Advertisements
Advertisements
Question
दिलेल्या सूचना वाचा व तुम्ही व तुमचा मित्र यांच्यातील संवाद लिहा.
विद्यार्थ्यांसाठी सूचना जागतिक पर्यावरणदिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन इच्छुक विद्यार्थ्यांनी २५ एप्रिलपर्यंत वर्गशिक्षकांकडे आपली नावे नोंदवावीत व ५ जूनला सकाळी ७.३० ला शाळेत जमावे. टीप:- येताना उन्हाळी सुट्टीत जमवलेल्या फळबिया सोबत आणाव्यात. |
Solution
मी- | अरे मेघा, सूचनाफलकावरील सूचना वाचलीस ना? वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी व्हायचंय मला. |
मेघा- | हो तर. मलाही खूप उत्सुकता आहे, की कधी एकदा ५ जून उजाडतोय आणि झाड लावण्याची संधी मला मिळतेय. |
मी- | हो, अरे मला तर एक छान कल्पनाही सुचली होती. आमच्या गच्चीतील छोट्या बादलीत जास्वंद लावलाय. तो आता इतका वाढलाय, की त्याला मोठ्या, मोकळ्या जागी लावायला हवंय. जर आयोजकांनी परवानगी दिली, तर वृक्षवाटिकेत तो लावता येईल, नाही का? |
मेघा- | हो, आपण त्यांना विचारू. मला वाटतं, की ते तुला नक्कीच परवानगी देतील. |
मी- | मी उन्हाळी सुट्टीत फळबिया जमवणार आहे. तू काय करणार आहेस? |
मेघा- | अरे तेच सांगणार होते आता. आजीने लावलेल्या सवयीमुळे मी मागच्या सुट्टीत फळबिया साठवल्या होत्या. आता त्याच सोबत आणेन कार्यक्रमाला. म्हणूनच मी सूचना वाचताच खूप उत्सुक झाले होते. |
मी- | मेघा, भारीच आहेस तू! चल, आता आधी आपण वर्गशिक्षकांकडे नावनोंदणी करू. |
मेघा- | हो हो, चल. |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील निवेदन वाचा व संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा.
महात्मा फुले विद्यालय बुलढाणा नाट्यविभाग प्रमुख अंतिम दिनांक दि.२६ डिसेंबर |
पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक |
स्वपरिचय पत्राचे मुद्दे (१) संपूर्ण नाव (२) पत्ता (३) संपर्क क्रमांक (४) जन्मतारीख (५) शैक्षणिक पात्रता/विशेष प्रशिक्षण (६) छंद (७) अनुभव/पारितोषिक (८) इतर कलांमधील प्रावीण् |
घरपोच तिकिटे मागितल्याप्रमाणे न मिळाल्याबाबत संबंधित व्यक्तिकडे तक्रार करा.
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.
२६ जानेवारी, भारताचा गणतंत्र दिन. अर्णव स्वच्छ शालेय गणवेशात तयार होऊन शाळेत गेला. माननीय प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु झाला. विद्यार्थ्यांनी ध्वजवंदन केले. राष्ट्रगीत, ध्वजगीत, देशभक्तीपर गीत सादर केले. अध्यक्षांच्या प्रेरणादायी भाषणानंतर अर्णवचे देशभक्तीचा संदेश देणारे व देशभक्ताबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे भाषण झाले. वृक्षारोपण, खाऊवाटप झाल्यानंतर मुले घरी जायला निघाली. अर्णवदेखील आपली तीनचाकी सायकल घेऊन निघाला. सावकाशपणे हुतात्मा चौकापर्यंत पोहोचला. लाल दिव्याचा संकेत मिळताच जागेवरच थांबला. चौकात खूप गर्दी होती. अनेक छोटी मुलं हातात छोटे तिरंगी झेंडे घेऊन पालकांच्या वाहनांवर बसली होती. हिरवा दिवा दिसताच थांबलेली गर्दी पुढे सरकली. अर्णवनेही हाताने चाकाला वेग दिला. एवढ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेणारं असं..... |
- तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या व तात्पर्य लिहा.
- तुम्ही कथा तयार करताना व लिहिताना कोण कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या, त्यांची यादी करा.
खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.
(अ) चौकट पूर्ण करा.
(आ) जाहिरातीतील काही मजकूर चुकीचा वाटतो का? सकारण नमूद करा.
(इ) वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?
खालील जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरुपात पुनर्लेखन करा.
प्रसंगलेखन-
खालील बातमी वाचा.
वरील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता. त्या भावपूर्ण प्रसंगाचे लेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे लेखन करा.
कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.
शब्दजाल पूर्ण करा.
खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.
वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?
खालील बातमी वाचा.
वरील सोहळ्याला तुम्ही उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
शब्दसमूह, वाक्प्रचार व म्हणी यांचा वापर करून उतारा तयार करा.