English

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

Answer in Brief

Solution

मी पुस्तक बोलत आहे...

“नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताय ना? अहो, मी तुमचा मित्र ‘पुस्तकराव’ बोलतोय. तसे माझे आणि तुमचे नाते अगदी बालपणापासूनचे! माझ्याद्वारे तुम्ही गाणी, गोष्टी शिकता. तालासुरात कविता म्हणायला व घडाघडा पाठ वाचायलाही शिकता. माझ्यातील रंगीत, बोलकी चित्रे पाहून किती आनंद मिळतो तुम्हांला! खरंच, तुमच्या दिवसाची सुरुवात माझ्या वाचनाने होते, हे पाहून मला खूप आनंद होतो. मला माझ्याजवळ असलेला माहितीचा, ज्ञानाचा खजिना तुम्हांला उलगडवून दाखवता येतो. तुमचा एखादा कंटाळवाणा, थकलेला क्षण माझ्या संगतीने मनोरंजक बनू शकतो. तुम्हांला एखाद्या वेगळ्याच विश्वात घेऊन जाताना मी तुमचा वाटाड्या बनू शकतो. ज्ञान, विज्ञान, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांशी तुमची भेट घालून देण्याचे भाग्य मला लाभते. त्यामुळे, तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो.

झाडापासून कागदनिर्मिती होईपर्यंत, अगदी पुस्तक बांधणी ते पुस्तक प्रकाशित करण्यापर्यंतचा हा प्रवास मी अनुभवलेला असतो. हजारो हातांनी मेहनत केलेली असते, मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी! कागदनिर्मिती करणाऱ्या सामान्य मजूर, कारागिरांपासून लेखक, प्रकाशक यांचा माझ्या निर्मिती मागे मोलाचा वाटा असतो. या सर्वांच्या मेहनतीची जाणीव नसल्यामुळेच काही लोक माझा नीट वापर करत नाहीत. कव्हर्स घालणे तर दूरच; पण काही खाता-पिताना माझ्यावर डाग पाडतात. माझी पाने दुमडतात. मला निष्काळजीपणे हाताळल्यामुळे मी फाटतो. काहीजण तर मला उशीसारखे डोक्याखाली घेऊन झोपतात. असे हे बेजबाबदार वागणे मला अजिबात आवडत नाही. अतिशय दु:ख होते.

मला तुम्हां सर्व मुलांना असे सांगावेसे वाटते, की ‘ज्ञानमेव परा शक्ति:’। ज्ञान हीच सर्वोत्तम शक्ती आहे. हे ज्ञान आमच्यात वास करते. त्यामुळे, मला हाताळताना थोडीशी काळजी घेतलीत, तर मला खूप आनंद होईल. मी चांगल्या स्थितीत राहीन व इतरांनाही उपयोगी पडेन.

सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मीही डिजिटल होत आहे. मला मोबाइलमध्ये, संगणकावर ‘इ-बुक’च्या स्वरूपात वाचता येते. माझ्या या काळानुसार बदलत्या रूपाची भुरळ तुमच्या नव्या पिढीला पडत आहे. तुमचा वाचनाचा छंद कायम टिकावा, हीच माझी इच्छा आहे. त्यामुळे, तुम्हांला काहीतरी सांगण्याची, तुमच्यासाठी काही करण्याची, तुमच्या जवळ राहण्याची माझी इच्छा पूर्ण होईल आणि आपली मैत्री सदैव टिकून राहील.

अच्छा, खूप वेळ झाला, अभ्यास करा बरं …”

shaalaa.com
निबंध लेखन
  Is there an error in this question or solution?
2022-2023 (March) Official

RELATED QUESTIONS

खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वैचारिक निबंध

तंत्रज्ञानाची किमया.


पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.


खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

सूर्य उगवला नाही तर ........


सूहृद मंडळ, नाशिक.
- आयोजित -
बालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ
दि. - 10 डिसेंबर वेळ - सकाळी 10.00
प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्ते
सूहृद मंडळ, नाशिक.

वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

फाटक्या पुस्तकाचे मनोगत


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

परीक्षाच नसत्या तर


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

सैनिकाचे मनोगत


‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.


‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा. 

मी फळा बोलतोय


वरील कार्यक्रमास तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


दिलेल्या मुदूदांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×