Advertisements
Advertisements
Question
खालील फरक स्पष्ट करा:
अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश
Distinguish Between
Solution
मुद्दे | अंतिम लाभांश | अंतरिम लाभांश | |
१. | अर्थ | अंतिम लाभांश आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर घोषित केला जातो व वाटप केले जाते. | अंतरिम लाभांश, दोन वार्षिक सभांच्या मधल्या काळात घोषित केला जातो व दिला जातो. |
२. | कोण जाहीर करतो? | अंतिम लाभांश संचालक मंडळ शिफारस करते व भागधारक वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित करतात. | संचालक मंडळाच्या सभेत संचालक मंडळ निर्णय घेते व घोषित करते. |
३. | अधिकृतता/अधिकृत परवानगी | अंतिम लाभांश घोषित करण्यासाठी नियमावलीच्या तरतुदींची/अधिकारपत्राची आवश्यकता नाही. | नियमावलीने दिलेल्या अधिकारानुसार अंतरिम लाभांश घोषित केला जातो. |
४. | केव्हा घोषित केला जातो? | कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घोषित केला जातो. | दोन वार्षिक सभांच्या मधल्या काळात घोषित केला जातो. |
५. | लाभांश दर | अंतिम लाभांश दर अंतरिम लाभांश दरापेक्षा जास्त असतो. | अंतरिम लाभांशाचा दर अंतिम लाभांश दरापेक्षा कमी असतो. |
६. | स्त्रोत | अंतिम लाभांश जाहीर करण्यासाठी वेगवेगळ्या स्रोताचा अवलंब केला जातो. आर्थिक वर्षाच्या नफ्यातून, संचित राखीव निधीतून, भांडवली नफ्यातून, केंद्र सरकारने लाभांश वाटपासाठी पुरविलेल्या निधीतून. | चालू आर्थिक वर्षातील आवश्यक नफा प्राप्ती उपलब्ध असल्यास अंतरिम लाभांश जाहीर केला जातो. |
७. | लेखासंबंधी बाबी | हा अंतिम लेखे तयार केल्यानंतर जाहीर केला जातो. | कंपनीचे अंतिम लेखे तयार करण्यापूर्वी जाहीर केला जातो. |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?