Advertisements
Advertisements
Question
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
खोद आणखी थोडेसे
- प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. (२)
- प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. (२)
1. कलंक - ___________
2. सकलकामना - __________
Solution
- 'खोद आणखी थोडेसे' या कवितेतून कवयित्री आपल्या मनावर सकारात्मकता व प्रयत्नवाद या मूल्यांचा संस्कार उमटवते. याकरता ती खोदण्याच्या क्रियेचे, झऱ्याचे समर्पक उदाहरण देते. कमीत कमी शब्दांत अर्थपूर्ण आशय व्यक्त करण्याचे कवयित्रीचे कौशल्य मनाला भावते. छोट्या छोट्या काव्यपंक्ती वाचताना कविता नादमधुर वाटते. कविता अष्टाक्षरी छंदात म्हणजेच प्रत्येक ओळीत आठ अक्षरे असून, प्रत्येक कडव्यातील दुसऱ्या व चौथ्या ओळींत यमक गुंफलेली आहेत. कवितेत एक आंतरिक लय निर्माण करण्यास ते कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे, ती गाता येते. या सर्व कारणांमुळे ही कविता मला फार आवडते.
- प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा.
1. कलंक - डाग, वाईट विचार
2. सकलकामना - संपूर्ण इच्छा
APPEARS IN
RELATED QUESTIONS
‘खोदणे’ या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे ______
कवितेतील (खोद आणखी थोडेसे) खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
कवितेतील संकल्पना | संकल्पनेचा अर्थ |
(१) सारी खोटी नसतात नाणी | (अ) मनातील विचार व्यक्त करावेत. |
(२) घट्ट मिटू नका ओठ | (आ) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे. |
(३) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली | (इ) सगळे लोक फसवे नसतात. |
(४) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी | (ई) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत. |
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
संयमाने वागा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
सकारात्मक राहा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
चांगुलपणावर विश्वास ठेवा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
खूप हुरळून जा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा - ______
कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
नवनिर्मितीवर विश्वास ठेवा - ______
खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे’
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. (२)
- नकारात्मक विचार करा. - ___________
- जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा - _________
खोद आणखी थोडेसे घट्ट मिटू नये ओठ मूठ मिटून कशाला झरा लागेलच तिथे |
2. तक्ता पूर्ण करा. (२)
कवयित्रीच्या मते काय करावे व काय करू नये ते लिहा.
काय करावे. | काय करू नये. |
1) | 1) |
2) | 2) |
पुढील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
'झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे!'
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
खोद आणखी थोडेसे
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (1)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (1)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (2)
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
खोद आणखी थोडेसे
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. (2)
- सकारात्मक राहा.
- उतावळे व्हा.
- खूप हुरळून जा.
- संवेदनशीलता जपा.
खोद आणखी थोडेसे घट्ट मिटू नये ओठ मूठ मिटून कशाला झरा लागेलच तिथे |
(2) कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. (2)
कवितेतील संकल्पना | संकल्पनेचा अर्थ |
(1) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली | (i) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे. |
(2) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी | (ii) सगळे लोक फसवे नसतात. |
(iii) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत. |
(3) खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (2)
खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.
(4) काव्यसौंदर्य (2)
‘झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे’, या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.