मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील फरक स्पष्ट करा: भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील फरक स्पष्ट करा:

भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण

फरक स्पष्ट करा

उत्तर

भागांचे हस्तांतरण भागांचे संक्रमण
१. अर्थ
भागांचे हस्तांतरण म्हणजे स्वेच्छेने किंवा हेतुपूर्वक खरेदीदाराशी करार करून भागांची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणे. भागांचे संक्रमण म्हणजे कायद्याच्या तरतुदीनुसार भागधारकाच्या मालकीचे भाग त्याच्या कायदेशीर प्रतिनिधीकडे हस्तांतरित होणे. भागधारकाच्या मृत्यूमुळे, दिवाळखोरी किंवा मानसिक असंतुलनामुळे हे संक्रमण केले जाते.
२. केव्हा केले जाते?
भागधारकाला जर समभाग विकायचे असतील किंवा ते भेट म्हणून द्यावयाचे असतील तर भाग हस्तांतरण होते. जेव्हा भागधारकाचा मृत्यू होतो किंवा भागधारक दिवाळखोर होतो किंवा त्याचे मानसिक संतुलन बिघडते तेव्हा भागांचे संक्रमण होते.
३. कृतीचे स्वरूप
ही भागधारकाने स्वेच्छेन केलेली कृती आहे. ही सक्तीची कृती आहे. ही कायद्याच्या कृतीनुसार केली जाते.
४. सहभागी पक्ष
समभागांच्या हस्तांतरणामध्ये दोन पक्षांचा सहभाग असतो. एक सदस्य ज्याला हस्तांतरक म्हटले जाते तो व दुसरा हस्तांतरितीस म्हणजे खरेदीदार असतो. यामध्ये एकाच पक्षाचा समावेश असतो तो म्हणजे मृत्यू झालेल्या सदस्याने नामनिर्देशित केलेली व्यक्ती होय.
५. हस्तांतरणाचे दस्तऐवज
हस्तांतरण दस्तऐवजाची हस्तांतरणासाठी गरज असते. हा हस्तांतरिती व हस्तांतरक यांच्या दरम्यानचा करार आहे. यासाठी कोणत्याही हस्तांतरणाच्या दस्तऐवजाची गरज नसते.
६. पुढाकार
हस्तांतरणाच्या प्रक्रियेमध्ये हस्तांतरक पुढाकार घेतो. भाग संक्रमणाची प्रक्रिया ही कायदेशीर वारसदार किंवा कायदेशीर प्रतिनिधीकडून केली जाते.
७. मोबदला
समभागांचे हस्तांतरण भागधारक, पैशाचा मोबदला मिळावा म्हणून करतो म्हणजेच खरेदीदाराला समभागांसाठी रक्कम अदा करावी लागते. याला अपवाद म्हणजे जेव्हा भागांना ‘भेट’ म्हणून दिले जाते. यामध्ये मोबदल्याचा प्रश्न येत नाही. कायदेशीर वारस किंवा कायदेशीर प्रतिनिधींना समभागांसाठी रक्कम अदा करण्याची गरज नसते.
८. उत्तरदायित्व
हस्तांतरकाची जबाबदारी भागांचे हस्तांतरण झाले की संपते. समभागांचे संक्रमण झाले तरी मूळचे उत्तरदायित्व तसेच चालू राहते.
९. मुद्रांक शुल्क
मुद्रांक शुल्क भागांच्या बाजार मूल्यांवर आधारित असते. भाग संक्रमणात कोणतेही मुद्रांक शुल्क भरावे लागत नाही.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×