English

जोसेफ यांनी खालीलप्रमाणे शेअर्समध्ये गुंतवणूक केली, तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढा. कंपनी A: दर्शनी किंमत 2 रुपये आणि अधिमूल्य 18 रुपये असलेले 200 शेअर्स. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

जोसेफ यांनी खालीलप्रमाणे शेअर्समध्ये गुंतवणूक केली, तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढा.

कंपनी A: दर्शनी किंमत 2 रुपये आणि अधिमूल्य 18 रुपये असलेले 200 शेअर्स.
कंपनी B: बाजारभाव 500 रुपये असलेले 45 शेअर्स.
कंपनी C: बाजारभाव 10,540 रुपये असणारा 1 शेअर

Sum

Solution

कंपनी A साठी:

दर्शनी किंमत = ₹ 2, अधिमूल्य = ₹ 18,

∴ बाजारभाव = दर्शनी किंमत + अधिमूल्य

= 2 + 18 = ₹ 20

शेअर्सची संख्या = 200

एकूण गुंतवणूक = शेअर्सची संख्या × बाजारभाव

= 200 × 20

= ₹ 4,000

कंपनी B साठी:

बाजारभाव = ₹ 500, शेअर्सची संख्या = 45

एकूण गुंतवणूक = शेअर्सची संख्या × बाजारभाव

= 45 × 500

= ₹ 22,500

कंपनी C साठी:

बाजारभाव = ₹ 10,540, शेअर्सची संख्या = 1

∴ एकूण गुंतवणूक = शेअर्सची संख्या × बाजारभाव

= 1 × 10,540 = ₹ 10,540

∴ जोसेफ यांनी केलेली एकूण गुंतवणूक

= कंपनी A मध्ये केलेली गुंतवणूक + कंपनी B मध्ये केलेली गुंतवणूक + कंपनी C मध्ये केलेली गुंतवणूक

= 4,000 + 22,500 + 10,540

= ₹ 37,040

∴ जोसेफ यांनी केलेली एकूण गुंतवणूक ₹ 37,040 आहे.

shaalaa.com
शेअर्स
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: अर्थनियोजन - सरावसंच 4.3 [Page 102]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 4 अर्थनियोजन
सरावसंच 4.3 | Q 3 | Page 102
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×