Advertisements
Advertisements
Question
खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा
Solution
'आकाशी झेप घे रे' कवितेद्वारे कवी जगदीश खेबुडकर यांनी स्वकष्टाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या भोवतीचे सुरक्षिततेचे व परावलंबित्वाचे कवच भेदा. तसेच, स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून यशाची शिखरे सर करा, असा संदेश कवीने दिला आहे.
कवी मानवाला सुख, वैभवाचा सोन्याचा पिंजरा सोडून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आकाशात झेप घेण्याची स्फूर्ती देत आहेत. ते मानवाला स्वसामर्थ्याची जाणीव करून देताना म्हणतात, की हे पाखरा (माणसा), हा सोन्याचा पिंजरा म्हणजेच आयते मिळालेले सुख, वैभव सोडून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आकाशी झेप घे, सज्ज हो. स्वत:च्या क्षमता ओळखून पुढे पुढे जात राहा. तू भौतिक सुखे, माया, मोह यांमध्ये अडकला आहेस. या सुखाचे फळ चाखून तू तृप्त होत आहेस. तुझ्या शरीरास या ऐषारामाची चटकच लागली आहे; पण या ऐश्वर्याचा कुठपर्यंत आसरा घेशील? त्यामुळे मोह सोड. येथे कवी श्रमप्रतिष्ठेचे मूल्य वाचकांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करतात.
प्रस्तुत कविता भावगीत या रचनाप्रकारात मोडते. येथे पाखराचे प्रतीक वापरल्यामुळे कवितेचे आशयसाैंदर्य वाढले आहे. साधे, सोपे; परंतु अर्थगर्भ शब्द वापरल्यामुळे कविता खुलली आहे. कवितेच्या भाषेत एक सहजता व गोडवा आहे. सुखलोलुप म्हणजेच सुखासाठी लोलुप (लोभी) या सामासिक शब्दाच्या वापरामुळे अर्थ वाचकाच्या मनाला भिडतो. माया, खाया, काया या शब्दांमुळे येथे यमक अलंकार साधला गेला आहे. व, ळ, ल अशा अक्षरांच्या पुनरावृत्तीतून येथे अनुप्रास अलंकार साधला गेला आहे. त्यामुळे, कविता लयबद्ध व नादमय झाली आहे. कविता वाचल्यावर मनात उत्साह हा स्थायिभाव निर्माण होऊन वीररसाचा अनुभव येतो.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
सुखलोलुप झाली काया म्हणजे ______
पिंजरा सोडून झेप घेतल्याने ______
तुलना करा.
पिंजऱ्यातील पोपट | पिंजऱ्याबाहेरील पोपट |
______ | ______ |
______ | ______ |
______ | ______ |
कवीने (आकाशी झेप घे रे) यशप्राप्तीच्या संदर्भांत सांगितलेली सुवचने लिहा.
____________
____________
खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले’
‘आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा’, या ओळीतील मथितार्थ स्पष्ट करा.
‘स्वसामर्थ्याची जाणीव’ हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे, हे विधान स्पष्ट करा.
‘घर प्रसन्नतेने नटले’, याची प्रचिती देणारा तुमचा अनुभव लिहा.
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
आकाशी झेप घे रे
- प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. (२)
- प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. (२)
1. कलंक - ___________
2. सकलकामना - __________
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
आकाशी झेप घे रे
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (२)
खालील मुद्दयांचा आधारे 'आकाशी झेप घे रे' या कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
क्र. | प्रश्न | उत्तर |
१ | कवी किंवा कवयित्रीचे नाव. | |
२ | कवितेचा विषय. | |
३ | प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. उदा. व्यथा, वैभव सुखलोलुप, साजिरा | |
४ | कवितेतून मिळणारा संदेश. | |
५ | प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा. | |
६ | कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा. |
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
आकाशी झेप घे रे
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. चौकटी पूर्ण करा. (2)
- कष्टाने मिळणारे - ______
- घामातून फुलणारे - ______
आकाशी झेप घे रे पाखरा तुजभवती वैभव, माया तुज पंख दिले देवाने कष्टाविण फळ ना मिळते घामातुन मोती फुलले |
2. योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा. (2)
i. सुखलोलुप झाली काया म्हणजे ______
(अ) सुखाचा तिरस्कार वाटतो.
(ब) सुखाबद्दल प्रेम वाटते.
(क) सुखाचे आकर्षण वाटते.
(ड) सुख उपभोगण्याची सवय लागते.
ii. पिंजरा सोडून झेप घेतल्याने ______
(अ) काया सुखलोलुप होते.
(ब) पाखराला आनंद होतो.
(क) आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते.
(ड) आकाशाची प्राप्ती होते.
3. खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (2)
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा
4. काव्यसौंदर्य (2)
‘आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा’
या ओळींमधील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.