Advertisements
Advertisements
Question
खालील फरक स्पष्ट करा:
भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण
Distinguish Between
Solution
भागांचे हस्तांतरण | भागांचे संक्रमण |
१. अर्थ | |
भागांचे हस्तांतरण म्हणजे स्वेच्छेने किंवा हेतुपूर्वक खरेदीदाराशी करार करून भागांची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणे. | भागांचे संक्रमण म्हणजे कायद्याच्या तरतुदीनुसार भागधारकाच्या मालकीचे भाग त्याच्या कायदेशीर प्रतिनिधीकडे हस्तांतरित होणे. भागधारकाच्या मृत्यूमुळे, दिवाळखोरी किंवा मानसिक असंतुलनामुळे हे संक्रमण केले जाते. |
२. केव्हा केले जाते? | |
भागधारकाला जर समभाग विकायचे असतील किंवा ते भेट म्हणून द्यावयाचे असतील तर भाग हस्तांतरण होते. | जेव्हा भागधारकाचा मृत्यू होतो किंवा भागधारक दिवाळखोर होतो किंवा त्याचे मानसिक संतुलन बिघडते तेव्हा भागांचे संक्रमण होते. |
३. कृतीचे स्वरूप | |
ही भागधारकाने स्वेच्छेन केलेली कृती आहे. | ही सक्तीची कृती आहे. ही कायद्याच्या कृतीनुसार केली जाते. |
४. सहभागी पक्ष | |
समभागांच्या हस्तांतरणामध्ये दोन पक्षांचा सहभाग असतो. एक सदस्य ज्याला हस्तांतरक म्हटले जाते तो व दुसरा हस्तांतरितीस म्हणजे खरेदीदार असतो. | यामध्ये एकाच पक्षाचा समावेश असतो तो म्हणजे मृत्यू झालेल्या सदस्याने नामनिर्देशित केलेली व्यक्ती होय. |
५. हस्तांतरणाचे दस्तऐवज | |
हस्तांतरण दस्तऐवजाची हस्तांतरणासाठी गरज असते. हा हस्तांतरिती व हस्तांतरक यांच्या दरम्यानचा करार आहे. | यासाठी कोणत्याही हस्तांतरणाच्या दस्तऐवजाची गरज नसते. |
६. पुढाकार | |
हस्तांतरणाच्या प्रक्रियेमध्ये हस्तांतरक पुढाकार घेतो. | भाग संक्रमणाची प्रक्रिया ही कायदेशीर वारसदार किंवा कायदेशीर प्रतिनिधीकडून केली जाते. |
७. मोबदला | |
समभागांचे हस्तांतरण भागधारक, पैशाचा मोबदला मिळावा म्हणून करतो म्हणजेच खरेदीदाराला समभागांसाठी रक्कम अदा करावी लागते. याला अपवाद म्हणजे जेव्हा भागांना ‘भेट’ म्हणून दिले जाते. | यामध्ये मोबदल्याचा प्रश्न येत नाही. कायदेशीर वारस किंवा कायदेशीर प्रतिनिधींना समभागांसाठी रक्कम अदा करण्याची गरज नसते. |
८. उत्तरदायित्व | |
हस्तांतरकाची जबाबदारी भागांचे हस्तांतरण झाले की संपते. | समभागांचे संक्रमण झाले तरी मूळचे उत्तरदायित्व तसेच चालू राहते. |
९. मुद्रांक शुल्क | |
मुद्रांक शुल्क भागांच्या बाजार मूल्यांवर आधारित असते. | भाग संक्रमणात कोणतेही मुद्रांक शुल्क भरावे लागत नाही. |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?