English

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

Long Answer

Solution

मोबाइलचे आत्मकथन

माझा शोध सर्वात आधी मोटोरोला कंपनीचे शोधक मार्टिन कूपर यांनी इ.स. 1973 साली लावला होता. हॅलो! मित्रांनो, मीच बोलतोय तुमचा आवडता मोबाइल. मी आता जुना झालो ना, म्हणून इकडे कपाटात बंद आहे. जेव्हा मी नवीन होतो तेव्हा काय थाट होता माझा! टेलिफोननंतर आमचा शोध लागला. घरापासून दूर असतानाही संपर्कात राहता यावे यासाठी खरं तर आमची निर्मिती झाली. आज आमच्या रूपात एवढे बदल झाले आहेत, की आजची माझी भावंडे 'स्मार्ट' म्हणूनच ओळखली जातात.

शहरातील एका प्रसिद्ध मोबाईल दुकानात मला सजवून ठेवण्यात आले. माझ्या लोकप्रियतेबद्दल काय बोलणार. लोकांना माझे वेडच लागते म्हणा ना. पूर्वी माझा वापर खूप मर्यादित आणि खर्चिक होता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. अगदी रस्त्यावरील भिकाऱ्यापासून मोठ्या उद्योगपतीपर्यंत साऱ्यांकडे माझ्या भावंडांचा वावर असतो. लहान मूल असो किंवा वृद्ध असोत, सारेच माझ्या प्रेमात पडतात. केवळ संपर्क साधण्यासाठी माझी निर्मिती झाली होती; मात्र आजकाल मी सगळयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालो आहे.

माझ्या कॅमेराच्या मदतीने अनेक फोटो काढीत असत. संगणकाची जागा जणू मीच काबिज केली आहे. मोबाइल 'स्मार्ट' झाला. त्यामुळे, लोकांचे मनोरंजन करू लागला. आम्ही तुम्हांला बँका, हॉटेल, वीजबील इत्यादी गोष्टींमध्ये उपयोगी पडतो. 'सोशल मीडिया' नावाचा जादुगार आमच्याच जीवावर तुम्हांला भुरळ घालत असतो. जगात कुठे काहीही घडत असेल, तर टिव्हीप्रमाणेच ते मोबाइलवरसुद्धा पाहता येते. 'व्हिडिओ कॉल' मुळे तुम्ही कुठे, कोण, काय करताय हे प्रत्यक्ष पाहू शकता.

माझी निर्मिती ही लोकांच्या सेवेसाठीच झाली आहे; पण लोकांना माझे व्यसन लागते. आपल्या दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमातसुद्धा थोड्याथोड्या वेळाने माझ्याकडे बघितल्याशिवाय तुम्हांला चैन पडत नाही. यामुळे, लोक माझ्यामुळे तरुण पिढी बिघडते असे म्हणतात. खूप वाईट वाटतं रे तेव्हा! मला बनवणारे पण तुम्हीच आणि वापरणारे पण तुम्हीच. माझा सुयोग्य वापर कराल, तर नक्कीच मी तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. माझ्यातून बाहेर पडणारे तरंग काही वेळा आरोग्याकरता हानिकारक ठरतात. त्यामुळे, माझा मर्यादित वापर करणे आवश्यक आहे.

या कोरोना संकटाच्या काळात शाळा, महाविद्यालये बंद पडली त्यावेळी माझ्या भावंडांनी खेडोपाडीसुद्धा 'ऑनलाईन' शाळा चालवण्याचा पराक्रम करून दाखवला ना? शिवाय, तुमच्या अभ्यासाचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत माझ्याद्वारेच पोहोचले. तुमच्या अभ्यासाला कोणतीही अडचण आली नाही याचा मला अभिमान वाटतो.

माझे व्यसन लावून घेण्यापेक्षा माझा वापर आपल्या कामासाठी कसा करता येईल ते पाहा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. माझ्यामुळे इंटरनेट तुमच्या खिशात असते. या मायाजालात गुरफटले न जाता तुमच्या उपयोगाच्या गोष्टींचा शोध घ्या. मोबाइलच्या अतिवापाराने तुमचे डोळे, कान, मान अगदी मेंदूवरही वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, कुठे थांबायचे हे ठरवा. मीही थांबतो एवढे बोलून.

shaalaa.com
निबंध लेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 20.3: उपयोजित लेखन - निबंधलेखन

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi 10 Standard SSC
Chapter 20.3 उपयोजित लेखन
निबंधलेखन | Q इ. ४.
SCERT Maharashtra Marathi (Second Language) 10 Standard SSC
Chapter 16.3 उपयोजित लेखन
निबंधलेखन २ | Q इ. ४.

RELATED QUESTIONS

खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वर्णनात्मक निबंध

पहाटेचे सौंदर्य.


नमुना कृती.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


‘निसर्ग माझा गुरु’ या विषयावर तुमचे विचार मांडा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी पाहिलेला अविस्मरणीय सामना


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

माझे आवडते शिक्षक


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी शाळेची घंटा बोलतेय


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.


खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

खेळांचे जीवनातील स्थान


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

मी रेडिओ बोलतोय


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

फॅशनचे वेड


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

आरोग्य हीच संपत्ती


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

पेट्रोल संपले तर


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वैचारिक निबंध

वाचते होऊया.


चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा. 

मी अनुभवलेला पाऊस


खालील मुद्‌द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.


'माझा आवडता लेखक/कवी' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

दिलेल्या मुदूदांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×