Advertisements
Advertisements
Question
खालील फरक स्पष्ट करा.
भाग आणि कर्जरोखे
Distinguish Between
Solution
मुद्दे | भाग | कर्जरोख | |
१. | अर्थ | भाग हा कंपनीच्या भाग भांडवलाचा एक छोटासा घटक आहे. यालाच मालकीच्या प्रतिभूती असे म्हणतात. | कर्जरोखे हे कर्जाचे प्रमाणपत्र आहे. याला कर्जाऊ प्रतिभूती असे म्हणतात. |
२. | धारकाचे स्थान | भाग भांडवल हे मालकीचे भांडवल आहे. भागधारक हा कंपनीचा ‘मालक’ आहे. | कर्जरोखे हे कर्जाऊ भांडवल आहे. कर्जरोखेधारक हा कंपनीचा ‘धनको’ आहे. |
३. | स्वरूप | हे कायमस्वरूपी भांडवल आहे कंपनीच्या कार्यकाळात हे ‘भाग’ परत केले जात नाहीत. | हे ‘तात्पुरत्या’ स्वरूपाचे भांडवल आहे. ठरावीक मुदतीनंतर कर्जरोखे परत केले जातात. |
४. | मतदानाचे हक्क | भागधारक हे मालक असून ते मतदान करू शकतात व कंपनीच्या व्यवस्थापनात सहभागी होऊ शकतात. | कर्जरोखेधारक हे ‘धनको’ असल्यामुळे मतदान करू शकत नाहीत. त्यांना व्यवस्थापनेत सहभाग घेता येत नाही. |
५. | गुंतवणुकीवरील परतावा | भागधारकांना लाभांश दिला जातो. समहक्क भागांना अस्थिर लाभांशाचा दर तर अग्रहक्क भागांना स्थिर दराने लाभांश दिला जातो. | कर्जरोखे धारकांना निश्चित दाराने व्याज दिले जाते. कंपनीने नफा मिळविला नसेल तरीही व्याज द्यावेच लागते. |
६. | तारण | भाग भांडवल हे असुरक्षित भांडवल आहे. भागधारकांना तारण दिले जात नाही. | कर्जरोखे भांडवल हे कर्जाऊ भांडवल असल्यामुळे कंपनीची मालमत्ता तारण म्हणून दिलेली असते. |
७. | वाटप करण्याची वेळ | भागांचे वाटप कंपनी स्थापनेच्या नंतर प्रारंभिक टप्प्यामध्ये केले जाते. | कंपनीच्या नंतरच्या टप्प्यांवर जेव्हा कंपनीकडे तारण ठेवण्यासाठी मालमत्ता असते तेव्हा यांचे वाटप करता येते. |
८. | उपयुक्तता | दीर्घकालीन भांडवलासाठी ‘भाग’ हा उत्तम पर्याय आहे. | मध्यमकालीन भांडवलासाठी कर्जरोखे हा उत्तम पर्याय आहे. |
९. | प्रकार | भागांचे दोन प्रकार आहेत- अ) समहक्क भाग ब) अग्रहक्क भाग |
कर्जरोख्यांचे प्रकार असे आहेत- १) नोंदविलेले कर्जरोखे २) वाहक कर्जरोखे ३) तारण असलेले कर्जरोखे ४) तारण नसलेले कर्जरोखे ५) परतफेडीचे कर्जरोखे ६) न परतफेडीचे कर्जरोखे ७) परिवर्तनीय कर्जरोखे ८) अपरिवर्तनीय कर्जरोखे |
१०. | कंपनी विसर्जनाचे वेळी स्थान | कंपनी विसर्जनाच्या वेळी भांडवल परतफेडीसाठी भागधारक सर्वात शेवटचे दावेदार असतात. | कर्जरोखेधारक कंपनी विसर्जनाच्या वेळी भांडवल परतफेडीसाठी भागधारकांच्या आधीचे दावेदार असतात. |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?