Advertisements
Advertisements
Question
खालील फरक स्पष्ट करा:
जीवन विमा आणि अग्नी विमा
Solution
जीवन विमा | अग्नी विमा | |
अर्थ | जीवन विमा हा विमा हमीदार व विमा धारक यांच्यामधील करार असून, विमा हमीदार हा विमाधारकास विशिष्ट कालावधी संपल्यानंतर किंवा मृत्यू यापैकी सर्वात आधी जे होईल त्यासाठी भरपाई करण्यास, विमाधारकाने विमा हप्ता भरल्यानंतर बांधील असतो. | अग्नी विमा हा एक करार असून ज्याद्वारे विमा हमीदार हा विमाधारकास आगीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई हमी देण्यास बांधील असतो. |
विमा धारक | जीवन विमा हा विमादार स्वतः साठी अथवा कुटुंबासाठी घेतला जातो. |
अम्नीविमा हा विमाधारक त्याच्या व्यावसायिक मालमत्तेसाठी अथवा व्यावसायिक देण्यांसाठी घेतला जातो. |
विषय बाब | विमाधारकाचे जीवन ही जीवन विम्यामध्ये विषय बाब असते. | अग्नी विम्यामध्ये संपत्ती आणि मालमत्ता ही विषय बाब असते. |
कालावधी | जीवन विमा हा कितीही वर्षांसाठी विमादाराच्या मृत्यूपर्यंत कितीही कालावधीसाठी घेता येतो. | अग्नी विम्याची मुदत साधारणतः एक वर्षापर्यंत असते. |
भरपाई |
भरपाई ही मृत्यूपश्चात अथवा विशिष्ट मुदतीपर्यंत यापैकी आधी जे होईल तेव्हा मिळते. |
विमा कालावधीत आगीमुळे नुकसान झाल्यासच भरपाई मिळते. |
नुकसान भरपाईचे तत्त्व |
जीवन विम्यासाठी नुकसान भरपाईचे तत्त्व लागू नाही कारण मानवी जीवनाची किंमत पैशात होऊ शकत नाही. |
अग्नी विम्यासाठी नुकसान भरपाईचे तत्त्व लागू पडते. सदरच्या नुकसान भरपाईमुळे विमाधारक नुकसान होण्यापूर्वीच्या आर्थिक परिस्थितीत परत येऊ शकतो. |
विम्यांची संख्या |
एका जीवनासाठी विमाधारक कितीही विमा योजना घेऊ शकतो. सर्व विम्यांमध्ये भरपाई लागू असते. |
अग्नी विमा हा साधारणत: एका विम्यात घेता येतो. पुनर्विमा सुद्धा या बाबतीत लागू आहे. परंतू, नुकसान भरपाई ही फक्त वास्तविक नुकसानासाठीच मिळते. |
लाभार्थी |
जीवन विम्यामध्ये लाभार्थी हा विमादार हयात असल्यास स्वतः अथवा निर्देशित व्यक्ती अथवा कायदेशीर वारसदार असतो. |
लाभार्थी हा वस्तूंचा अथवा मालमत्तेचे विमा घेणारा विमादार असतो. |
विम्याचे समर्पण |
काही अटींच्या अधीन राहून विम्याचे समर्पन करता येते. |
विम्याचे समर्पण होत नाही. |