Advertisements
Advertisements
Question
कार्यक्रमाची तिकिटे संपल्यामुळे हाच कार्यक्रम पुन्हा सादर करण्याची मागणी करणारे पत्र लिहा.
Solution
दि. ३ नोव्हेंबर, २०१९.
प्रति,
अ. ब. क.
माननीय आयोजक,
'सरगम' संस्था,
अमरावती.
विषयः 'दिवाळी पहाट' कार्यक्रम पुन्हा सादर करण्याची मागणी.
महोदय,
मी राहुल जोशी, साई सोसायटीचा प्रतिनिधी म्हणून आपणांस पत्र लिहित आहे. काल दिवाळी पहाट निमित्त आपल्या संस्थेद्वारे बहारदार गीतगायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी संपूर्ण साईवासियांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची खूप इच्छा होती, म्हणून घरपोच तिकिटांसाठी फोन केला, तेव्हा कार्यक्रमाची सर्व तिकिटे संपल्याचे समजले. हा कार्यक्रम अनुभवण्याची आम्हां सर्व सुमेरूवासियांची तीव्र इच्छा आहे. त्यामुळे, हा कार्यक्रम पुन्हा एकदा सादर करावा, अशी विनंती मी करतो. अमरावतीतील रसिक श्रोत्यांच्या या मागणीचा आपण अवश्य विचार कराल, याची खात्री वाटते.
आपला विश्वासू,
राहुल जोशी
साई सोसायटी,
आसेगाव,
अमरावती.
[email protected]
APPEARS IN
RELATED QUESTIONS
घरपोच तिकिटे मागितल्याप्रमाणे न मिळाल्याबाबत संबंधित व्यक्तिकडे तक्रार करा.
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.
२६ जानेवारी, भारताचा गणतंत्र दिन. अर्णव स्वच्छ शालेय गणवेशात तयार होऊन शाळेत गेला. माननीय प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु झाला. विद्यार्थ्यांनी ध्वजवंदन केले. राष्ट्रगीत, ध्वजगीत, देशभक्तीपर गीत सादर केले. अध्यक्षांच्या प्रेरणादायी भाषणानंतर अर्णवचे देशभक्तीचा संदेश देणारे व देशभक्ताबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे भाषण झाले. वृक्षारोपण, खाऊवाटप झाल्यानंतर मुले घरी जायला निघाली. अर्णवदेखील आपली तीनचाकी सायकल घेऊन निघाला. सावकाशपणे हुतात्मा चौकापर्यंत पोहोचला. लाल दिव्याचा संकेत मिळताच जागेवरच थांबला. चौकात खूप गर्दी होती. अनेक छोटी मुलं हातात छोटे तिरंगी झेंडे घेऊन पालकांच्या वाहनांवर बसली होती. हिरवा दिवा दिसताच थांबलेली गर्दी पुढे सरकली. अर्णवनेही हाताने चाकाला वेग दिला. एवढ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेणारं असं..... |
- तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या व तात्पर्य लिहा.
- तुम्ही कथा तयार करताना व लिहिताना कोण कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या, त्यांची यादी करा.
खालील जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरुपात पुनर्लेखन करा.
खाली दिलेल्या बातमीच्या मथळ्यावरून आकर्षक जाहिरात तयार करा.
‘पाठ्यपुस्तकेतर पुस्तके सवलतीच्या दरात मिळतील.’
दिलेल्या सूचना वाचा व तुम्ही व तुमचा मित्र यांच्यातील संवाद लिहा.
विद्यार्थ्यांसाठी सूचना जागतिक पर्यावरणदिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन इच्छुक विद्यार्थ्यांनी २५ एप्रिलपर्यंत वर्गशिक्षकांकडे आपली नावे नोंदवावीत व ५ जूनला सकाळी ७.३० ला शाळेत जमावे. टीप:- येताना उन्हाळी सुट्टीत जमवलेल्या फळबिया सोबत आणाव्यात. |
आत्मकथन-
खालील दिलेला महामार्गावरील सूचनाफलक तुमच्याशी बोलतो आहे, अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मकथन लिहा.
♦ वाहने हळू चालवा. |
खालील मुद्द्यांच्या आधारे लेखन करा.
कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या तुमच्या मित्राची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.
खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.
कृती करा.
खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.
शब्दजाल पूर्ण करा.
खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.
वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?
खाली दिलेल्या शब्दांवरून आकर्षक जाहिरात तयार करा.
शब्द - छत्री, रेनकोट, पाऊस
खालील बातमी वाचा.
वरील सोहळ्याला तुम्ही उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
शब्दसमूह, वाक्प्रचार व म्हणी यांचा वापर करून उतारा तयार करा.