Advertisements
Advertisements
Question
खालील फरक स्पष्ट करा:
प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार
Distinguish Between
Solution
मुद्दे | प्राथमिक बाजार | दुय्यम बाजार | |
१. | अर्थ | कंपनीच्या नवीन प्रतिभूतींची विक्री प्राथमिक बाजारात केली जाते. | अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतींच्या पुनर्विक्रीचा व्यवहार दुय्यम बाजारात केला जातो. |
२. | गुंतवणुकीची पद्धत | प्रतिभूतींची थेट कंपनीकडून खरेदी केल्याने ही थेट गुंतवणुकीची पद्धत म्हणून ओळखली जाते. | प्रतिभूतींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार गुंतवणूकदारांमध्ये आपापसांत होत असल्याने ही अप्रत्यक्ष गुंतवणुकीची पद्धत म्हणून ओळखली जाते. |
३. | कृतिशील घटक | कंपनी आणि गुंतवणूकदार हे या बाजारात व्यवहार करणारे कृतिशील घटक असतात. | फक्त गुंतवणूकदार हेच या बाजारातील कृतिशील घटक असतात. |
४. | मध्यस्थ | या बाजारात भाग विमेकरी मध्यस्थ म्हणून असतात. | या बाजारात प्रतिभूतींचे दलाल मध्यस्थ म्हणून काम पाहतात. |
५. | प्रतिभूतींचे मूल्य | प्राथमिक बाजारात कंपनीने ठरविल्याप्रमाणे प्रतिभूतींंचे मूल्य निश्चित होते. | दुय्यम बाजारात मागणी व पुरवठा यानुसार प्रतिभूतींच्या किमतीत चढ-उतार होत असतात. |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?