Advertisements
Advertisements
Question
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
निरीक्षण पद्धत
Solution
मानवी वर्तनाच्या ज्या पैलूंचा प्रायोगिक पद्धतीचा अवलंब करून अभ्यास करणेशक्य नसते, अशा पैलूंचा अभ्यास करण्यासाठी निरीक्षण पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते. निरीक्षण पद्धतीत नैसर्गिक परिस्थितीत किंवा नियंत्रित परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाचा हेतुपूर्वक अभ्यास केला जातो. नैसर्गिक परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाच्या निरीक्षणास नैसर्गिक निरीक्षण म्हणतात. नियंत्रित परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाच्या निरीक्षणास नियंत्रित निरीक्षण म्हणतात. बालमानसशास्त्रज्ञ, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, सामाजिक मानसशास्त्रज्ञ निरीक्षण पध्दतीचा मोठ्या प्रमाणावार वापर करतात. सुस्पष्ट हेतूने व सुनियोजित पद्धतीनेवापर केला असता, निरीक्षण पद्धत ही शास्त्रोक्त संशोधन पद्धत मानता येते.
निरीक्षण करताना खालील घटकांचा विचार केला जातो -
- निरीक्षण पद्धतशीरपणे केले जाते.
- निरीक्षण केल्या जाणाऱ्या वर्तनांची संपूर्ण यादी तयार केली जाते.
- व्यक्तींना हे माहित नसावे की त्यांचे निरीक्षण केले जात आहे.
निरीक्षणाचे तोटेसुद्धा समाविष्ट आहेत -
- निरीक्षण ही एक वेळ खाऊ पद्धत आहे.
- निरीक्षणादरम्यान निष्पक्षता टिकवणे कठीण असते.
- कारण परिणाम संबंध स्थापित करणे कठीण असते.