English

खालील काव्यपंक्तीचा अर्थ लिहा. दुरिताचें तिमिर जावो - ______ - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील काव्यपंक्तीचा अर्थ लिहा.

दुरिताचें तिमिर जावो - ______  

One Line Answer

Solution

दुरिताचें तिमिर जावो - (दुरित म्हणजे दुष्कर्म.) सर्व दुष्कर्मांचा अंधार नष्ट होऊ दे.

shaalaa.com
सर्व विश्वचि व्हावे सुखी
  Is there an error in this question or solution?
Chapter 20.1: सर्व विश्वचि व्हावे सुखी - कृती [Page 85]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 20.1 सर्व विश्वचि व्हावे सुखी
कृती | Q (४) (आ) | Page 85

RELATED QUESTIONS

खालील चौकट पूर्ण करा.

संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्वप्रार्थना - ______ 


खालील चौकट पूर्ण करा.

मानवी सुखदु:खाशी सहृदयतेने समरस होणे - ______ 


खालील चौकट पूर्ण करा.

सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत - ______ 


खालील चौकट पूर्ण करा.

संत तुकारामांचे जीवनसूत्र - ______


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


फरक सांगा.

सामान्य माणसाचे मागणे  संतांचे मागणे
(अ) (अ)
(आ) (आ)

खालील काव्यपंक्तीचा अर्थ लिहा.

जे खळांची व्यंकटी सांडो - ______ 


खालील तक्ता पूर्ण करा. त्यासाठी कंसातील शब्दांचा उपयोग करा. 

(नम्रता, मैत्रभाव, विश्वकल्याण, स्वप्रयत्न, सहकार्य) 

अ. क्र. काव्यांश संतांचे नाव काव्यांशातून व्यक्त झालेली संतांची इच्छा/भावना
(१) ‘सर्व विश्वचि व्हावे सुखी’ ______ ______
(२) ‘अहंकाराचा वारा न लागो राजसां’ ______ ______
(३) ‘सर्वांभूती भगवद्भावो’ ______ ______
(४) ‘एक एका साह्य करूं। अवघे धरूं सुपंथ’ ______ ______
(५) ‘स्वत:चा उद्धार करा प्रयत्नाने’ ______ ______

सर्व संतांच्या प्रार्थनेमधील सामाईक सूत्र तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.


‘भूतां परस्परें पडो। मैत्र जीवाचें।’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.


या पाठातून (सर्व विश्वचि व्हावे सुखी) तुम्ही काय शिकलात, ते तुमच्या शब्दांत लिहा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. खालील आकृती पूर्ण करा. (२)

जोड्या लावा.

'अ' गट 'ब' गट
i. संतांच्या साहित्याचा आत्मा महाराष्ट्र
ii. संतांची भूमी विश्वकल्याण
iii. सर्व संतांच्या मागणीतील एकमेव गोष्ट मानवता
iv. सर्व संतांच्या प्रार्थनेतील आविष्कार भक्ती व समाजप्रबोधन, समाजकल्याण
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणजे सत्पुरुष. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति। देह कष्टविती परउपकारें।' ही संतांची खरी भूमिका आहे. संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, समाजकल्याण हा आहे. संत परमेश्वराकडे स्वत:साठी काहीही मागत नाहीत; परंतु 'बुडतां हे जन न देखवे डोळां। येतो कळवळा म्हणउनि।।' यासाठी श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, वारकरी संप्रदायातील सर्व संत, संत कबीर, गुरुनानक, संत महात्मा बसवेश्वर अशा सर्वच संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे, गुरूंकडे साकडे घातले आहे. संत ज्ञानेश्वरांपासून अगदी आधुनिक काळातील संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्वच संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहेत. त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण, माणुसकी व सहृदयता यांचे प्रतिबिंब दिसते. माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे, कारण 'मी' पासून 'आम्ही' या संकल्पनेप्रमाणे 'अवघे विश्वचि माझे घर', 'वसुधैव कुटुम्बकम्' या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहेत. सर्व संतांच्या प्रार्थनेतील साधर्म्याचा धागा 'विश्वकल्याण' याचा परिचय या पाठातून करून घेऊया.

2. एका वाक्यात उत्तर लिहा. (२)

  1. विश्वकल्याण कधी शक्य आहे?
  2. संतांच्या साहित्यातून प्रकट झालेल्या संकल्पना सांगा.

3. स्वमत. (३)

'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति। देह कष्टविती परउपकारें' या चरणाचा अर्थ उदाहरणांसह स्पष्ट करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. (२)

१) ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसामाणसांना जोडणारा जिव्हाळा जपायचा असेल तर _____________

  1. माणसाने एकमेकांशी अजिबात बोलले नाही पाहिजे.
  2. मन सुसंस्कृत असायला हवे.
  3. दररोज एकमेकांच्या घरी जावे.
  4. विज्ञानाची मदत घ्यावी.

२) जगण्याचे खरे सूत्र ___________

  1. स्वत: चांगले जगावे.
  2. शेजारी सांगितले तसे जगावे.
  3. कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जगावे.
  4. सगळ्यांना सावली देत जगावे.
           आजच्या विज्ञानयुगात विज्ञान-तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले आहे. संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात 'हे विश्वचि माझे घर आहे,' ही कल्पना केली होती याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो; पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसामाणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवला आहे. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे. नाहीतर, राक्षसी वृत्ती निर्माण होते. ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात; पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी याकडे लक्ष वेधले आहे.
           वडाचे झाड कायम नम्र असते. ते सगळ्यांना सावली देते. त्याची सावली सर्वांना हवीहवीशी वाटते. झाडे स्वत: ऊन सोसतात. लोकांना सावली देतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून हे आनंदाने पाहतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले, तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचे खरे सूत्र आहे. स्वत: चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसर्याचाही विचार करावा; असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल. सुखी होईल.

2. पुढील घटकांची प्रत्येकी दोन वैशिष्ट्ये लिहा. (२)

  1. झाडे -
  2. पर्वत -

3. स्वमत. (३)

वरील उताऱ्याच्या आधारे विज्ञान हवा की निसर्ग, का ते थोडक्यात स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×
Our website is made possible by ad-free subscriptions or displaying online advertisements to our visitors.
If you don't like ads you can support us by buying an ad-free subscription or please consider supporting us by disabling your ad blocker. Thank you.