English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यासह स्वत:च्या शब्दांत लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यासह स्वत:च्या शब्दांत लिहा.

Answer in Brief

Solution

मला ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी काढलेले लहान मुलीचे व्यंगचित्र खूपच आवडते. त्यांची रेषा भूमितीय असूनही अत्यंत आकर्षक आणि ठळक आहे. लहान रोपटे आणि लहान मुलगी यांच्यातील भावबंध त्यांनी अचूकपणे टिपला आहे. चित्रातील लहान मुलगी भलीमोठी दुधाची बाटली सावरून, कमरेत वाकून रोपट्याला पाणी घालत आहे. तिच्या चेहऱ्यावर निरागस भाव उमटले आहेत आणि तिच्या डोळ्यांतून ओतप्रोत माया दिसत आहे. रोपट्याला लहान बाळ समजून त्याची काळजी घेणे, हे चित्र आईचे ममत्व आणि आपुलकी दर्शवते. चित्रकार शि. द. फडणीस यांनी रोपट्याला लहान बाळासारखे दाखवून एक सर्जनशील संदेश दिला आहे. लहान मुलीच्या कृतीतून रोपट्याची आई होण्यातील ममत्व आणि निरागस शालीनता व्यक्त होते. खरंच, हे व्यंगचित्र एक भावपूर्ण कलाकृती आहे. शि. द. फडणीस यांच्या कुशल रेखाटनामुळे आणि भावपूर्ण चित्रणामुळे हे चित्र हृदयाला भिडते.

shaalaa.com
हास्यचित्रांतली मुलं
  Is there an error in this question or solution?
Chapter 5.2: हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन) - स्वाध्याय [Page 20]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
Chapter 5.2 हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)
स्वाध्याय | Q ४. | Page 20
Balbharati Marathi 9 Standard Maharashtra State Board
Chapter 8.2 हास्यचित्रांतली मुलं
स्वाध्याय | Q ४. | Page 34

RELATED QUESTIONS

खालील फरक लिहा.

       व्यंगचित्र              हास्यचित्र      
   

‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे’, हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.


‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे’, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.


वैशिष्ट्ये लिहा.


‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे’, हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.


‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, यासंबंधी तुमचे विचार लिहा.


‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे’, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.


खालील चित्राचे निरीक्षण करा.

  1. शेजारील चित्रात कोणती समस्या प्रतिबिंबित होते?
  2. ही समस्या का निर्माण झाली असावी?
  3. पाण्यासाठी पैसा व वेळ खर्च करावा लागला तर... कल्पना करा व लिहा.
  4. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल?
  5. या समस्येसंदर्भात घोषवाक्ये तयार करा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×