English

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा. समुद्र खंत संदेश निसर्गसौंदर्य महत्व/उपयुक्तता - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

Answer in Brief

Solution

मी समुद्र बोलतोय......

“काय मग, कसं वाटतंय? लहानपणी आईबाबांसोबत दर रविवारी यायचीस तू, मऊशार वाळूत मज्जा करायला, वाळूवर सुंदर नक्षी काढायला, किल्‍ले बनवायला, माझ्या फेसाळणाऱ्या लाटांसोबत हेलकावे घ्यायला. कितीतरी वेळ एकटक माझ्या न संपणाऱ्या दुसऱ्या टोकापर्यंत तुझी नजर स्थिरावलेली असायची. तेव्हा गर्दीही कमी असायची माझ्या किनारी. माझं पाणी तेव्हा इतकंही अस्वच्छ नव्हतं. पाण्यात उभं राहत चटकदार भेळेवर ताव मारणारी, माझ्या लाटांवर उड्या मारणारी तू आज बऱ्याच दिवसांनी आलीस. माझं हे काळं, प्लॅस्टिकमय झालेलं रूप पाहायला.

पूर्वी माझं गर्द निळं रूप कवीमनाला मोहवायचं. स्वातंत्रयवीर सावरकरांनी तर माझ्यावर अजरामर कविता रचली. रत्नांचा खच माझ्या पोटात, म्हणून मला रत्नाकर म्हणत. आजही नैसर्गिक वायू, खनिजतेलाचे साठे माझ्या पोटात आढळतात; पण आज माझं रूप है असं कुरूप झालंय बघ.

लोक येथे फिरायला येतात, तेव्हा सर्व कचरा किनाऱ्यावरच फेकतात, संपूर्ण शहराचा कचरा नदीनाल्यांतून माझ्याकडे वाहत येतो. शिवाय, कारखान्यांचे प्रदूषित, रसायनयुक्त पाणी प्रक्रिया न करताच माझ्यात सोडले जाते. कधीकधी जहाजांतून तेलगळती होते आणि प्रदूषण होते. माझ्यातील जलचर आता माझ्यासोबत राहायला वैतागलेत. माशांच्या कितीतरी वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती या प्रदूषणामुळे नष्ट झाल्या आहेत. माझ्या आत वाढणाऱ्या जलीय वनस्पती, खेकडे, मोठे मासे यांचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे. सागरी जैवविविधता नष्ट होत आहे.

लोक तर शहरे वाढवण्याच्या नादात माझ्यावर अतिक्रमण करू पाहत आहेत. माझ्या पाण्यावर भर टाकून, तेथे गृहनिर्माण प्रकल्प उभारत आहेत. अगस्तीने घालून दिलेल्या मर्यादेचे पालन मी आजवर करत आलो; पण आता माझ्या सहनशक्तीवर, मर्यादेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होताना दिसतो, तर मग त्सुनामी येईलच ना! इमारती एवढ्या मोट्या लाटा माझ्या सभोवार असलेले जनजीवन उद्ध्वस्त करतीलच ना? मी अमर्याद आहे, धीरगंभीर आहे, अथांग आहे. मला रौद्र रूप धारण करून मानवजातीला हानी पोहोचवायची नाहीये गं.

मीही एक नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. तुमच्यासाठी सर्व नद्यांना माझ्यात सामावून बाष्मीभवनाने जलचक्र सुरळीत ठेवायचंय मला. ‘मीठ’, मासे, जलसंपत्ती तुम्हांला पुरवायचीय मला. निसर्गाचे सौंदर्य असलेले माझे किनारे पूर्ववत झालेले पाहायचेत मला. हे सर्व तुम्हां सजीवसृष्टीच्या हितासाठीच बोलतोय मी. करशील ना प्रयत्न तुझ्यापरीने सर्वांना समजावण्याचा?”

shaalaa.com
निबंध लेखन
  Is there an error in this question or solution?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

RELATED QUESTIONS

खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वर्णनात्मक निबंध

पहाटेचे सौंदर्य.


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

आत्मवृत्तात्मक निबंध

मी सह्याद्री बोलतोय


'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

माझे आवडते शिक्षक


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान


सूहृद मंडळ, नाशिक.
- आयोजित -
बालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ
दि. - 10 डिसेंबर वेळ - सकाळी 10.00
प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्ते
सूहृद मंडळ, नाशिक.

वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:


‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

मी रेडिओ बोलतोय


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

फॅशनचे वेड


अश्वमेध सभागृह

– दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या –

– कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन –

दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8

प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे

35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या

वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी.

वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा. 

मी फळा बोलतोय


वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.


‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×