English

सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो; कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो; सदंघ्रिकमळी दडो; मुरडितां हटानें अडो; वियोग घडतां रडो; मन भवच्चरित्रीं जडो।। - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. उत्तरे लिहा. (२)

1. मन वाईट गोष्टींकडे वळू नये म्हणून करावयाच्या गोष्टी

  1. ___________
  2. __________

2. परमेश्वराला उद्देशून वापरलेली संबोधने (२)

  1. ___________
  2. ___________

सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;
कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो;
सदंघ्रिकमळी दडो; मुरडितां हटानें अडो;
वियोग घडतां रडो; मन भवच्चरित्रीं जडो।।

न निश्चय कधीं ढळो; कुजनविघ्नबाधा टळो;
न चित्त भजनीं चळो; मति सदुक्तमार्गीं वळो;।
स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;
पुन्हां न मन हें मळो; दुरित आत्मबोधें जळो।।

मुखीं हरि! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकलकामना मावली;।
कृपा करिशि तूं जगत्रयनिवास दासावरी,
तशी प्रगट हे निजाश्रितजनां सदा सांवरी।।

3. खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (२)

न निश्चय कधीं ढळो; कुजनविघ्नबाधा टळो;
न चित्त भजनीं चळो; मति सदुक्तमार्गीं वळो;।

4. काव्यसाैंदर्य. (२)

खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारे भावसाैंदर्य स्पष्ट करा.

कृपा करिशि तूं जगत्रयनिवास दासावरी,
तशी प्रकट हे निजाश्रितजनां सदा सांवरी।।

Answer in Brief

Solution

१.

1. मन वाईट गोष्टींकडे वळू नये म्हणून करावयाच्या गोष्टी

  1. सदा सज्जनांच्या सहवासात राहावे व त्यांचे चांगले बोल ऐकावे.
  2. भगवंताच्या नामस्मरणात मनाला गुंतवावे.

2. परमेश्वराला उद्देशून वापरलेली संबोधने 

  1. हरि
  2. जगत्रयनिवास

3. मनाने कधीही डगमगू नये, निश्चय भंग पावू देऊ नये; दुष्ट लोकांनी निर्माण केलेल्या विघ्नांची बाधा दूर व्हावी; चित्त भजनापासून ढळू नये; सज्जनांनी सांगितलेल्या मार्गाकडे, बुद्धी वळावी.

4. प्रस्तुत ओळ कवी मोरोपंतांच्या 'केकावली' या संग्रहातील 'भरतवाक्य' या पद्यरचनेतील आहे. या केकावलीतून कवी मोरोपंत सज्जन माणसांच्या संगतीचे व चांगल्या विचारांच्या श्रवणाचे महत्त्व सांगू पाहत आहेत.
          केकावलीच्या अंतिम चरणात मोरोपंत भगवंताला आर्ततेने आळवणी करत आहेत, की हे प्रभो, तुझी नामावली (तुझे नाव) माझ्या मुखात सदा असो, तुझ्या नामस्मरणाने माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. हे जगन्नाथा, तिन्ही जगांत निवास करणाऱ्या परमेश्वरा, माझ्यासारख्या दासावर तुझी कृपादृष्टी अखंड राहू दे. तुझ्या आश्रयाला आलेल्या भक्तजनांवर तू नेहमी अशीच कृपादृष्टी ठेव. अशाप्रकारे, प्रस्तुत पंक्तींतून, मोरोपंत भगवंतापाशी सर्वांकरता कृपादृष्टीचे मागणे मागत आहेत.

shaalaa.com
भरतवाक्य
  Is there an error in this question or solution?
Chapter 12: भरतवाक्य - कृती क्रमांक २

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi 10 Standard SSC
Chapter 12 भरतवाक्य
कृती क्रमांक २ | Q 2. (अ)

RELATED QUESTIONS

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून ______ 


सदंघ्रिकमळीं दडो; म्हणजे ______ 


खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा.

गोष्टी विनंती
(१) निश्चय ______
(२) चित्त ______
(३) दुरभिमान ______
(४) मन ______

खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

मति सदुक्तमार्गीं वळो


खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

न निश्चय कधीं ढळो


‘सुसंगती सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;’ या ओळींचे रसग्रहण करा.


‘स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.


सत्प्रवृत्त व्यक्तीची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.


वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहा.


पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. उत्तरे लिहा. (२)

1. सुसंगतीचे महत्त्व

  1. ___________
  2. __________

2. वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी करावयाचे उपाय. (२)

  1. ___________
  2. ___________

सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;
कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो;
सदंघ्रिकमळी दडो; मुरडितां हटानें अडो;
वियोग घडतां रडो; मन भवच्चरित्रीं जडो।।

न निश्चय कधीं ढळो; कुजनविघ्नबाधा टळो;
न चित्त भजनीं चळो; मति सदुक्तमार्गीं वळो;।
स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;
पुन्हां न मन हें मळो; दुरित आत्मबोधें जळो।।

मुखीं हरि! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकलकामना मावली;।
कृपा करिशि तूं जगत्रयनिवास दासावरी,
तशी प्रगट हे निजाश्रितजनां सदा सांवरी।।

3. खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (२)

मुखीं हरि! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकलकामना मावली;।

4. काव्यसाैंदर्य. (२)

खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारे विचार साैंदर्य स्पष्ट करा.

स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;
पुन्हां न मन हें मळो; दुरित आत्मबोधें जळो।।


खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;
कलंक मतीचा झडो; विषय सर्वथा नावडो;


खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.

मुखीं हरि! वसो तुझी
कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी
सकलकामना मावली;।।


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

भरतवाक्य

  1. प्रस्तुत कवितेच्या कवीचे/ कवयित्रीचे नाव लिहा.  (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय.  (१)
  3. कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (२)

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×