Advertisements
Advertisements
Question
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
उत्तमलक्षण
- प्रस्तुत कवितेच्या कवीचे/ कवयित्रीचे नाव लिहा. (१)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (१)
- कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (२)
Solution
- कवी - संत रामदास
- सर्वज्ञपणा अंगी यावा याकरता समर्थ रामदासांनी 'उत्तमलक्षण' या रचनेत सर्वसामान्य लोकांना आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. आदर्श व्यक्तीने सामाजिक व वैयक्तिक जीवनात कसे वागावे व कसे वागू नये, काय करावे व काय करू नये, याचे मार्गदर्शन या रचनेतून ते करतात.
- 'उत्तमलक्षण' या कवितेत संत रामदास यांनी आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट केली आहे. 'काय करावे' व 'काय करू नये' यांबाबतचे त्यांचे मार्गदर्शन मला विशेष आवडले. परपीडा, उपकार यांसारख्या उपसर्गघटित, तर सत्यमार्ग यांसारख्या सामासिक शब्दांचा वापर केल्यामुळे मराठी भाषेची समृद्धी या कवितेतून जाणवते. प्रत्येक ओवीच्या पहिल्या तीन चरणांत 'नये' या शब्दाची पुनरावृत्ती होऊन यमक साधले आहे. यामुळे, कविता नादमय झाली आहे. तसेच, ही कविता आपल्याला जीवन कसे जगावे याचा आदर्शच घालून देते. या सर्व वैशिष्ट्यांमुळे मला ही कविता खूप आवडते.
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण व तीन दोष शोधून लिहा.
खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात.
तोंडाळ
खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात.
संत
खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा.
गोष्टी | दक्षता |
(१) आळस | ______ |
(२) परपीडा | ______ |
(३) सत्यमार्ग | ______ |
खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा.
‘जनीं आर्जव तोडूं नये। पापद्रव्य जोडूं नये।
पुण्यमार्ग सोडूं नये। कदाकाळीं।।’
‘सभेमध्यें लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये।’, या ओळीतील विचार स्पष्ट करा.
‘आळसें सुख मानूं नये’, या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
उत्तमलक्षण
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) कोष्टक पूर्ण करा. (२)
श्रोतीं व्हावें सावधान। आतां सांगतों उत्तम गुण। वाट पुसल्याविण जाऊं नये। फळ ओळखिल्याविण खाऊं नये। जनीं आर्जव तोडूं नये। पापद्रव्य जोडूं नये। तोंडाळासीं भांडों नये। वाचाळासीं तंडों नये। आळसें सुख मानूं नये। चाहाडी मनास आणूं नये। सभेमध्यें लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये। कोणाचा उपकार घेऊं नये। घेतला तरी राखों नये। व्यापकपण सांडूं नये। पराधेन होऊं नये। सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये। अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी। |
२) खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा. (२)
क्र. | गोष्टी | उत्तर | दक्षता |
i. | आळस | ______ | मानू नये. |
ii. | परपीडा | ______ | वागू नये. |
iii. | सत्यमार्ग | ______ | नये. |
iv. | सभेतील वर्तन | ______ | नये. |
३) खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)
सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये।
कदा अभिमान घेऊं नये। असत्याचा।
४) खालील काव्यपंक्तींतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा. (२)
तोंडाळासी भांडो नये। वाचाळासीं तंडों नये।
संतसंग खंडूं नये। अंतर्यामीं।
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी।
विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची।