English

खालील चित्राचे निरीक्षण करा. शेजारील चित्रात कोणती समस्या प्रतिबिंबित होते? ही समस्या का निर्माण झाली असावी? पाण्यासाठी पैसा व वेळ खर्च करावा लागला तर... - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील चित्राचे निरीक्षण करा.

  1. शेजारील चित्रात कोणती समस्या प्रतिबिंबित होते?
  2. ही समस्या का निर्माण झाली असावी?
  3. पाण्यासाठी पैसा व वेळ खर्च करावा लागला तर... कल्पना करा व लिहा.
  4. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल?
  5. या समस्येसंदर्भात घोषवाक्ये तयार करा.
Answer in Brief

Solution

  1. पाणीटंचाईची गंभीर समस्या प्रतिबिंबित होते.
  2. पाण्याचे योग्यरीत्या संचयन न करणे, त्याचा अनुचित उपयोग, पाणी दूषित करणे आणि ढालीवरील पाण्याचा प्रवाह रोखणे यामुळे ही समस्या निर्माण झाली.
  3. पाण्यासाठी वारेमाप पैसा खर्च करावा लागला, तर इतर गरजेच्या गोष्टी घेण्यास त्रास होईल आणि महिन्याचे पैसे खर्च करण्याचे कोष्टक बिघडून जाईल. पाण्यासाठी रांगेत उभे राहिल्यामुळे वेळेचा अपव्यय होईल. इतर कामांसाठी वेळ अपुरा पडेल. माणसाच्या राहणीमानावर विपरीत परिणाम होईल.
  4. पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी पुढील उपाय करावे लागतील:
    • पाण्याची बचत करणे.
    • पाण्याचा गैरवापर टाळणे.
    • पाण्याचा योग्य साठा करणे.
    • जलप्रदूषण टाळणे.
    • पाणी वाया न दवडणे.
    • पाण्याविषयी जनजागृती तयार करणे.
    • पाण्याचे महत्त्व जनमानसाला पटवून देणे.
  5. घोषवाक्ये:
    1. पाण्याचा गैरवापर करू नका.
    2. जलप्रदूषण थांबवा.
    3. पाणी साठवा, पाणी वाचवा.
    4. पाणी वाया दवडू नका.
    5. पाण्याची बचत म्हणजे जीवनाची बचत.
shaalaa.com
हास्यचित्रांतली मुलं
  Is there an error in this question or solution?
Chapter 5.2: हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन) - स्वाध्याय [Page 21]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
Chapter 5.2 हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)
स्वाध्याय | Q १. | Page 21

RELATED QUESTIONS

खालील फरक लिहा.

       व्यंगचित्र              हास्यचित्र      
   

‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे’, हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.


‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे’, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.


वैशिष्ट्ये लिहा.


‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे’, हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.


प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यासह स्वत:च्या शब्दांत लिहा.


‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, यासंबंधी तुमचे विचार लिहा.


‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे’, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×