English

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा: मी पाहिलेला अविस्मरणीय सामना - Marathi

Advertisements
Advertisements

Question

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी पाहिलेला अविस्मरणीय सामना

Long Answer

Solution

मी पाहिलेला अविस्मरणीय सामना

१९८३ मध्ये भारताने कपिलदेवच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर १९८५ साली सुनिल गावस्करच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियामध्ये झालेली मिनी वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा तेव्हा “बेन्सन अ‍ॅन्ड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप” म्हणून ओळखली गेली होती. हीच ती स्पर्धा ज्यात रवी शास्त्री “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स” ठरला आणि ऑडी ही म्हागडी गाडी त्याला मिळाली.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे भारताने खेळलेला प्रत्येक सामना जिंकला. संपूर्ण स्पर्धेत भारताने फक्त २ झेल सोडले. या सामन्यात भारतीय संघाने क्षेत्ररक्षण अगदी दृष्ट लागण्याजोगे होते. स्पर्धेची सुरुवात भारत-पाकिस्तान सामन्याने झाली. याच स्पर्धेतला माझ्या दृष्टीने झालेला अविस्मरणीय सामना म्हणजे उपांत्य फेरीतला भारत-न्यूझीलंड सामना. भारताने आधीचे सगळे सामने जिंकून उपांत्य फेरीत रुबाबात प्रवेश केला होता.

भारताची उपांत्य फेरीत गाठ पडणार होती न्यूझीलंडशी, ५ मार्च १९८५ रोजी सिडनी येथे. क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजी या तिन्ही आघाड्यांवर न्यूझीलंड आपल्यापेक्षा सरसच होते.

भारताने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. सामन्याची सुरुवातही सनसनाटी झाली, कपिलदेवच्या पहिल्या षटकातल्या तिसऱ्याच चेंडूवर सलामीवीर जॉन राईट शून्यावर यष्टीमागे झेल देऊन परतला. न्यूझीलंड १ बाद 0. संपूर्ण स्पर्धेत भारताने प्रतिस्पर्ध्याची सलामीची जोडी लवकर फोडण्यात नेहमीच यश मिळवलं. या स्पर्धेत भारतीय यष्टीरक्षक होता सदानंद विश्वनाथ. या पठ्ठ्याने एकही झेल सोडला तर नाहीच शिवाय एकही बाय दिली नाही. हा ही एक विक्रमच. सदानंद विश्वनाथ परत भारतीय संघात कधीच खेळला नाही आणि कुठे गायब झाला देव जाणे. जॉन रीड आणि फिल मॅकइवान यांनी हळूहळू धावसंख्या वाढवायला सुरुवात केली. न्यूझीलंडची दुसरी विकेट १४ धावांवर पडली. त्यानंतर आलेल्या मार्टिन क्रोला देखील फारसा टिकाव धरता आला नाही. तोही ९ धावा करुन मदनलालच्या गोलंदाजीवर अझरच्या हाती झेल देऊन बाद झाला. मागोमाग कप्तान जेफ हॉवर्थ देखील दुर्दैवीरित्या धावचीत झाला. हॉवर्थने शास्त्रीचा चेंडू हलकेच फाईन लेगच्या दिशेने मारला आणि १ धाव घेउन दुसऱ्या धावेसाठी परत फिरला. धावता धावता त्याच्या उजव्या पॅडचा बंद सुटला, त्यामुळे त्याचा वेग मंदावला.

न्यूझीलंड ९ बाद २०६. समोर केर्न्ससारखा आडदांड कर्दनकाळ फलंदाजीला. ५ वा चेंडू परत निर्धाव गेला आणि ६ वा चेंडू केर्न्सने परत तोच फटका अगदी त्याच पद्धतीने परत श्रीकांतकडेच मारला, ह्यावेळेस मात्र श्रीकांतने चूक केली नाही. शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंड सर्वबाद २०६.

२०७ धावांच लक्ष्य घेउन शास्त्री आणि श्रीकांत ही भारताची सलामीची जोडी मैदानात उतरली. रिचर्ड हॅडली आणि इयान चॅटफिल्ड या किवींच्या तेज दुकलीचा पहिला स्पेल इतका अचूक होता की श्रीकांतसारख्याची तलवार एकदम म्यान झाली. एकाही चौकाराची नोंद न करता २८ चेंडूत श्रीकांतने फक्त ९ धावा केल्या आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्याजागी आलेला अझरुद्दीन तर इतक्या अचूक गोलंदाजीसमोर सुरुवातीपासूनच चाचपडत होता. मग धावा काढणं तर दूरची गोष्ट झाली. भारताच्या २० व्या षटकांत कशाबशा ५० धावा फलकावर लागल्या. हॅडली, चॅटफील्ड, स्नेडन आणि केर्न्स यांनी एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी कशी करावी याचा उत्कॄष्ट पुरावा सादर केला. या चौघांनी शास्त्री आणि अझर यांना पुरतं जखडून ठेवलं होतं.

चॅटफिल्ड तर एकदिवसीय सामन्यातला आदर्श गोलंदाज. धावा देण्यात महाकंजूष. भारत ३० षटकांत ३ बाद १०२ धावा. यावेळेस गावस्करने मोहिंदर अमरनाथ किंवा स्वतः न येता कपिलदेवला बढती देऊन पाठविले. त्याचा हा जुगार चांगलाच यशस्वी ठरला. कपिलने आल्या आल्या हॅडलीला स्क्वेअर ड्राईव्हचा चौकार मारुन आपला इरादा स्पष्ट केला. शास्त्री आणि अझर या दोघांना मिळून ३० षटकांपर्यंत केवळ चारच चौकार मारता आले होते यावरुन किवी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण किती अचूक होतं याची पुरेशी कल्पना येऊ शकेल. वेंगसरकर आणि कपिलदेव यांनी मग खेळाची सूत्रे आपल्या हातात घेतली. शक्य होईल तेव्हा १-२ धावा पळून काढण्यात कुचराई केली नाही. खराब चेंडूंना सीमारेषा दिसू लागली. धावफलक हलता ठेवण्यात दोघांनाही यश आले. वेंगसरकरच्या फलंदाजीच्या दर्जाबाबत प्रश्नच नव्हता पण कपिलनेपण परिस्थिती ओळखून जबाबदारीने फलंदाजी केली. त्या वेळेस आततायीपणा केला असता तर मॅच परत न्यूझीलंडच्या हातात जाण्यास वेळ लागला नसता. दोघांच्या धावा काढण्याच्या सातत्यामुळे आधी धोकादायक वाटणारी किवी गोलंदाजी आता एकदम सामान्य वाटू लागली. अझर, शास्त्री आणि श्रीकांत जिथे धावा काढण्यासाठी चाचपडत होते तिथेच या दोघांनी आपला दर्जा सिद्ध करत धावा कशा काढाव्यात याचं सुरेख प्रात्यक्षिक दिलं. वेंगसरकर आणि कपिलदेव यांनी वैयक्तिक अर्धशतकं पण पूर्ण केली. ३० व्या षटकांत फक्त १०२ धावा होत्या तिथे ४३व्याच षटकांत २०७ धावा करुन दोघांनी सामनाही जिंकून दिला. वेंगसरकरने ५९ चेंडूत ६३ धावा तर कपिलने ३७ चेंडूत ५४ धावा फटकावल्या.

कपिलने रिचर्ड हॅडलीच्या नवव्या षटकांत विजयी धाव घेतल्यानंतर गावस्करने पॅव्हेलियनमधून धावत येऊन मैदानावरच कपिल आणि वेंगसरकरला मिठी मारली. या दोघांनी शांत चित्ताने परिस्थितानुसार जो खेळ केला त्याला तोड नव्हती. या विजयामुळे भारत अंतिम फेरीत दाखल झाला. अंतिम फेरीत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ८ विकेट्सनी पराभूत करुन “बेन्सन अ‍ॅन्ड हेजेस” कप जिंकला. याच स्पर्धेत रवी शास्त्री “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स” ठरला आणि ऑडी गाडीचा मानकरी ठरला.

shaalaa.com
निबंध लेखन
  Is there an error in this question or solution?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

RELATED QUESTIONS

खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वर्णनात्मक निबंध

पहाटेचे सौंदर्य.


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

व्यक्तिचित्रणात्मक निबंध

माझा आवडता कलावंत.


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वैचारिक निबंध

तंत्रज्ञानाची किमया.


नमुना कृती:


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


‘निसर्ग माझा गुरु’ या विषयावर तुमचे विचार मांडा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

माझे आवडते शिक्षक


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

सूर्य उगवला नाही तर ........


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान


सूहृद मंडळ, नाशिक.
- आयोजित -
बालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ
दि. - 10 डिसेंबर वेळ - सकाळी 10.00
प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्ते
सूहृद मंडळ, नाशिक.

वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


केल्याने देशाटन

महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे

‘गिर्यारोहण कॅम्प’

विशेष ‘गौरव’ सोहळा

वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।


खालील मुद्द्यांच्या आधारे महापुरात अडकलेल्याच्या एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा:


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

खेळांचे जीवनातील स्थान


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

गप्पा मारण्याचे व्यसन


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

परीक्षाच नसत्या तर


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

आरोग्य हीच संपत्ती


चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा. 

मी अनुभवलेला पाऊस


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

माझा आवडता खेळाडू


मी पक्षी झाले तर.....

चौकटीतील मुद्‌द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.


'माझा आवडता लेखक/कवी' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.


'वृत्तपत्रांचे महत्त्व' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.

वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.


वरील कार्यक्रमास तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×