English

मी पक्षी झाले तर..... चौकटीतील मुद्‌द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा. शाळेत उडून जाईन, वाहतूक कोंडीचा प्रश्न नाही, निसर्गाचे दर्शन, प्रवासात तिकिट नको, व्हिसा, पासपोर्ट नको - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

मी पक्षी झाले तर.....

चौकटीतील मुद्‌द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.

Short Answer

Solution

मी पक्षी झाले, तर...

जर कधी देवाने माझ्यासमोर उभे राहून, “तुम्हाला काय हवं ते मागा” असं म्हटलं, तर मी त्याला तत्काळ सांगेन, “मला पक्षी बनवा!” पक्षी बनल्यानंतरचा आनंद हा अवर्णनीय असेल! सकाळच्या धकाधकीतून मुक्ती मिळेल. मी उडूनच शाळेत जाईन, वाहतुकीची कोंडी, खड्डे, आणि सायकल चालवण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळेल. बस किंवा रेल्वेच्या तिकिटांची चिंता नसेल. आमच्या शेजारचा दादा शिक्षणासाठी परदेशी चालला होता, त्यावेळी पासपोर्ट व व्हिसा यांनी त्याचा जीव खाल्ला होतो. हे असले त्रास तर नावालाही नसतील.

प्रवास करायचा झाला तर, ‘इथे जाऊ का? तिथे जाऊ का?’ अशी विचारणा नसेल. पंख पसरावेत आणि उडाण घ्यावं. जिथे हवं तिथे जावं. कधी फांदीवर, कधी झाडाच्या टोकावर बसावं. निसर्गाचं सौंदर्य आत्मसात करावं. उंचावर जाऊन आकाशाचा अनुभव घ्यावा, ढगांवर बसून विश्रांती घ्यावी.

पण, एक गोष्ट मनात अस्वस्थ करते. पक्षी बनल्यावर, शाळा कुठे असेल? माझे मित्र कुठे असतील? खेळायला कसं जाणार? भाषेचा प्रश्न आहे. मी एकटीच आकाशात उडत राहणार? मग ते एकांत असह्य होईल. पक्षी बनण्याचा विचार रोमांचक आहे, पण त्यात दु:खही आहे.

shaalaa.com
निबंध लेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 21: उपयोजित लेखन - लेखनकौशल्य [Page 114]

APPEARS IN

Balbharati Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
Chapter 21 उपयोजित लेखन
लेखनकौशल्य | Q ३. | Page 114

RELATED QUESTIONS

खालील विषयांवर निबंधलेखन करा.

आत्मवृत्तात्मक निबंध

मी सह्याद्री बोलतोय


खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी शाळेची घंटा बोलतेय


सूहृद मंडळ, नाशिक.
- आयोजित -
बालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ
दि. - 10 डिसेंबर वेळ - सकाळी 10.00
प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्ते
सूहृद मंडळ, नाशिक.

वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.

विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!


‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:

विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

खेळांचे जीवनातील स्थान


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!


अश्वमेध सभागृह

– दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या –

– कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन –

दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8

प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे

35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या

वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी.

वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

माझा आवडता खेळाडू


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा. 

मी फळा बोलतोय


'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.


क्रीडांगण बोलू लागले तर...... या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.


दिलेल्या मुदूदांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×