Advertisements
Advertisements
Question
खालील फरक स्पष्ट करा:
जिल्हा आयोग आणि राज्य आयोग
Distinguish Between
Solution
जिल्हा आयोग | राज्य आयोग | |
अर्थ | जिल्हा स्तरावर ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी राज्य शासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या आयोगास जिल्हा आयोग असे म्हणतात. | राज्य स्तरावर ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी राज्य शासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या आयोगास राज्य आयोग असे म्हणतात. |
अध्यक्ष |
जिल्हा सत्र न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश किंवा समकक्ष व्यक्तीची जिल्हा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते. |
उच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायधीशांची राज्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते. |
सदस्य | जिल्हा आयोगाची सदस्य संख्या दोन पेक्षा कमी आणि केंद्र शासनाशी सल्ला-मसलत करून निश्चित केलेल्या संख्येपेक्षा अधिक नसते. | राज्य आयोगाची सदस्य संख्या 4 पेक्षा कमी आणि केंद्र शासनाशी सल्ला-मसलत करून निश्चित केलेल्या संख्येपेक्षा अधिक नसते. |
सदस्य कार्यकाळ | नेमणुकीपासुन 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे यापैकी कमी असलेल्या कालावधीसाठी असतो. | नेमणुकीपासून 5 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे यापैकी कमी असलेल्या कालावधीसाठी असतो. |
कार्यसीमा | जिल्हा आयोगाची कार्यसीमा संबंधित जिल्हा असते. | राज्य आयोगाची कार्यसीमा संपूर्ण राज्य असते. |
आर्थिक अधिकाक्षेत्र | वस्तू किंवा सेवेचे मूल्य रू. एक कोटीपेक्षा अधिक नसलेल्या तक्रारी. | वस्तू किंवा सेवेचे मूल्य रु. एक कोटीपेक्षा अधिक किंवा दहा कोटीपेक्षा कमी रकमेच्या तक्रारी. |
अपील | जिल्हा आयोगाच्या आदेशाविरुद्ध राज्य आयोगाकडे दाद मागता येते. | राज्य आयोगाच्या आदेशाविरुद्ध राष्ट्रीय आयोगाकडे दाद मागता येते. |
shaalaa.com
ग्राहक संरक्षण कायदा, 2019
Is there an error in this question or solution?