Advertisements
Advertisements
Question
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
Solution
मी वृक्ष बोलत आहे
‘नमस्कार’ मी वृक्ष बोलतोय. माझा जन्म इथे या बागेत बऱ्याच वर्षांपूर्वी झाला होता. बागेत काम करुणाऱ्या माळी काकांनी इथे माझी बी पेरली. आधी मी आकाराने खूप छोटा होतो आता मोठा झालो. मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी देखील आहे, माझे नेहमी आनंदी राहण्यामागील कारण असे आहे की मी लोकांना खूप लाभ पोहोचवतो. जसे फळ, भाज्या, फूले, ऑक्सिजन इ. तसेच, जमिनीची धूप होऊ देत नाही. पाण्याची पातळी खोलवर पोहचवण्यास मदत करतो. झाडांवर खूप काही अवलंबून आहे. जसे पाऊस, वातावरणाचा समतोल राखणे. आम्हीच आहोत जे वरूण राजाला आमंत्रण देतो. त्यामुळे जलचक्र सुरळीत चालते. चांगला पाऊस म्हणजे उत्तम शेती म्हणजेच उत्तम उत्पादन.
गवत, झाड झुडुपं यामुळे निसर्गाची विविधता जपली जाते. सर्व वृक्ष ही जणू कल्पतरूच आहेत. कारण त्या सर्वांचा सर्वोतोपरी वापर हा फक्त मानवासाठीच आहे. तरी देखील तुम्ही आम्हाला दगड मारता, कुऱ्हाडी चालवता काय मिळते हे करून?
शहरीकरणाच्या नादात तुम्ही आम्हाला पृथ्वीवरून नाहिसे तर नाही करणार ना? निसर्गसंपत्ती म्हणजे आम्हीच आहोत. दुसरे तिसरे काही नाही, असे झाले तर काय हाहाकार माजेल या पृथ्वीतलावर याचा कधी विचार केला का तुम्ही? मान्य आहे राहण्यासाठी चांगले घर आवश्यक आहे. त्याचबरोबर आमची राखणपण खूप आवश्यक आहे.
मी प्रत्येकाला विनंती करतो, मला जपून ठेवा, अधिक झाडं लावा आणि पर्यावरणाचं रक्षण करा. पृथ्वीला सुखी आणि समृद्ध ठेवण्यासाठी माझं अस्तित्व अत्यावश्यक आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
आत्मवृत्तात्मक निबंध
मी सह्याद्री बोलतोय
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
‘निसर्ग माझा गुरु’ या विषयावर तुमचे विचार मांडा.
खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी पाहिलेला अविस्मरणीय सामना
‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.
विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!
‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.
‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
हुंडा-एक सामाजिक समस्या
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
लोकशाही आणि निवडणुका
अश्वमेध सभागृह – दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या – – कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन – दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8 प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी. |
वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
माझा आवडता खेळाडू
'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.