English

खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. आकाशी झेप घे रे प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. (२) प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

आकाशी झेप घे रे

  1. प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. (२)
  2. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. (२)
    1. कलंक - ___________
    2. सकलकामना - __________
Answer in Brief

Solution

  1. कष्ट, स्वावलंबन यांचा संदेश देणारी ही कविता अतिशय प्रेरणादायी आहे. साधीसोपी भाषा, नादमयी शब्द यांमुळे ही कविता सहजपणे समजते. मानवाला स्वक्षमतांची जाणीव करून देण्यासाठी कवीने पाखराच्या समर्पक प्रतीकाचा वापर केला आहे. ही कल्पना मला अतिशय आवडली. तसेच, धान्याला दिलेली मोत्याची उपमा, 'श्रमदेव' ही अनोखी कल्पना मन आकर्षून घेते. ही कविता लयबद्ध असल्यामुळे चालीत गाता येते. या सर्व वैशिष्ट्यांमुळे मला ही कविता खूप आवडते.
  2. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा.
    1. कलंक - डाग, वाईट विचार
    2. सकलकामना - संपूर्ण इच्छा
shaalaa.com
आकाशी झेप घे रे
  Is there an error in this question or solution?
Chapter 12: भरतवाक्य - कृती क्रमांक २

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi 10 Standard SSC
Chapter 12 भरतवाक्य
कृती क्रमांक २ | Q 2. (आ) 2)

RELATED QUESTIONS

सुखलोलुप झाली काया म्हणजे ______


तुलना करा.

पिंजऱ्यातील पोपट  पिंजऱ्याबाहेरील पोपट
______ ______
______ ______
______ ______

कवीने (आकाशी झेप घे रे) यशप्राप्तीच्या संदर्भांत सांगितलेली सुवचने लिहा.

____________

____________ 


खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘घामातुन मोती फुलले 
श्रमदेव घरी अवतरले’


‘आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा’, या ओळीतील मथितार्थ स्पष्ट करा.


‘स्वसामर्थ्याची जाणीव’ हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे, हे विधान स्पष्ट करा.


‘घर प्रसन्नतेने नटले’, याची प्रचिती देणारा तुमचा अनुभव लिहा.


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

आकाशी झेप घे रे

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
  3. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (२)

खालील मुद्दयांचा आधारे 'आकाशी झेप घे रे' या कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

क्र. प्रश्न उत्तर
कवी किंवा कवयित्रीचे नाव.  
कवितेचा विषय.  
प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. उदा. व्यथा, वैभव सुखलोलुप, साजिरा  
कवितेतून मिळणारा संदेश.  
प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा.  
कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा.  

खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.

तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

आकाशी झेप घे रे

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. चौकटी पूर्ण करा. (2)

  1. कष्टाने मिळणारे - ______
  2. घामातून फुलणारे - ______

आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा

तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा

तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा

कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा

घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा

2. योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा. (2)

i. सुखलोलुप झाली काया म्हणजे ______

(अ) सुखाचा तिरस्कार वाटतो.
(ब) सुखाबद्दल प्रेम वाटते.
(क) सुखाचे आकर्षण वाटते.
(ड) सुख उपभोगण्याची सवय लागते.

ii. पिंजरा सोडून झेप घेतल्याने ______

(अ) काया सुखलोलुप होते.
(ब) पाखराला आनंद होतो.
(क) आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते.
(ड) आकाशाची प्राप्ती होते.

3. खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (2)

तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा

4. काव्यसौंदर्य (2)

‘आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा’

या ओळींमधील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


खालील पंक्तींचे रसग्रहण करा.

‘घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा’


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×