Advertisements
Advertisements
Question
नमुना कृती:
Solution
झाडे लावा झाडे जगवा
'वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे!' खरेच, निसर्गाचा अविभाज्य घटक असलेली ही झाडे आपले सगेसोयरेच असतात; कारण, झाडांमुळे पाऊस वेळेवर व मुबलक प्रमाणात पडतो. चांगला पाऊस पडला, की शेतीभाती पिकते. परिणामी, पृथ्वीवरील सर्व सजीवांना अन्न, पाणी उपलब्ध होते. झाडांची मुळे जमिनीची धूप होऊ देत नाहीत. ती माती घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता (भूजल पातळी) वाढते. जलचक्र सुरळीत चालते. झुडूप, वेली, रोपटी, वृक्ष इत्यादी झाडांच्या विविध प्रकारांमुळे निसर्गात जैवविविधता जपली जाते. हिरव्यागार झाडांमुळे जणू सृष्टीने हिरवा शालू नेसला आहे असे वाटते. वातावरण प्रफुल्लित होते.
मानवी जीवनातही झाडांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. झाडाच्या प्रत्येक अवयवाचा वापर करून मानव रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू बनवतो. शेंड्यापासून मुळापर्यंत झाडांचे सर्व भाग मानवाच्या उपयोगी पडतात. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा झाडांमुळेच भागवल्या जातात. झाडांपासून कागदनिर्मिती घडते. झाडे मानवाला जीवनदर्शन घडवतात. त्यांना तोडनाऱ्यांनाही ती फळेच देतात. त्यांची परोपकारी वृत्ती, दानीपणा, कठीण प्रसंगातही खंबीर राहण्याची अचल वृत्ती आपण जीवनात कसे जगावे याचे पाठ देतात. झाडांचे अस्तित्व मानवात उत्साह भरते, हिरवाई चैतन्य निर्माण करते. झाडे असतील, तर तेथे पशुपक्षी राहतात. या पक्ष्यांच्या किलबिलाटाने, प्राण्यांच्या अस्तित्वाने वातावरण प्रसन्न होते. झाडांच्या सावलीत थकलाभागला वाटसरू विश्रांती घेत असतो. कडक उन्हाच्या झळा कमी करून वातावरणात गारवा टिकवण्याचे काम झाडे करतात.
परंतु, आज मानवाच्या हव्यासापायी निसर्गाचे पावलोपावली शोषण घडत आहे. शहरीकरणाच्या, प्रगतीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. लागवाडीखालची जमीन, वनराया नष्ट करून तेथे इमारती, गृहप्रकल्प उभारले जात आहेत. परिणामी, नैसर्गिक संपत्तीचा, पर्यावरणाचा अतोनात ऱ्हास होत चालला आहे. त्यातून अवकाळी पाऊस, जागतिक तापमानवाढ, हिमनग वितळणे, त्सुनामी, भूकंप, भूस्खलन अशा नैसर्गिक समस्या वाढत चालल्या आहेत.
हा नाश जर थांबला नाही, तर तो संपूर्ण सृष्टीच्या विनाशाला आमंत्रण देईल. झाडे नसतील, तर डोंगर उघडेबोडके पडतील. वातावरण भकास होईल. जमिनीची धूप वाढेल. दुष्काळ, पूर, अतिवृष्टी असे बदल निसर्गात घडू लागतील. प्राणीपक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट होतील. त्यामुळे, त्यांची संख्या घटेल. हिंस्र, जंगली प्राणी मनुष्यवस्तीत शिरून मानवांचा फडशा पाडतील. सर्वत्र हाहाकार माजेल.
हा सर्व ऱ्हास थांबवण्यासाठी 'झाडे लावा झाडे जगवा' हा मूलमंत्र 'जीवनमंत्र' बनवणे गरजेचे आहे. वृक्षदिंडी काढून, नारे देऊन हा प्रश्न सुटणार नाही. याउलट, प्रत्येक मानवाने पर्यावरणपूरक, पर्यावरणस्नेही उत्पादने वापरण्यावर भर दिला पाहिजे. दरमाणशी किमान एक तरी झाड लावले गेले पाहिजे व लावलेल्या झाडाचे आजन्म संगोपन केले पाहिजे.
परिवारातील एका सदस्याप्रमाणे स्वत: लावलेल्या झाडाची जबाबदारी आपण काळजीपूर्वक घेतली पाहिजे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. आरक्षित वनक्षेत्रे, वनराया यांच्या संवर्धनासाठीचे सुधारित कायदे, नियम अंमलात आणले गेले पाहिजेत.
'एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ' या मंत्राने सर्वांनी एकत्र येऊन वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन व वृक्षसंगोपनाची मोहीम राबवली तरच ही सृष्टी नंदनवन बनेल.
चला तर मग, प्रतिज्ञा करू,
'जगवू झाडे, लावू झाडे मंत्र जपू सारे।
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
आत्मवृत्तात्मक निबंध
मी सह्याद्री बोलतोय
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
सूर्य उगवला नाही तर ........
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.
विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
सैनिकाचे मनोगत
अश्वमेध सभागृह – दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या – – कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन – दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8 प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी. |
वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.