Advertisements
Advertisements
Question
खालील फरक स्पष्ट करा:
संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापन
Distinguish Between
Solution
संघटन | कर्मचारी व्यवस्थापन | |
अर्थ | संघटन हे व्यवस्थापनाच्या गतिविधी परिभाषित आणि संघटित करण्याची प्रक्रिया आहे. | कर्मचारी व्यवस्थापन हे नेमणूक, निवड, विकास, प्रशिक्षण, प्रगती इ. ची प्रक्रिया आहे. |
उद्दिष्टे | मुख्य उद्दिष्ट हे सर्व साधने ओळखून त्यांचे एकत्रीकरण करणे हे आहे. | मुख्य उद्दिष्ट हे योग्य वेळी, योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीची नेमणूक करणे हे आहे. |
कार्यक्षेत्र | कार्यक्षमता ओळखून गट तयार करणे, त्यांना काम नेमून देणे व अधिकार संबंध प्रस्थापित करणे. | नेमणूक, निवड प्रशिक्षण बढती यांचा समावेश असतो. |
घटक | साधनांची मांडणी करताना अंतर्गत तसेच बाहेरील घटक गृहित धरतात. | कर्मचारी व्यवस्थापन हे बहुतेक करून अंतर्गत घटकांशी संबंधित असते. |
आज्ञा | हे नियोजनावर अवलंबून आहे. | हे संघटनाचे अनुकरण करते. |
साधने | सर्व उपलब्ध साधनांची मांडणी करणे जसे की, मनुष्य, पैसा यंत्रसामग्री, पद्धती इ. | ही एक अशी प्रक्रिया आहे जी मानवी श्रमांशी निगडित आहे. |
स्वरूप | सर्व साधनांचे एकत्रीकरण व व्यवस्था करेपर्यंत संघटन कार्य करते. | कर्मचारी व्यवस्थापनाशी संबंधित असल्याने निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. |
व्यवस्थापनाचे स्तर | उच्च स्तर आणि मध्यम स्तर हे साधनांच्या संघटनेशी संबंधित असतात. | मध्यम स्तर व्यवस्थापन हे नेमणूक, प्रशिक्षण व निवड पहाते ते उच्च स्तर बढती आणि भरपाई संबधित असतात. |
shaalaa.com
Notes
Is there an error in this question or solution?