Advertisements
Advertisements
Question
नमुना कृती.
Solution
मी क्रीडांगण बोलत आहे...
“काय दोस्ता, आलास? परीक्षा संपली वाटतं? तुम्ही सर्व आलात की कसं बरं वाटतं! त्यानिमित्ताने का होईना, माझ्यावर टाकलेले दगड-धोंडे, कचरा दूर केला जातो. तुमच्या किलबिलाटाने, दंगामस्तीने मी गजबजून जातो, आनंदून जातो.
सकाळची कोवळी उन्हे घेण्यासाठी, दुपारी जेवल्यानंतर शतपावली करण्यासाठी, संध्याकाळी मित्रमैत्रिणींसोबत खेळण्यासाठी, रात्री फेरफटका मारण्यासाठी जेव्हा तुम्ही माझ्याजवळ येता तेव्हा मला खूप आनंद होतो. पावसात तुम्ही इथे चिखलात फुटबॉल खेळायला येता, डबक्यातल्या पाण्यात होड्या सोडता, माझ्यावर दणादण उड्या मारता तेव्हा माझंही मन ओलंचिंब होऊन जातं. तुम्ही नसलात, की नुसता शुकशुकाट असतो. मग काय, कुठल्या राजकारण्याची सभा किंवा साखरपुड्यासाठी, सणाकार्यक्रमांसाठी लोक माझा वापर करण्याची संधी सोडत नाहीत; पण खरं सांगू का? मला खेळासाठीचं हक्काचं अंगण म्हणूनच जर तुम्ही मान दिलात, तरच मला जन्म सार्थकी लागल्यासारखा वाटेल.
आज मैदानी खेळ खेळण्यापेक्षा मुलांना मोबाइल, संगणकामधील यांत्रिक खेळ खेळण्यात अधिक रस वाटत आहे. लहान वयातच लठ्ठपणा, मानदुखी, डोळ्यांच्या विकारांना आयतं आमंत्रण मिळालं आहे. शिवाय, माझ्यापेक्षा टीव्हीचा वाढता प्रभाव आहेच. तासनतास मनोरंजनाच्या या ‘इडियट बॉक्स’ समोर बसून आपला वेळ वाया घालवणाऱ्या, तळलेले, खारट पदार्थ खात डोळ्यांवर जाड भिंगांचा चष्मा सावरणाऱ्या माझ्या दोस्तांना पाहून मला खूप वाईट वाटतं; पण माझा नाइलाज आहे रे. आपल्या व्यस्त जीवनक्रमांतून खेळण्यासाठी वेळ काढणे त्यांना कठीणच होऊन बसले आहे.
हल्ली टोलेजंग इमारती बांधणारे विकासक आमच्यावर अतिक्रमण करून त्याजागी भलेमोठे घरांचे प्रकल्प उभारत आहेत. आमची जागा हळूहळू दुकाने, मॉल्स उभारण्याकरता विकली जात आहे. प्रगतीच्या नावाखाली आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. हे जर असेच चालू राहिले, तर भविष्यात मुले खेळणार कुठे?
जर तुम्ही खेळलात, तर मी टिकून राहीन. नाहीतर माझे अस्तित्वच नष्ट होईल किंवा खेळांडूपुरतेच माझे अस्तित्व मर्यादित राहील, म्हणून सांगतो, रोज खूप खेळा... माझ्याजवळ या...या चिमण्यांनो, परत फिरा... याल ना?”
RELATED QUESTIONS
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
केल्याने देशाटन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे ‘गिर्यारोहण कॅम्प’ विशेष ‘गौरव’ सोहळा |
![]() |
वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे महापुरात अडकलेल्याच्या एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा:
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
अंधश्रद्धांचे थैमान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
गप्पा मारण्याचे व्यसन
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
हुंडा-एक सामाजिक समस्या
चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी अनुभवलेला पाऊस
क्रीडांगण बोलू लागले तर...... या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.
वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.