Advertisements
Advertisements
Question
सर्व संतांच्या प्रार्थनेमधील सामाईक सूत्र तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.
Solution
संत स्वत:पलीकडे जाऊन संपूर्ण जगाकडे पाहतात, त्यांना सर्व प्राणिमात्रांबद्दलच कळवळा वाटतो. त्यांच्या मनात आपपरभाव नसतो. त्यांना सर्व माणसे समान वाटतात; सारखीच प्रिय वाटतात. म्हणून संत महात्मे सर्व मानवजातीचे कल्याण इच्छितात. म्हणूनच 'जो जे वांछील तो ते लाहो' असे ज्ञानदेव म्हणतात. नामदेवांना वाटते की, सर्वांच्या मनातला अहंकार नष्ट व्हावा. म्हणजे सगळेजण एकमेकाला स्वत:च्या हृदयात सामावून घेतील. संत एकनाथांना सर्वांच्याच ठिकाणी भगवद्भाव आढळतो. संत तुकाराम महाराज सर्वांनी एकमेकाला साहाय्य करीत परमेश्वर चरणांपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतात. सर्वच संत स्वत:साठी काहीही मागत नाहीत. ते समस्त मानवजातीसाठी, समस्त प्राणिमात्रांसाठी परमेश्वराकडे हात जोडून प्रार्थना करतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील चौकट पूर्ण करा.
संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्वप्रार्थना - ______
खालील चौकट पूर्ण करा.
मानवी सुखदु:खाशी सहृदयतेने समरस होणे - ______
खालील चौकट पूर्ण करा.
संत तुकारामांचे जीवनसूत्र - ______
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
खालील काव्यपंक्तीचा अर्थ लिहा.
दुरिताचें तिमिर जावो - ______
खालील तक्ता पूर्ण करा. त्यासाठी कंसातील शब्दांचा उपयोग करा.
(नम्रता, मैत्रभाव, विश्वकल्याण, स्वप्रयत्न, सहकार्य)
अ. क्र. | काव्यांश | संतांचे नाव | काव्यांशातून व्यक्त झालेली संतांची इच्छा/भावना |
(१) | ‘सर्व विश्वचि व्हावे सुखी’ | ______ | ______ |
(२) | ‘अहंकाराचा वारा न लागो राजसां’ | ______ | ______ |
(३) | ‘सर्वांभूती भगवद्भावो’ | ______ | ______ |
(४) | ‘एक एका साह्य करूं। अवघे धरूं सुपंथ’ | ______ | ______ |
(५) | ‘स्वत:चा उद्धार करा प्रयत्नाने’ | ______ | ______ |
‘भूतां परस्परें पडो। मैत्र जीवाचें।’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
या पाठातून (सर्व विश्वचि व्हावे सुखी) तुम्ही काय शिकलात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. खालील आकृती पूर्ण करा. (२)
जोड्या लावा.
'अ' गट | 'ब' गट |
i. संतांच्या साहित्याचा आत्मा | महाराष्ट्र |
ii. संतांची भूमी | विश्वकल्याण |
iii. सर्व संतांच्या मागणीतील एकमेव गोष्ट | मानवता |
iv. सर्व संतांच्या प्रार्थनेतील आविष्कार | भक्ती व समाजप्रबोधन, समाजकल्याण |
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणजे सत्पुरुष. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति। देह कष्टविती परउपकारें।' ही संतांची खरी भूमिका आहे. संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, समाजकल्याण हा आहे. संत परमेश्वराकडे स्वत:साठी काहीही मागत नाहीत; परंतु 'बुडतां हे जन न देखवे डोळां। येतो कळवळा म्हणउनि।।' यासाठी श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, वारकरी संप्रदायातील सर्व संत, संत कबीर, गुरुनानक, संत महात्मा बसवेश्वर अशा सर्वच संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे, गुरूंकडे साकडे घातले आहे. संत ज्ञानेश्वरांपासून अगदी आधुनिक काळातील संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्वच संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहेत. त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण, माणुसकी व सहृदयता यांचे प्रतिबिंब दिसते. माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे, कारण 'मी' पासून 'आम्ही' या संकल्पनेप्रमाणे 'अवघे विश्वचि माझे घर', 'वसुधैव कुटुम्बकम्' या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहेत. सर्व संतांच्या प्रार्थनेतील साधर्म्याचा धागा 'विश्वकल्याण' याचा परिचय या पाठातून करून घेऊया. |
2. एका वाक्यात उत्तर लिहा. (२)
- विश्वकल्याण कधी शक्य आहे?
- संतांच्या साहित्यातून प्रकट झालेल्या संकल्पना सांगा.
3. स्वमत. (३)
'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति। देह कष्टविती परउपकारें' या चरणाचा अर्थ उदाहरणांसह स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. एका शब्दात उत्तर लिहा. (२)
- मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना म्हणजे.
- संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेला ग्रंथ.
संत ज्ञानेश्वरांच्या 'ज्ञानेश्वरी' या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो. अशी प्रार्थना आपल्यापुरती मर्यादित असते; परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची विनंती केली. संत ज्ञानेश्वर 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होते, तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, ’’आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात. तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा“, यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, ’’मी देवापाशी आधी मागितले आहे. ते, म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी.“ संत निवृत्तीनाथ म्हणाले, ’’ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे. तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटले आहे ते आता विस्ताराने सांगा.“ यातून पसायदान निर्माण झाले. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती. निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोप्याने राहतात. त्यांचा दाखला देत, 'आपणही गुण्यागोविंदाने राहावे', हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले. |
2. कोष्टक पूर्ण करा. (२)
3. स्वमत. (३)
निसर्गातील सर्व घटकाप्रमाणे माणसाने पण गुण्यागोविंदाने राहण्यासाठी प्रत्येकाने काय केले पाहिजे असे तुम्हांला वाटते.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. (२)
१) ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसामाणसांना जोडणारा जिव्हाळा जपायचा असेल तर _____________
- माणसाने एकमेकांशी अजिबात बोलले नाही पाहिजे.
- मन सुसंस्कृत असायला हवे.
- दररोज एकमेकांच्या घरी जावे.
- विज्ञानाची मदत घ्यावी.
२) जगण्याचे खरे सूत्र ___________
- स्वत: चांगले जगावे.
- शेजारी सांगितले तसे जगावे.
- कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जगावे.
- सगळ्यांना सावली देत जगावे.
आजच्या विज्ञानयुगात विज्ञान-तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले आहे. संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात 'हे विश्वचि माझे घर आहे,' ही कल्पना केली होती याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो; पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसामाणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवला आहे. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे. नाहीतर, राक्षसी वृत्ती निर्माण होते. ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात; पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी याकडे लक्ष वेधले आहे. वडाचे झाड कायम नम्र असते. ते सगळ्यांना सावली देते. त्याची सावली सर्वांना हवीहवीशी वाटते. झाडे स्वत: ऊन सोसतात. लोकांना सावली देतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून हे आनंदाने पाहतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले, तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचे खरे सूत्र आहे. स्वत: चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसर्याचाही विचार करावा; असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल. सुखी होईल. |
2. पुढील घटकांची प्रत्येकी दोन वैशिष्ट्ये लिहा. (२)
- झाडे -
- पर्वत -
3. स्वमत. (३)
वरील उताऱ्याच्या आधारे विज्ञान हवा की निसर्ग, का ते थोडक्यात स्पष्ट करा.