Advertisements
Advertisements
Question
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी फळा बोलतोय
Solution
मी फळा बोलतोय
मी जरी दिसण्यात काळा असलो तरी अनेक लोकांचे यशस्वी आणि उज्वल भवितव्य मी घडवले आहे. माझ्यावर लिहिण्यात आलेली गणिते, विज्ञान, इंग्रजी आणि सुंदर सुविचार यांनी अनेक आदर्श विद्यार्थी आणि आदर्श नागरिक घडवले आहेत. मित्रांनो कदाचित आपण मला ओळखलेच असेल? नाही ओळखले तर ऐका, मी एक फळा बोलतो आहे.
माझ्या जन्म एक कोरा फळा म्हणून झाला होता. या कोऱ्या फळ्यावर कोणीही त्याचे विचार मांडू शकत होते. मी खरोखर एक महान शोध होतो. झाडे, दगड यांच्यावर लिहित बसण्यापेक्षा माझ्यावर लिहिणे सोपे आणि सरल होते. आधीच्या काळात जेव्हा भाषेचा विकास झाला नव्हता तेव्हा काही लोक माझ्यावर चित्र आणि आकृत्या काढून संवाद साधत असत.
जसा वेळ बदलत गेला तशी संभाषणाची साधने देखील बदलली. नंतरच्या काळात कागदाचा शोध लागला. आणि लोक कागदावर आपले विचार काढू लागले. माझा उपयोग आधी पेक्षा कमी झाला. कारण कागद हे एका जागेवरून दुसऱ्या जागी सहज नेता येणारे साधन होते. म्हणून माझा उपयोग फक्त शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केला जाऊ लागला. शाळेतील शिक्षकांसाठी मी अतिशय महत्त्वाचे साधन आहे. माझ्यावर खडूच्या मदतीने लिखाण केले जाते. खडू आणि मी खूप चांगले मित्र बनलो आहेत. मी खडू शिवाय अपूर्ण आहे आणि खडू माझ्याशिवाय. परंतु डस्टर आम्हा दोघांचे शत्रू आहे. ते खडूने माझ्यावर लिहिलेले सुंदर अक्षर पुसून टाकते. परंतु तरीही आमची मैत्री कमी झालेली नाही आहे.
आज मनुष्याने लावलेले नवनवीन शोध जसे मोबाईल फोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि स्मार्ट डिस्प्लेमुळे माझा वापर आधीपेक्षा खूप कमी झाला आहे. आता बऱ्याच शाळांमधूनही मला बरखास्त करण्यात आले आहे. माझ्या ऐवजी टच स्क्रीन डिस्प्लेचा वापर केला जात आहे. ह्या डिस्प्लेवर लिहिण्यासाठी खडूची आवश्यकता राहत नाही. आपल्या बोटाने शिक्षक यावर अक्षरे गिरवू शकतात. याला पुसण्यासाठी डस्टरची आवश्यकता नसते. इरेज फंक्शन वापरून लिहिलेले एका क्षणात पुसता येते.
या टच स्क्रीन डिस्प्लेवर कोणतेही चित्र, आकृत्या, गणिते, व्हिडिओ दाखवता येतात. ही फंक्शने माझ्यात नव्हती म्हणून आज माझ्या जागी याचाच वापर केला जात आहे. परंतु जरी आजच्या आधुनिक युगात माझा वापर कमी झालेला असला तरीही माझे महत्त्व मात्र कमी झालेले नाही. ते पूर्वीसारखीच आहे. आणि आजही जे गरीब विद्यार्थी महागड्या शाळांमध्ये शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांना माझ्याच साह्याने शिकवले जाते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
पहाटेचे सौंदर्य.
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
आत्मवृत्तात्मक निबंध
मी सह्याद्री बोलतोय
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.
नमुना कृती.
नमुना कृती:
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी पाहिलेला अविस्मरणीय सामना
सूहृद मंडळ, नाशिक. - आयोजित - बालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ |
|
दि. - 10 डिसेंबर | वेळ - सकाळी 10.00 |
प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्ते सूहृद मंडळ, नाशिक. |
वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.
‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
खेळांचे जीवनातील स्थान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
अंधश्रद्धांचे थैमान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फाटक्या पुस्तकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
हुंडा-एक सामाजिक समस्या
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
सैनिकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
लोकशाही आणि निवडणुका
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
आमची अविस्मरणीय सहल
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
पेट्रोल संपले तर
‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
अश्वमेध सभागृह – दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या – – कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन – दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8 प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी. |
वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी अनुभवलेला पाऊस
वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.
मी पक्षी झाले तर.....
चौकटीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.
खालीलपैकी विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा :
'निसर्ग माझा सखा'
“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.
वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.
‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.