Advertisements
Advertisements
Question
खालील विषयावर वृत्तान्त लेखन करा.
Solution
नवमहाराष्ट्र विद्यालयाचा जागतिक विज्ञानदिन सोहळा दिमाखात संपन्न! २९ फेब्रुवारी, विमाननगर, वसई: जागतिक विज्ञान दिनानिमित्त नवमहाराष्ट्र विद्यालयातर्फे डॉ. होमीभाभा सभागृह येथे, सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानात शास्त्रज्ञ डॉ. दीपेश जोशी, सन्माननीय खगोलशास्त्र अभ्यासक सुनीला राव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. नारळीकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना जीवनातील विज्ञानवादी दृष्टिकोनाचे महत्त्व अत्यंत साध्या, सोप्या भाषेत स्पष्ट केले. त्यासाठी त्यांनी अनेक खगोलशास्त्रीय दाखले दिले. रोजच्या जीवनातील घटनांकडेही चिकित्सक व जिज्ञासू वृत्तीने कसे पाहावे, याविषयी मार्गदर्शन केले, तर प्रमुख पाहुणे डॉ. जोंधळे व नीला राऊत यांनीही आपला प्रवास थोडक्यात उलगडत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित केले. सकाळी ११.०० वाजता सुरू झालेल्या या व्याख्यानाची सांगता दुपारी २.०० च्या सुमारास झाली. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. नारळीकर यांच्या हस्ते नवमहाराष्ट्र विद्यालयातील विज्ञान प्रदर्शनात विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. |