English

'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा. काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.

Writing Skills

Solution

युग संगणकाचे

       एकविसावे शतक हे विज्ञान-तंत्रज्ञानाचे आणि संगणकाचे युग आहे, असे म्हटले जाते. आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने अनेक शोध लावले आणि प्रगतिपथावर येऊन पोहोचला. त्यातील आपल्या सर्वांना परिचयाचा असलेला शोध म्हणजे संगणकाचा शोध. सन १८३७ साली चार्ल्स बॅबेज यांनी पहिल्या यांत्रिक संगणकाचा शोध लावला. कालानुरूप त्याच्यात अनेक सुधारणा होत गेल्या आणि आजच्या युगात जवळजवळ सगळ्याच क्षेत्रात संगणकाचा वापर अनिवार्य झाला आहे.

       संगणक या यंत्राने आपली अनेक कामे अतिशय सोपी केली आहेत. बँकेचे व्यवहार, शासकीय कामे, अभियांत्रिकी-वैद्यवकीय क्षेत्र, शाळा, महाविद्यालये अशा सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांत संगणक प्रणालीचा वापर आवश्यक झाला आहे. पैशांचे व्यवहार आणि हिशोबाची कामे संगणकामुळे सोपी झाली आहेत. इंटरनेटच्या शोधामुळे तर आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही विषयाची माहिती तत्काळ आपल्याला संगणकाच्या माध्यमातून मिळू शकते. त्यामुळे मानवाला ज्ञानाची दालने खुली झाली आहेत. ई-मेल, सोशल मीडिया यांसारख्या गोष्टींचा वापर करून एकमेकांबरोबर माहितीची देवाणघेवाण करणे आणि संपर्क साधणे दोन्ही सहज शक्य झाले आहे. संगणक ही आजच्या युगाची क्रांती आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. संगणकामुळे आपली कामे लवकर होतात. कोणतेही काम तत्काळ आणि अचूक करता येत असल्यामुळे मानवी जीवनामध्ये संगणक काळाची गरज बनला आहे. कोरोनाच्या काळात तर लॉकडाऊनमुळे शिक्षण, ऑफिसची कामे, मीटिंग्ज या सगळ्याच गोष्टींसाठी संगणक अतिशय महत्त्वाचा ठरला आहे.

       पण संगणकाचे अनेक उपयोग असले, तरी त्याचे काही तोटेदेखील आहेत. संगणकावर सतत काम केल्यामुळे अनेक लोकांना पाठदुखी, डोळ्याचे विकार जडत आहेत. संगणकावर काम करता करता माणसे अनेक वेळा संगणकाच्या आहारी गेल्याचे दिसून येते आहे. लहान मुले तसेच तरुण मुले अनेक वेळा दिवसभर कम्प्यूटर गेम खेळण्यात मग्न होतात. लहान मुले तर मैदानी खेळ विसरू लागली आहेत. त्या सगळ्याचा त्यांच्या डोळ्यांवर, शरीरावर, आरोग्यावर परिणाम होत आहे. संगणकामुळे दूरदूरच्या माणसांशी बोलणे सोपे झाले असले, तरी त्यामध्येच अडकून पडल्यामुळे घरातली माणसे, मित्रमंडळी यांच्याशी संवाद तुटला आहे. एक प्रकारचा दुरावा निर्माण होताना दिसत आहे. सोशल मीडियाचा दुरुपयोग करणे, सोशल मीडियाचा वापर करून खोटी माहिती पसरवणे, लोकांना भडकवणे अशा गोष्टी सर्रास घडताना दिसत आहेत. अनेक वेळा दहशतवादी कारवाया करण्यासाठी सुद्धा संगणकाचा वापर केला गेल्याचे आढळले आहे. सायबर गुन्हे, अफरातफरी घडून येताना दिसत आहेत.

       शेवटी संगणक हे उपकरण आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्याची क्षमता कितीही जास्त असली तरी त्याला स्वत:चा मेंदू नाही. त्यामुळे योग्य काय अयोग्य काय हे संगणक स्वत: ठरवू शकत नाही, ते संगणक वापरणाऱ्या माणसावर अवलंबून असते. म्हणूनच मानवाने आपली सदसद्विवेकबुद्धी आणि नैतिकता वापरून संगणकाचा वापर कुठल्या गोष्टीसाठी आणि किती प्रमाणात करायचा हे ठरवणे जास्त महत्त्वाचं आहे. जर संगणकाचा वापर समाजाच्या, देशाच्या हितासाठी आणि विधायक कामांसाठी केला गेला, तर संगणक हा मानवी जीवनासाठी नक्कीच वरदान ठरेल.

shaalaa.com
निबंध लेखन
  Is there an error in this question or solution?
2019-2020 (March) Set 1

APPEARS IN

RELATED QUESTIONS

खालील विषयांवर निबंध लेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

सूर्य मावळला नाही तर...


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वैचारिक निबंध

तंत्रज्ञानाची किमया.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी पाहिलेला अविस्मरणीय सामना


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

सैनिकाचे मनोगत


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

पेट्रोल संपले तर


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वैचारिक निबंध

वाचते होऊया.


‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

माझा आवडता खेळाडू


'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.


'वृत्तपत्रांचे महत्त्व' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.

वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×