Advertisements
Advertisements
Question
‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
Solution
वरील ओळ सुप्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांच्या 'तिफन' या कवितेतील आहे. या कवितेत कवीने कष्टकरी शेतकऱ्याच्या जीवनाचे जिवंत चित्र डोळ्यांसमोर उभे केले आहे.
पावसाची आस लावून बसलेला, शेतात राबणारा शेतकरी पाऊस सुरू होतो तसा मनातून सुखावतो. पाऊस पडल्यामुळे त्याच्या कष्टांचे चीज होणार असते आणि हिरवेगार पीक शेतात डोलू लागणार असते. त्यामुळे शेतीकाम करताना अचानक पायात काटा रुतून रक्त जरी आले तरी त्या वेदना त्याला जाणवत नाहीत. अशाप्रकारे, शेतकऱ्याचे जीवन कष्टमय असले तरी शेतकऱ्याच्या मनात मात्र हिरव्यागार शेताची आशा जागी झालेली असते. त्याने केलेल्या अपार मेहनतीतून हिरव्यागार शेताचे स्वप्न सत्यात येणार, सारं काही ठीक होणार याची त्याला खात्री वाटत असते. त्यामुळे त्या कष्टांची, वेदनांची जाणीव त्याला राहत नाही, हे कवी यातून सांगत आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.
कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.
(परिसर प्रचाराने व्यापक केला, वैभवापर्यंत पोहोचवला, वारकरी संप्रदायाची स्थापना, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.)
वारकरी संप्रदायरूपी इमारतीशी संबंधित संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. | पाया रचणे | |
आवार रचणे | ||
खांब होणे | ||
कळस चढवणे |
व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.
व्यायामाने जडत्व वाढते.
व्यायामाने स्नायू अशक्त होतात.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
स्वतःची कामे स्वतः करणारा -
व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.
‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
भुलावी तहान विसरावी भूक, कारण......
'पुन्हा एकदा' या कवितेचा तुम्हांला समजलेला भावार्थ स्पष्ट करा.
खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.
पाराबती करते त्या दोन कृती-
या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
वऱ्हाडी शब्द | प्रमाणभाषेतील शब्द |
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय? पांढरा रंग प्रकाशाचा सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे आणि त्यावरील अशोकचक्र काय सांगते? ते सद्गुणांची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रेराहू देत. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते, की गतिमान राहा. केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारीपणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया. |
१. चौकटी पूर्ण करा.
(अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निदर्शक-
(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक-
(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक-
२. झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा.