Advertisements
Advertisements
Question
प्रसंगलेखन-
खालील बातमी वाचा.
वरील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता. त्या भावपूर्ण प्रसंगाचे लेखन करा.
Solution
एक अविस्मरणीय कारगिल दिन
मे -जुलै १९९९... माझ्या जन्मापूर्वी, घडलेला एक भयावह संग्राम. या संदर्भातील जनरल वी. पी. मलिक यांचं 'कारगिल' नावाचं पुस्तक एकदा वाचनात आलं होतं. त्यावेळचा संग्राम, त्यात झालेली हानी, शहीद जवान व त्यांची विखुरलेली कुटुंबे, कायमचे अपंग झालेले जवान ... या विचारचक्रात गुंतलेलो असताना कधी ६ वाजले ते कळलेच नाही. आज कारगिल दिनानिमित्त शाळेच्या पटांगणावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मुख्याध्यापकांच्या भाषणाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. ५२७ जणांचे बलिदान, त्यामागील रक्तरंजित कहाण्या आणि त्यांच्या कुटुंबांची झालेली वाताहत सारं ऐकून मन विषण्ण होत होते. यानंतर अमर जवान मेजर रमाकांत यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली गेली. याप्रसंगी त्यांच्या वीरपत्नी व वीरमाताही उपस्थित होत्या. मेजर रमाकांत यांच्या आईने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
लहानपणापासूनच मेजर रमाकांत यांना सैन्यदलाचे आकर्षण होते. त्यांनी सैन्यदलात भरती होण्याचा जणू ध्यासच घेतला होता. 'मातृभूमीचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून त्यासाठी सर्वोच्च बलिदान देण्यासाठीही मी तयार आहे', असे ते नेहमी म्हणत. कारगिल युद्धात पाकिस्तानच्या काही सैन्याने काश्मीर प्रांतात घुसखोरी केली. त्यांना रोखण्यासाठी भारतीय जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. मेजर रमाकांत यांनी शत्रू सैन्यातील सहा जणांना मृत्यूच्या दाढेत ढकलले. शरीरावर पाच गोळ्या लागूनही शेवटच्या श्वासापर्यंत ते लढत राहिले. त्यांच्या तुकडीने शत्रूसैन्याचा फडशा पाडला, त्यानंतरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेने अकोला शहर दु:खात बुडाले. संपूर्ण भारतभर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली होती.
ही सारी कहाणी त्या वीरमातेच्या तोंडून ऐकताना डोळ्यांत अश्रूंनी दाटी केली होती. वारंवार अंगावर रोमांच उभे राहत होते, हृदय देशप्रेमाने व कृतज्ञतेने भरून गेले होते. आपल्या पतीने देशसेवा करता करता वीरमरण कवटाळले हे सांगताना वीरपत्नीला अश्रू अनावर झाले होते. त्या भावपूर्ण वातावरणाने भारलेल्या आम्हांला सैनिकांच्या त्यागाचे स्मरण झाले होते. मन कृतज्ञतेने काठोकाठ भरले होते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील निवेदन वाचा व संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा.
महात्मा फुले विद्यालय बुलढाणा नाट्यविभाग प्रमुख अंतिम दिनांक दि.२६ डिसेंबर |
पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक |
स्वपरिचय पत्राचे मुद्दे (१) संपूर्ण नाव (२) पत्ता (३) संपर्क क्रमांक (४) जन्मतारीख (५) शैक्षणिक पात्रता/विशेष प्रशिक्षण (६) छंद (७) अनुभव/पारितोषिक (८) इतर कलांमधील प्रावीण् |
घरपोच तिकिटे मागितल्याप्रमाणे न मिळाल्याबाबत संबंधित व्यक्तिकडे तक्रार करा.
खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.
(अ) चौकट पूर्ण करा.
(आ) जाहिरातीतील काही मजकूर चुकीचा वाटतो का? सकारण नमूद करा.
(इ) वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?
खालील जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरुपात पुनर्लेखन करा.
खाली दिलेल्या बातमीच्या मथळ्यावरून आकर्षक जाहिरात तयार करा.
‘पाठ्यपुस्तकेतर पुस्तके सवलतीच्या दरात मिळतील.’
दिलेल्या सूचना वाचा व तुम्ही व तुमचा मित्र यांच्यातील संवाद लिहा.
विद्यार्थ्यांसाठी सूचना जागतिक पर्यावरणदिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन इच्छुक विद्यार्थ्यांनी २५ एप्रिलपर्यंत वर्गशिक्षकांकडे आपली नावे नोंदवावीत व ५ जूनला सकाळी ७.३० ला शाळेत जमावे. टीप:- येताना उन्हाळी सुट्टीत जमवलेल्या फळबिया सोबत आणाव्यात. |
¤ स्वच्छता अभियान कार्यक्रम ¤ २ ऑक्टोबर आष्टी जि. चंद्रपूर येथील शारदा विद्यालयात महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न झाला. या दिवशीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. जयंत करोडे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापकांनी भूषवले. इयत्ता आठवी ते दहावी साठी ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धाआयोजित केली होती. अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी परिसरात ‘स्वच्छता अभियान’ राबवले. प्रमुख पाहुण्यांनी ‘माझी शरीर स्वच्छता आणि आहार’ या विषयावर उत्तम उद्बोधन केले. प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिसे देण्यात आली. अध्यक्षीय भाषणानंतर श्री. गावंडे सरांनी आभारप्रदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. |
वरील वृत्तांत वाचा व त्यासाठीची कृती तयार करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे लेखन करा.
कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.
कृती करा.
खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.
शब्दजाल पूर्ण करा.
खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.
वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?
खाली दिलेल्या शब्दांवरून आकर्षक जाहिरात तयार करा.
शब्द - छत्री, रेनकोट, पाऊस
खालील बातमी वाचा.
वरील सोहळ्याला तुम्ही उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
शब्दसमूह, वाक्प्रचार व म्हणी यांचा वापर करून उतारा तयार करा.