Advertisements
Advertisements
Question
खालील पंक्तींचे रसग्रहण करा.
‘घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा’
Solution
प्रस्तुत पद्यपंक्ती ‘आकाशी झेप घे रे’ या कवितेची असून याचे कवी जगदीश खेबुडकर हे आहेत. यांनी या कवितेत श्रमाचे महत्त्व विशद केले आहे. प्रस्तुत पद्यपंक्ती माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात व परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करणे व उत्तम यश मिळवून त्याचा आनंद घेणे असा संदेश देते.
स्वतःच्या क्षमतेचा वापर करून काहीतरी मिळवणे हा एक अनुभव असतो. नुसत्याच सुख-विलासातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा खूप उच्च दर्जाचा आनंद हा अनुभव आपल्याला देऊन जातो. त्यातून मिळणारे समाधान, येणारी उन्नती वेगळीच असते. स्वत:च्या मेहनतीचा, कष्टाचा आनंद हा खूप मोठा असतो.
कष्ट केल्याशिवाय फळ प्राप्त होत नाही. सतत श्रम करून जेव्हा शेतकरी शेतात काम करतो, तेव्हा त्याला मोत्यासारखे पीक मिळते. म्हणजे त्याच्या घामातून मोती फुलते. ते धनधान्य जेव्हा त्याच्या घरी येते, तेव्हा त्याला त्याच्या श्रमाचे फळ मिळाल्याचे समाधान होते. जणू काही परमेश्वर त्याला भेटला आहे असे वाटते. म्हणजेच श्रमदेवता त्याच्या घरी अवतरते.
कवितेची भाषा अतिशय साधी व रसाळ आहे. साध्या शब्दांत गहन आशय मांडला आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
सुखलोलुप झाली काया म्हणजे ______
पिंजरा सोडून झेप घेतल्याने ______
तुलना करा.
पिंजऱ्यातील पोपट | पिंजऱ्याबाहेरील पोपट |
______ | ______ |
______ | ______ |
______ | ______ |
पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील (आकाशी झेप घे रे) ओळी शोधून लिहा.
कवीने (आकाशी झेप घे रे) यशप्राप्तीच्या संदर्भांत सांगितलेली सुवचने लिहा.
____________
____________
खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले’
‘आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा’, या ओळीतील मथितार्थ स्पष्ट करा.
‘घर प्रसन्नतेने नटले’, याची प्रचिती देणारा तुमचा अनुभव लिहा.
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
आकाशी झेप घे रे
- प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. (२)
- प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. (२)
1. कलंक - ___________
2. सकलकामना - __________
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृतिबंध पूर्ण करा. (२)
आकाशी झेप घे रे पाखरा तुजभवती वैभव, माया तुज पंख दिले देवाने कष्टाविण फळ ना मिळते घामातुन मोती फुलले |
2. तुलना करा. (२)
पिंजऱ्यातील पोपट | पिंजऱ्याबाहेरील पोपट |
3. पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)
दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा
4. पुढील काव्यपंक्तीतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा. (२)
कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळत
खालील मुद्दयांचा आधारे 'आकाशी झेप घे रे' या कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
क्र. | प्रश्न | उत्तर |
१ | कवी किंवा कवयित्रीचे नाव. | |
२ | कवितेचा विषय. | |
३ | प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. उदा. व्यथा, वैभव सुखलोलुप, साजिरा | |
४ | कवितेतून मिळणारा संदेश. | |
५ | प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा. | |
६ | कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा. |
खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. चौकटी पूर्ण करा. (2)
- कष्टाने मिळणारे - ______
- घामातून फुलणारे - ______
आकाशी झेप घे रे पाखरा तुजभवती वैभव, माया तुज पंख दिले देवाने कष्टाविण फळ ना मिळते घामातुन मोती फुलले |
2. योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा. (2)
i. सुखलोलुप झाली काया म्हणजे ______
(अ) सुखाचा तिरस्कार वाटतो.
(ब) सुखाबद्दल प्रेम वाटते.
(क) सुखाचे आकर्षण वाटते.
(ड) सुख उपभोगण्याची सवय लागते.
ii. पिंजरा सोडून झेप घेतल्याने ______
(अ) काया सुखलोलुप होते.
(ब) पाखराला आनंद होतो.
(क) आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते.
(ड) आकाशाची प्राप्ती होते.
3. खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (2)
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा
4. काव्यसौंदर्य (2)
‘आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा’
या ओळींमधील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.