English

‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे ‘वीरांगना’ या पाठाच्या आधारे स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे ‘वीरांगना’ या पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

Answer in Brief

Solution

'वीरांगना' या प्रस्तुत पाठात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे पोलीस दलातील सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या स्तुत्य सामाजिक कार्याचा थोडक्यात परिचय दिला आहे.
             प्रामुख्याने गरीब कुटुंबातील भरकटलेली अल्पवयीन मुले ही प्रेमाचा-आपुलकीचा अभाव, कौटुंबिक वाद, अठराविश्वे दारिद्र्य, मुंबईचे किंवा बॉलिवूडचे आकर्षण, नातेवाईकांच्या भेटीसाठी, अनोळखी मैत्रीचा शोध, बेकायदेशीर कामांकरता झालेले अपहरण अशा विविध कारणांमुळे स्वत:चे घर सोडून मुंबईसारख्या मायानगरीत येतात. घरापासून, आई-वडिलांपासून दुरावलेल्या या मुलांना अनोळखी ठिकाणी मायेने विचारपूस करणारे कोणीही नसते. अशावेळी त्यांचे मनपरिवर्तन करून त्यांना सन्मार्ग दाखवण्याची गरज असते. हेच कार्य मुंबईच्या रेल्वे पोलीस दलातील उपनिरीक्षक रेखा मिश्रा यांनी केले. या भरकटलेल्या मुलांना पोलिसी बडगा दाखवण्याऐवजी त्यांनी 'मुझसे दोस्ती करोगे?' असे म्हणत मैत्रीचा हात पुढे केला. काही वेळा प्रेमाने, तर काही वेळा कायद्याची भीती दाखवूनही मुलांना चुकीच्या गोष्टींपासून दूर करावयाचे आव्हान त्यांनी पेलले. हे सर्व करताना प्रेम व आपुलकी या दोहोंच्या माध्यमातून त्यांनी भरकटलेल्या मुलांना सन्मार्ग दाखवला व सुरक्षितपणे स्वगृही पोहोचवण्याचे कार्य केले.

shaalaa.com
वीरांगना
  Is there an error in this question or solution?
Chapter 15.2: वीरांगना - कृती क्रमांक ३

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi 10 Standard SSC
Chapter 15.2 वीरांगना
कृती क्रमांक ३ | Q ३)

RELATED QUESTIONS

खालील आकृती पूर्ण करा.


‘पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.


टिपा लिहा.

देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक


टिपा लिहा.

जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक


‘प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश’, पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.


‘मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा’, या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.


हा पाठ (वीरांगना) वाचल्यावर तुमच्या मनात येणारे भाव शब्दबद्ध करा.


पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.


‘भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत’, हे पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.


खालील आकृती पूर्ण करा.


'कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला', या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.


'पती निधनानांतर आपण सैन्यात भरती व्हायचं', स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.


टिपा लिहा.

देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक


टिपा लिहा.

जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक


'प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश', पाठाच्या आधारे स्पष्ट करा.


'मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा', या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.


मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.


'भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत', हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×