English

Marathi [मराठी] Official 2022-2023 SSC (Marathi Medium) 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper Solution

Advertisements
Marathi [मराठी] [Official]
Marks: 80 Maharashtra State Board
SSC (Marathi Medium)
SSC (Marathi Semi-English)

Academic Year: 2022-2023
Date & Time: 2nd March 2023, 11:00 am
Duration: 3h
Advertisements

कृतिपत्रिकेसाठी सूचना :

  1. सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
  2. आकृत्या पेननेच काढाव्यात.
  3. उपयोजित लेखनातील कृतींसाठी (सूचना, निवेदन), आकृतीची आवश्यकता नाही.
  4. विभाग-5 उपयोजित लेखन प्र.5 (अ) (2) सारांशलेखन या घटकासाठी गदय विभागातील प्र.1 (इ) अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे.
  5. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.

विभाग 1 - गद्य
[18]1
[7]1.A

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(1) आकृती पूर्ण करा. (2)

             न्यू एज रोबो कंपनीचा एजंट आम्हांला लॅपटॉपवर माहिती सांगत होता. हॉटेल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर असे वेगवेगळे यंत्रमानव म्हणजेच रोबो आम्ही बनवले आहेत. आम्ही बनवलेले रोबो हुबेहूब माणसाप्रमाणे दिसतात आणि वागतातही. एका रोबोची किंमत एक लाख रुपये आणि दर दोन महिन्यांना सर्व्हिसिंगचे अडीच हजार रुपये. लाखाची गोष्ट निघाल्याबरोबर सोमनाथ पटकन उठत मला म्हणाला, ‘‘राजाभाऊ, उठा आता, हे काही आपल्याला परवडणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोबो वेटरची सर्व कामं करणं कसं शक्य आहे?’’ सोमनाथप्रमाणे माझाही त्या एजंटवर विश्वास बसत नव्हता. फक्त पाच मिनिटं.. माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसत नाही; पण आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आहे. मोठमोठ्या शहरांतील हॉटेलमध्ये अनेक रोबो काम करत आहेत. आमच्या रोबो वेटरबाबत खाण्यापिण्याचा, पगाराचा, कामचुकारपणाचा विचार करण्याची गरज नाही. आमचा रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हांला दुप्पट कमाई करून देईल याची मी खात्री देतो.’’ एजंटच्या शेवटच्या वाक्याने आम्ही विचार करू लागलो.

(2) उत्तरे लिहा. (2)

  1. रोबो वेटरचा सर्व्हिसिंगचा कालावधी लिहा.
  2. रोबो वेटरबाबत न्यू एज कंपनीच्या एजंटने दिलेली खात्री लिहा.

(3) स्वमत. (3)

रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक तुमच्या शब्दांत लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.18] निर्णय
[7]1.B

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(1) कृती करा. (2)

            पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. ‘एम्स’ मधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात/पाय कापावा लागलेले पेशंटस दिवसेंदिवस अगदी महिनाेन् महिने उठत नाहीत. मी दोनच दिवसांत उभी राहिले. एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार नि जोडीला भाईसाब-आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या, की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, ‘‘अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास... तुला ठाऊक आहे, तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वत:ला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला...!’’

            ‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र’ बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं. इथे माझे दीड वर्षांसाठी खडतर प्रशिक्षण सुरू झाले. छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव, ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यांतून मी तावून सुलाखून निघत होते.

(2) एका शब्दात उत्तर लिहा. (2)

  1. एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला.
  2. अरुणिमाबरोबर बचेंद्री पाल यांच्याकडे जाणारी व्यक्ती.

(3) स्वमत. (3)

‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.11] गोष्ट अरुणिमाची
अपठित गद्य
[4]1.C

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(1) आकृतिबंध पूर्ण करा. (2)

             माणूस, त्याचा सामाजिक परिसर व त्याच्या सभोवतालचा निसर्ग यांतील संवाद शिक्षणामुळे साधता आला पाहिजे, हा कर्मवीरांचा आग्रह होता. भारत हा खेड्यांचा आणि खेडूतांचा देश आहे. खेडी ही निसर्गाला अधिक जवळची आहेत. व्यक्तिचे पौरुष, प्रतिकारक्षमता व उपक्रमशीलता यांचा विकास होतो तो माणूस आणि निसर्ग यांच्या सहयोगातून.

             कर्मवीरांनी हे जीवन रहस्य जाणले आणि शिक्षणाचा मोहरा खेड्याकडे वळविला. संस्थानिकांचे वाडे, वारकऱ्यांच्या धर्मशाळा, वाड्या आणि वस्त्यांवरची घरकुले हीच आपली आश्रयस्थाने समजून कार्याला आरंभ केला. पुढे-पुढे शाळांच्या वास्तू उभ्या राहिल्या. शक्य असेल तेथे शाळेला जोडून शेती संपादन करण्यात आली. शेतात विहिरी खोदण्यात आल्या. हे सर्व विदयार्थ्यांच्या श्रमदानातून घडवून आणले.

             अंगमेहनतच गरिबांची दौलत. ‘कमवा आणि शिका’ या शिक्षण-क्षेत्रातील मंत्राचे द्रष्टे कर्मवीर हेच होते.

(2) चौकटी पूर्ण करा. (2)

  1. कर्मवीरांच्या मते गरिबांची दौलत - ______
  2. कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्राला दिलेला मंत्र - ______
Concept: undefined - undefined
Chapter: [0.23] अपठित विभाग
विभाग 2 - पद्य
[16]2
[8]2.A

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(1) कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. (2)

  1. सकारात्मक राहा.
  2. उतावळे व्हा.
  3. खूप हुरळून जा.
  4. संवेदनशीलता जपा.

खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.

घट्ट मिटू नये ओठ
गाणे असते गं मनी
आर्त जन्मांचे असते
रित्या गळणाऱ्या पानी.

मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी.

झरा लागेलच तिथे
खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला
बळ लागते थोडेसे!

(2) कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. (2)

कवितेतील संकल्पना संकल्पनेचा अर्थ
(1) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली (i) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे.
(2) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी (ii) सगळे लोक फसवे नसतात.
  (iii) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत.

(3) खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (2)

खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.

(4) काव्यसौंदर्य (2)

‘झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे’, या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.151] खोद आणखी थोडेसे (कविता)
[4]2.B | खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
[4]2.B.1

खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

भरतवाक्य

  1. प्रस्तुत कवितेच्या कवीचे/ कवयित्रीचे नाव लिहा.  (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय.  (१)
  3. कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (२)
Concept: undefined - undefined
Chapter: [0.12] भरतवाक्य (कविता)
किंवा
[4]2.B.2

खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

वस्तू

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
Concept: undefined - undefined
Chapter: [0.06] वस्तू (कविता)
[4]2.C

खालील पंक्तींचे रसग्रहण करा.

‘घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा’

Concept: undefined - undefined
Chapter: [0.16] आकाशी झेप घे रे (कविता)
विभाग 3 - स्थूलवाचन
[6]3 | खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
[3]3.A

टीप लिहा.

व्युत्पत्ती कोशाचे कार्य

Concept: undefined - undefined
Chapter: [0.20199999999999999] व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन)
[3]3.B

‘मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे’ या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.052000000000000005] बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन)
[3]3.C

‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे ‘वीरांगना’ या पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.152] वीरांगना (स्थूलवाचन)
विभाग 4 - भाषाभ्यास
[16]4
[8]4.A | व्याकरण घटकांवर आधारित कृती.
[2]4.A.1 | समास

योग्य जोड्या लावा.

सामासिक शब्द समासाचे नाव
(i) भाजीपाला द्विगू समास
(ii) कमलनयन समाहार द्वंद्व समास
  कर्मधारय समास
Concept: undefined - undefined
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
Advertisements
[2]4.A.2 | शब्दसिद्धी

खालील तक्ता पूर्ण करा.

(भरदिवसा, लाललाल, दुकानदार, खटपट)

प्रत्ययघटित शब्द उपसर्गघटित शब्द अभ्यस्त शब्द
     
Concept: undefined - undefined
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
[4]4.A.3 | वाक्प्रचार : खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
[2]4.A.3.i

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कान देऊन ऐकणे-

Concept: undefined - undefined
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
[2]4.A.3.ii

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कसब दाखवणे-

Concept: undefined - undefined
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
[2]4.A.3.iii

खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

आनंद गगनात न मावणे -

Concept: undefined - undefined
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
[2]4.A.3.iv

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तगादा लावणे-

Concept: undefined - undefined
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
[8]4.B | भाषिक घटकांवर आधारित कृती
[4]4.B.1 | शब्दसंपत्ती
[1]4.B.1.i

खालील शब्दांला समानार्थी शब्द लिहा.

डोळे/डोळा - ______

Concept: undefined - undefined
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)

खालील शब्दांला समानार्थी शब्द लिहा.

वृक्ष -

Concept: undefined - undefined
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
[1]4.B.1.ii

खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

वास्तव × ______

Concept: undefined - undefined
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)

खालील शब्दांला विरुद्धार्थी शब्द लिहा.

सोय × ______

Concept: undefined - undefined
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
[1]4.B.1.iii

खालील शब्दाचे वचन ओळखा.

वह्या - ______

Concept: undefined - undefined
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)

खालील शब्दाचे वचन ओळखा.

मुलगा - ______

Concept: undefined - undefined
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
[1]4.B.1.iv

खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा.

विचारसरणी

Concept: undefined - undefined
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
[2]4.B.2 | लेखननियमांनुसार लेखन : खालीले बाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. (कोणतीही दोन वाक्ये सोडवा)
[1]4.B.2.i

खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.

गीर्यारोहणाने मला खुप महत्त्वाचे धडे दिले.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
[1]4.B.2.ii

खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.

आलिकडे एक सुरेख परदेशी सीनेमा पाहिला.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
[1]4.B.2.iii

खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.

तीचं अवसान पाहून त्यांन दिपालीला तेथेच टाकलं.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
[1]4.B.2.iv

खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.

सरपण नीट नसलं, कि गड्यांची फजीती होते.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
Advertisements
[1]4.B.3 | विरामचिन्हे

खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा.

मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हांला खूप जवळून पाहिलंय

Concept: undefined - undefined
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
[1]4.B.4 | पारिभाषिक शब्द
[0.5]4.B.4.i

खालील पारिभाषिक शब्दांला प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा:

Workshop - 

Concept: undefined - undefined
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
[0.5]4.B.4.ii

खालील शब्दांला प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा:

Exchange - 

Concept: undefined - undefined
Chapter: [0.22] व्याकरण विभाग (भाषाभ्यास)
विभाग 5 - उपयोजित लेखन
[24]5
[6]5.A | खालील कृती सोडवा.
[6]5.A.1 | पत्रलेखन : खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.
[6]5.A.1.i

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

वाचाल तर वाचाल!

मनोज पुस्तकालय

69/314 आनंद नगर, अकोला

दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त

दि. 8 डिंसेबर रोजी खास सवलत

कोणत्याही पुस्तकावर
20% सवलत
2000 रुपयांच्या खरेदीवर
एक पुस्तक मोफत
वेळ
`↓`
स. 9.00 ते रात्री 8.00 वाजता
सोमवार बंद.
संपर्क - [email protected]
श्रेया/श्रेयस इनामदार
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र दुकानाच्या व्यवस्थापकांना लिहा.
Concept: undefined - undefined
Chapter: [0.21] उपयोजित लेखन
किंवा
[6]5.A.1.ii

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

वाचाल तर वाचाल!

मनोज पुस्तकालय

69/314 आनंद नगर, अकोला

दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त

दि. 8 डिंसेबर रोजी खास सवलत

कोणत्याही पुस्तकावर
20% सवलत
2000 रुपयांच्या खरेदीवर
एक पुस्तक मोफत
वेळ
`↓`
स. 9.00 ते रात्री 8.00 वाजता
सोमवार बंद.
संपर्क - [email protected]
श्रेया/श्रेयस इनामदार
संबंधित निवेदनाची माहिती देणारे पत्र तुमच्या मित्र/मैत्रिणीला लिहा.
Concept: undefined - undefined
Chapter: [0.21] उपयोजित लेखन
किंवा
[6]5.A.2

खालील उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

             माणूस, त्याचा सामाजिक परिसर व त्याच्या सभोवतालचा निसर्ग यांतील संवाद शिक्षणामुळे साधता आला पाहिजे, हा कर्मवीरांचा आग्रह होता. भारत हा खेड्यांचा आणि खेडूतांचा देश आहे. खेडी ही निसर्गाला अधिक जवळची आहेत. व्यक्तिचे पौरुष, प्रतिकारक्षमता व उपक्रमशीलता यांचा विकास होतो तो माणूस आणि निसर्ग यांच्या सहयोगातून.

             कर्मवीरांनी हे जीवन रहस्य जाणले आणि शिक्षणाचा मोहरा खेड्याकडे वळविला. संस्थानिकांचे वाडे, वारकऱ्यांच्या धर्मशाळा, वाड्या आणि वस्त्यांवरची घरकुले हीच आपली आश्रयस्थाने समजून कार्याला आरंभ केला. पुढे-पुढे शाळांच्या वास्तू उभ्या राहिल्या. शक्य असेल तेथे शाळेला जोडून शेती संपादन करण्यात आली. शेतात विहिरी खोदण्यात आल्या. हे सर्व विदयार्थ्यांच्या श्रमदानातून घडवून आणले.

             अंगमेहनतच गरिबांची दौलत. ‘कमवा आणि शिका’ या शिक्षण-क्षेत्रातील मंत्राचे द्रष्टे कर्मवीर हेच होते.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.21] उपयोजित लेखन
[10]5.B | खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. (शब्दमर्यादा ६० ते ९० शब्द)
[5]5.B.1 | जाहिरातलेखन

खालील मुद्द्यांच्या आधारे ‘कला-छंद वर्ग’ याची आकर्षक जाहिरात तयार करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.21] उपयोजित लेखन
[5]5.B.2 | बातमीलेखन

खालील विषयावर बातमी तयार करा.

8 मार्च ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ शाळेत ‘माता-पालक मेळावा’ व विविध स्पर्धांचे आयोजन पालकांचा उदंड प्रतिसाद.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.21] उपयोजित लेखन
[5]5.B.3 | कथालेखन

खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा.

(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.)

पाडळी गावातील सखू आपल्या रानातला भाजीपाला घेऊन बाजाराला गेली. शेतातल्या कोवळ्या, ताज्या विकताना दिवस कधी संपला तिला कळलेच नाही. अजूनही थोडी भाजी शिल्लक होती. भाव कमी करून तिने ती विकली व सर्व साहित्य गोळा करून लगबगीने घराकडे निघाली. अर्ध्यारस्त्यात जाईपर्यंत काळोख दाटून आला. एक हुरहूर तिच्या मनात दाटून आली; पण नेटाने ती चालत होती. पावले भरभर उचलत होती. एवढ्यात तिला काळोखात सायकलचा आवाज आला. ती थबकली आणि .....

Concept: undefined - undefined
Chapter: [0.21] उपयोजित लेखन
[8]5.C | लेखनकौशल्य : खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा.
[8]5.C.1 | प्रसंगलेखन

‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.21] उपयोजित लेखन
[8]5.C.2 | आत्मकथन

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.21] उपयोजित लेखन
[8]5.C.3 | वैचारिक

‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.21] उपयोजित लेखन

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Marathi [मराठी] with solutions 2022 - 2023

     Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] question paper 2023 serve as a catalyst to prepare for your Marathi [मराठी] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] -2023 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Marathi [मराठी], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी].

How Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi [मराठी] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×