Advertisements
Advertisements
Question
जेव्हा कार्यशील लोकसंख्येत वाढ होते, तेव्हा लोकसंख्या लाभांशातही वाढ होते.
Solution
एखाद्या देशातील कार्यशील लोकसंख्येच्या प्रमाणाचा संबंध प्रामुख्याने देशातील जन्म मृत्युदर या घटकाशी निगडित आहे आणि हाच घटक वय लिंग मनोऱ्यातून स्पष्टपणे दिसून येतो. जेव्हा जन्मदर खूप जास्त असतो, तेव्हा ० ते १५ या वयोगटातील अवलंबित लोकांची संख्या जास्त असते. मात्र, जसजसा लोकसंख्येचा वृद्धिदर कमी होत जातो, तसे ० ते १५ वयोगटातील लोकांची संख्या कमी होत जाते, मात्र तेव्हाच १५ ते ५९ या कार्यशील गटातील लोकसंख्येचे प्रमाण वाढत जाते. जसजसे कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण वाढत जाते, तसतसा देशावरील आर्थिक भारही कमी होतो आणि तेव्हाच ही उपलब्ध कार्यशील लोकसंख्या विविध व्यवसायात कार्यरत होते. त्यामुळे एकूणच आर्थिक वृद्धी होऊन संपत्तीची निर्मिती होते. याचा थेट परिणाम आर्थिक विकासावर होतो आणि या आर्थिक विकासाचे लाभ देशातील लोकसंख्येला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात मिळतात. लोकांचे उत्पन्न वाढते, राहणीमान सुधारते. वाहतूक, शिक्षण, आरोग्य यांसारख्या सेवा-सुविधात वाढ होते. एका आर्थिक कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण वाढल्यामुळे मिळणारा लाभ आवश्यक असतो. म्हणूनच कार्यशील लोकसंख्येत वाढ होते, तेव्हाच लोकसंख्या लाभांश वाढतो असे म्हटले जाते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
A: लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते.
R: लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे.
लोकसंख्या वाढ व स्थलांतर
लोकसंख्या मनोरा व लिंग गुणोत्तर.
लोकसंख्येची व्यावसायिक संरचना.
साक्षरतेचे प्रमाण.
विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे.
खालील विधानाचे भौगोलिक कारणे लिहा.
लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते.
फरक स्पष्ट करा.
विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा.
लोकसंख्या मनोऱ्याचे लोकसंख्या अभ्यासातील महत्त्व स्पष्ट करा.
दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- कोणत्या देशाचा स्त्री प्रौढ साक्षरता दर खूप कमी आहे?
- दिलेल्या तीन प्रदेशात प्रौढ साक्षरता दरात पुरुषांची टक्केवारी अधिक असण्याचे कारण काय असावे?
- २०१६ मधील सहारा बाळवंटी प्रदेशातील स्त्री-पुरुष साक्षरता दरातील टक्केवारी कमी असण्याचे कारण म्हणजे स्त्री शिक्षणाला अनुत्तम प्राधान्य आणि सामाजिक-आर्थिक अडचणी.
- आलेखातील स्त्री प्रौढ साक्षरता दराविषयी स्वमत लिहा.
- आलेखातील कोणता देश सामाजिक दृष्ट्या प्रगत असेल?