English

Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)] Official 2024-2025 SSC (English Medium) 10th Standard Board Exam Question Paper Solution

Advertisements
Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)] [Official]
Marks: 80 Maharashtra State Board
SSC (English Medium)
SSC (Hindi Medium)

Academic Year: 2024-2025
Date & Time: 24th February 2025, 11:00 am
Duration: 3h
Advertisements

कृतिपत्रिकेसाठी सूचना :-

  1. सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
  2. आकृत्या पेननेच काढाव्यात.
  3. उपयोजित लेखनातील कृतीसाठी (सूचना, निवेदन) आकृतीची आवश्यकता नाही. तसेच या कृती लिहून घेऊ नयेत.
  4. विभाग 5 - उपयोजित लेखन प्र. 5 (अ) (2) सारांशलेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्र. 1 (इ) अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे.
  5. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.

विभाग 1 : गद्य
[18]1
[7]1.A

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) आकृती पूर्ण करा:      2

माझ्या बालमित्रांनो, मी तुमच्याएवढा होतो तेव्हा अगदी तुमच्यासारखाच खेळकर, खोडकर व उपद्व्यापी होतो! माझा जन्म पुण्यातच एका गरीब कुटुंबात झाला. माझे वडील त्या वेळेस पोलीसखात्यामध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते. तेव्हा साहजिकच गरीब कुटुंबाच्या वाट्याला येणारे सारे कष्ट व दु:खे आम्ही भोगत होतो. अशा परिस्थितीत वडिलांना आम्हां मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्यच नव्हते. दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून आम्हांला त्यांचा हेवा वाटत असे. तरी पण गल्लीतील मुलांना जमा करून उन्हातान्हात विटीदांडू खेळणे, पतंग उडवणे, कधीमधी कॅम्पमधील कॅनॉलमध्ये चोरून पोहणे; कैऱ्या, पेरू पाडून त्यांचा यथेच्छ स्वाद घेणे, घरात जळणासाठी आणलेल्या लाकडांतूनच बॅट व स्टंप तयार करणे व कुठून तरी जुना पुराणा बॉल पैदा करून क्रिकेट खेळणे असा माझा दिवसभराचा कार्यक्रम असायचा. संध्याकाळी घरी येईपर्यंत माझ्याबद्दल बऱ्याच तक्रारी आईच्या कानांवर आलेल्या असायच्या. दिवसभराच्या खेळाने भूक तर खूपच लागलेली असायची. घरात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच पाठीवर धम्मकलाडू व चापटपोळ्यांचा यथेच्छ वर्षाव व्हायचा.

(2) खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा:         2

  1. दिवसभराच्या खेळाने लेखकाला भूक तर खूपच लागलेली असायची -
  2. लेखकाचा जन्म मुंबईत गरीब कुटुंबात झाला -
  3. लेखकाचे वडील बँकेमध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते -
  4. लेखक लहानपणी खोडकर होते -

(3) स्वमत:        3

तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे ते लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[7]1.B

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

सुरुवातीचे अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला, चौऱ्याऐंशी वर्षांच्या वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेजःपुंज चेहरा, गौरवर्ण, पांढरे स्वच्छ धोतर व त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा. या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. दाजीसाहेब बोलत होते -

"रामानं सेतुबंधन केलं; पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. अगदी लहानशी खार; तिनंसुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हांला सुदैवाने लाभल्या आहेत. संक्रांतीला आणि जेष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला होता तेव्हा अनेक बांगडीवाल्यांना भेटून इथं येण्याबद्दल विनंती केली; पण कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. अब्दुलमियांनी मात्र स्वत:हून इथं येण्याचं आश्वासन दिलं आणि दरवर्षी न चुकता अब्दुलमियाँ इथं येतात. येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. वर्षातले दोन दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुलमियाँ न बोलावता दरवर्षी येतात. तपोवनातील स्त्रिया, मुलीबाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात."

(1) आकृती पूर्ण करा:   (2)

(2) रिकाम्या जागा पूर्ण करा:   (2)

  1. उताऱ्यात आलेले सणाचे नाव - ______
  2. रामाला सेतुबंधनासाठी मदत करणारी - ______

(3) स्वमत:   (3)

'तपोवनात जाऊन अब्दुलने केलेली समाजसेवा', याविषयी तुमचे विचार लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
अपठित गद्य
[4]1.C

(1) आकृतिबंध पूर्ण करा:

          निसर्ग हा माणसाचा पहिला गुरू. निसर्गातील प्रत्येक घटकापासून माणूस खूप काही शिकला आहे, शिकत आहे व पुढेही शिकू शकतो. तसं पाहिलं तर निसर्ग गुरूपेक्षा माणसाचा मित्र मानला पाहिजे असे एक मतही अगदी आग्रहाने मांडले जाते. माणसाच्या अगदी प्रारंभीच्या काळात खरी साथ दिली ती निसर्गाने. अन्न, वस्त्र व निवारा या तिन्ही गरजा निसर्गाने भागविल्या. त्याचबरोबर प्रगतीसाठी आवश्यक ती साथही दिली. शेती, शिकार तसेच उपजीविकेसाठी, गरजा भागवण्यासाठी आवश्यक ते सर्व साहाय्य निसर्गाद्वारेच मिळत गेले.

          निसर्ग माणसाला भरभरून देत राहिला, त्याचबरोबर माणूसही त्या काळात निसर्गाचा ऋणीच राहिला. पण कालांतराने माणसाच्या आशा वाढत गेल्या, माणूस सुखाच्या मागे धावत राहिला, त्याचबरोबर निसर्गाच्या प्रती असलेली ही भावना कमी होत गेली. 

(2) कारणे लिहा:

माणसाची निसर्गाच्या प्रती ऋणी असण्याची भावना कालांतराने कमी होत गेली, कारण 

  1. .....................................................
  2. .....................................................
Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग 2 : पद्य
[16]2
[8]2.A

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) रिकाम्या जागा पूर्ण करा:        2

  1. कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट - ______
  2. कवीचा जवळचा मित्र - ______

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले

कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले

तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो.

दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

(2) खालील आशयाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.        2

  1. 'रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेले.'
  2. कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद.

(3) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा:      2

  1. डोईवर -
  2. दारिद्रय -
  3. हरघडी -
  4. पोलाद -

(4) काव्यसौंदर्य:       2

कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[8]2.B | खालील दोन कवितांपैकी एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:
[8]2.B.1

खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा:

मुद्दे योगी सर्वकाळ सुखदाता
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवियित्री -  
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -  
(3) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा - जळ वरिवरी क्षाळी मळ। योगिया सबाह्य करी निर्मळ।
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण -  
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा - (i) जीवन -
(ii) मेघ - 
(iii) निर्मळ -
(iv) रसना -
Concept: undefined - undefined
Chapter:
किंवा
[8]2.B.2

खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

मुद्दे औक्षण
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(2) कवितेचा विषय  
(3) पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा. नाही मुठीमधे द्रव्य
नाही शिरेमध्ये रक्त,
काय करावे कळेना
नाही कष्टाचे सामर्थ्य.
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण -  
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. (i) औक्षण -
(ii) द्रव्य -
(iii) कल्लोळ -
(iv) शौर्य - 
Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग 3 : स्थूलवाचन
[6]3 | खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा:
[3]3.A

टिपा लिहा.

बार्क

Concept: undefined - undefined
Chapter: [0.042] मोठे होत असलेल्या मुलांनो... (स्थूलवाचन)
[3]3.B

'थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!' या विधानाची यथार्थता स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.122] जगणं कॅक्टसचं (स्थूलवाचन)
[3]3.C

'जाता अस्ताला' कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.08199999999999999] जाता अस्ताला (स्थूलवाचन)
विभाग 4 : भाषाभ्यास
[16]4
[8]4.A | व्याकरण घटकांवर आधारित कृती:
[2]4.A.1
[1]4.A.1.i

खालील वाक्याचा प्रकार ओळखा:

सुश्रुत, ओळखलंस मला?

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[1]4.A.1.ii

खालील वाक्याचा प्रकार ओळखा:

सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]4.A.2
[1]4.A.2.i

कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा:

प्रवासात भरभरून बोलावे. (आज्ञार्थी करा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4.A.2.ii

कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा:

केवढी मोठी वसाहत आहे ही! (विधानार्थी करा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]4.A.3 | खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा ( कोणतेही दोन):
[2]4.A.3.i

खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

अंगाचा तिळपापड होणे

Concept: undefined - undefined
Chapter: [0.18] व्याकरण विभाग
[2]4.A.3.ii

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

आर्जव करणे.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.18] व्याकरण विभाग
[2]4.A.3.iii

खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

गलका करणे.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.18] व्याकरण विभाग
[6]4.B | भाषिक घटकांवर आधारित कृती:
[1]4.B.1 | शब्दसंपत्ती:
[1]4.B.1.i

खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

रस्ता - 

Concept: undefined - undefined
Chapter: [0.18] व्याकरण विभाग

खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा:

शाळा -

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4.B.1.ii

खालील शब्दाचे विरुदधार्थी शब्द लिहा:

इकडे × 

Concept: undefined - undefined
Chapter:

खालील शब्दाचे विरुदधार्थी शब्द लिहा:

निंदा × 

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4.B.1.iii

वचन बदला:

शहर - 

Concept: undefined - undefined
Chapter:

वचन बदला:

गाडी - 

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4.B.1.iv

खालील शब्दाचे लिंग बदला.

लेखक -

Concept: undefined - undefined
Chapter: [0.18] व्याकरण विभाग

खालील शब्दाचे लिंग बदला.

घोडा -

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]4.B.2 | लेखननियमांनुसार लेखन:
[1]4.B.2.i

खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा:

रेखामावशिंची पावलं अधिक सूंदर आहेत.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]4.B.2.ii

खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा:

लींबाचा रस तर मला अमृतासारखा वाटु लागला.

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[2]4.B.3
[0.5]4.B.3.i

खालील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.

! - ______

Concept: undefined - undefined
Chapter: [0.18] व्याकरण विभाग
[0.5]4.B.3.ii

खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.18] व्याकरण विभाग
[0.5]4.B.3.iii

खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.

, - ______

Concept: undefined - undefined
Chapter: [0.18] व्याकरण विभाग
[0.5]4.B.3.iv

खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.

“.....” - ______

Concept: undefined - undefined
Chapter: [0.18] व्याकरण विभाग
विभाग 5 : उपयोजित लेखन 
[24]5
[6]5.A | खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा:
[6]5.A.1
[6]5.A.1.i

जागृती युवा प्रबोधिनी, काष्टी

आयोजित

विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धा

दिनांक - 10 जानेवारी, वेळ - स. 7.00

आकर्षक पारितोषिके

नावनोंदणी सुरू

वयोगट - 10 ते 15 वर्षे

संपर्क - श्री. सोहम शिरगावकर,

आयोजक, मॅरेथॉन स्पर्धा.

ई-मेल - [email protected]

इशान/इरा रेगे विदयार्थी प्रतिनिधी, (आनंदक्षण विद्यालय, काष्टी) या नात्याने प्रस्तुत स्पर्धेकरिता शाळेतील वीस विदयार्थ्यांच्या नावनोंदणीसाठी विनंती करणारे पत्र आयोजकांना लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
किंवा
[6]5.A.1.ii

जागृती युवा प्रबोधिनी, काष्टी

आयोजित

विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धा

दिनांक - 10 जानेवारी, वेळ - स. 7.00

आकर्षक पारितोषिके

नावनोंदणी सुरू

वयोगट - 10 ते 15 वर्षे

संपर्क - श्री. सोहम शिरगावकर,

आयोजक, मॅरेथॉन स्पर्धा.

ई-मेल - [email protected]

इशान/इरा रेगे विदयार्थी प्रतिनिधी, (आनंदक्षण विद्यालय, काष्टी) या नात्याने प्रस्तुत स्पर्धेच्या उत्तम नियोजनाबद्दल अभिनंदन करणारे पत्र आयोजकांना लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
किंवा
[6]5.A.2

खालील अपठित उताऱ्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

निसर्ग हा माणसाचा पहिला गुरू, निसर्गातील प्रत्येक घटकापासून माणूस खूप काही शिकला आहे, शिकत आहे व पुढेही शिकू शकतो. तसं पाहिलं तर निसर्ग गुरूपेक्षा माणसाचा मित्र मानला पाहिजे असे एक मतही अगदी आग्रहाने मांडले जाते. माणसाच्या अगदी प्रारंभीच्या काळात खरी साथ दिली ती निसर्गाने अन्न, वस्त्र व निवारा या तिन्ही गरजा निसर्गाने भागविल्या. त्याचबरोबर प्रगतीसाठी आवश्यक ती साथही दिली. शेती, शिकार तसेच उपजीविकेसाठी, गरजा भागवण्यासाठी आवश्यक ते सर्व साहाय्य निसर्गाद्वारेच मिळत गेले.

निसर्ग माणसाला भरभरून देत राहिला, त्याचबरोबर माणूसही त्या काळात निसर्गाचा ऋणीच राहिला. पण कालांतराने माणसाच्या आशा वाढत गेल्या, माणूस सुखाच्या मागे धावत राहिला, त्याचबरोबर निसर्गाच्या प्रती असलेली ही भावना कमी होत गेली.

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]5.B | खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा:
[5]5.B.1 | जाहिरातलेखन:

शालेय साहित्याच्या दुकानाची आकर्षक जाहिरात तयार करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]5.B.2 | बातमीलेखन:

माध्यमिक विद्यालय, वाई येथे 14 नोव्हेंबर रोजी 'बालदिन' साजरा झाला, या कार्यक्रमाची बातमी तयार करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]5.B.3 | कथालेखन:

खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा:

एक राजा - आळशी प्रजा - राजाची उपाययोजना - रस्त्यावर मधोमध दगड ठेवण्याची आज्ञा देणे - लोकांनी दगड पाहणे व कडेने जाणे - जबाबदार नागरिकाने दगड बाजूला करणे - धनाची पेटी सापडणे - राजाकडे नेऊन देणे - राजा आनंदी - प्रजेसमोर जबाबदार नागरिकाचा सत्कार - प्रजेस योग्य बोध होणे.
Concept: undefined - undefined
Chapter:
[8]5.C | लेखनकौशल्य (100 ते 120 शब्द):
[8]5.C.1 | खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त
भव्य वृक्षदिंडी व
वृक्षारोपण कार्यक्रम
ज्ञानसागर विद्यालय, सांगली

दि. 5 जून           वेळ - सकाळी - 8.00

प्रमुख पाहुणे - वृक्षमित्र श्री. अनिल रॉय

अध्यक्ष - श्रीमती रेखा घाटे

वरील समारंभास तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[8]5.C.2

आत्मकथन:

Concept: undefined - undefined
Chapter:
[8]5.C.3

'वीजबचत: काळाची गरज', या विषयावर तुमचे विचार लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:

Other Solutions





















Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Board Exam Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)] with solutions 2024 - 2025

     Maharashtra State Board 10th Standard Board Exam question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 10th Standard Board Exam question paper 2025 serve as a catalyst to prepare for your Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard Board Exam -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard Board Exam.

How Maharashtra State Board 10th Standard Board Exam Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×