Order): 'प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा आणि प्रत्येक गोष्ट नियोजित जागेवर असणे' यावर हे तत्त्व आधारित आहे. कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी कर्मचारी वर्ग व कामकाजाचे साहित्य योग्य त्या वेळी योग्य त्या जागेवर असल्या पाहिजेत. योग्य कामासाठी योग्य जागेवर योग्य मनुष्यबळाची नियुक्ती केली पाहिजे. हे तत्त्व भौतिक व मानवी संसाधनांचा योग्य वापर करण्यावर भर देते.
- समान न्यायाचे तत्त्व (Principle of Equity): व्यवस्थापनाने आधिनस्थ कर्मचाऱ्यांना योग्य व मैत्रीपूर्ण वागणूक दिली पाहिजे. कामाचे विभाजन करताना, अधिकार सोपवताना, आर्थिक अटी ठरवताना इत्यादी कामात कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव करू नये. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे वेतन ते काम करणाऱ्या विभागावर अवलंबून न ठेवता ते कोणत्या पातळीवर काम करीत आहेत यावर ठरविले पाहिजे. दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये परंतु एकाच पातळीवर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना समान वेतन असले पाहिजे. अशा प्रकारच्या समानतेमुळे संघटनेतील वादविवाद टाळता येतात.
- कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्त्व (Principle of Stability of Tenure): कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या वेळी व्यवस्थापनाने त्यांच्या सेवाकाल सातत्याबद्दल स्थैर्य किंवा सुरक्षिततेचे आश्वासन दिले पाहिजे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात संघटनेबद्दल आपुलकीची भावना निर्माण होण्यास मदत होते. असुरक्षिततेची भावना कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर नेहमीच विपरीत परिणाम करते तर सुरक्षित नोकरीमुळे कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण कमी होते.
- पुढाकार घेण्याचे तत्त्व (Principle of Initiative): पुढाकार म्हणजे नावीन्यपूर्ण मार्गाने काम करण्यासाठी स्वयंप्रेरणेने पुढे येणे. कर्मचाऱ्यांना नवीन कल्पनांवर विचार करण्याचे व त्याच्यावर काम करण्याचे स्वातंत्र्य दिल्यास ते दिलेले काम करण्यासाठी पुढाकार घेतात. व्यवस्थापकाने या नवीन कल्पनांवर सखोल चर्चा करावी व अशा पुढाकाराचे स्वागत करावे. ह्यामुळे संघटनेमध्ये निरोगी वातावरण निर्माण करण्यास मदत होते.
- संघभावनेचे तत्त्व (एकी हेच बळ) (Principle of Sprit de Corpse/Team Work): हेन्री फेयॉल यांनी सांघिक कृतीवर भर दिला आहे. संघभावना म्हणजे 'एकी हेच बळ'. कोणतीही संघटना चालविणे ही एक सांघिक कृती आहे आणि मानवी संसाधने ही मौल्यवान संपत्ती आहे. जर सर्व कर्मचारी परस्पर विश्वासाने संघटित होऊन काम करत असतील तर अडचणींवर लगेच मात करता येते. म्हणून संघटनेचे ध्येय सहज साध्य करण्यासाठी व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यामध्ये संघभावनेची व समंजसपणाची जाणीव निर्माण केली पाहिजे.
shaalaa.com
Notes
Student can refer to the provided solution based on their prefer marks.
हेन्री फेयॉल यांचा व्यवस्थापनाचा प्रशासकीय सिद्धांत
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:
शिस्तीचे तत्त्व
योग्य जोड्या जुळवा:
'अ' गट | 'ब' गट | ||
(अ) | निर्देशनातील एकवाक्यता | (१) | माहितीचा अधिकार |
(ब) | नियोजन | (२) | व्यवस्थापनाचे अंतिम कार्य |
(क) | गोदाम | (३) | विशिष्ट नाव |
(ड) | ग्राहक अधिकार | (४) | एक वरिष्ठ एक योजना |
(इ) | नोंदणीकृत बोधचिन्ह | (५) | विक्रेता |
(६) | व्यवस्थापनाचे प्राथमिक कार्य | ||
(७) | समय उपयोगिता | ||
(८) |
सामान्य मार्गदर्शक तत्त्वे |
||
(९) | व्यापारी चिन्ह | ||
(१०) | स्थळ उपयोगिता |