Advertisements
Advertisements
Question
खालील अपठित उताऱ्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
निसर्ग हा माणसाचा पहिला गुरू, निसर्गातील प्रत्येक घटकापासून माणूस खूप काही शिकला आहे, शिकत आहे व पुढेही शिकू शकतो. तसं पाहिलं तर निसर्ग गुरूपेक्षा माणसाचा मित्र मानला पाहिजे असे एक मतही अगदी आग्रहाने मांडले जाते. माणसाच्या अगदी प्रारंभीच्या काळात खरी साथ दिली ती निसर्गाने अन्न, वस्त्र व निवारा या तिन्ही गरजा निसर्गाने भागविल्या. त्याचबरोबर प्रगतीसाठी आवश्यक ती साथही दिली. शेती, शिकार तसेच उपजीविकेसाठी, गरजा भागवण्यासाठी आवश्यक ते सर्व साहाय्य निसर्गाद्वारेच मिळत गेले. निसर्ग माणसाला भरभरून देत राहिला, त्याचबरोबर माणूसही त्या काळात निसर्गाचा ऋणीच राहिला. पण कालांतराने माणसाच्या आशा वाढत गेल्या, माणूस सुखाच्या मागे धावत राहिला, त्याचबरोबर निसर्गाच्या प्रती असलेली ही भावना कमी होत गेली. |
Solution
निसर्ग हा माणसाचा पहिला गुरु असून, त्याने माणसाला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा यांसारख्या मूलभूत गरजा निसर्गाने पूर्ण केल्या, तसेच शेती, शिकार आणि उपजीविकेसाठी आवश्यक सहाय्यही दिले. सुरुवातीला माणूस निसर्गाचा ऋणी होता, परंतु जसजसा तो प्रगतीच्या दिशेने गेला, तसतशी निसर्गाबद्दलची कृतज्ञता कमी होत गेली. सुखाच्या शोधात माणूस निसर्गाचा अविवेकी वापर करू लागला, त्यामुळे निसर्ग-माणूस नात्यात बदल झाला.