Advertisements
Advertisements
Question
खालील मुद्द्यांच्या आधारे बाली बेटाची माहिती लिहा.
Long Answer
Solution
- स्थान: आग्नेय आशियातील इंडोनेशियातल्या बेटांच्या समूहात बाली बेट बसले आहे. घनदाट किर्र जंगले, रम्य समुद्रकिनारे, समुद्रकिनाऱ्याजवळच्या नारळीपोपळीच्या राया, फुलांनी बहरलेले गर्द बगिने अशा निसर्गसौंदर्याचे लेणे या बेटाला लाभले आहे.
- घरे व हॉटेल्स: झापांची छपरे असलेल्या झोपड्या व समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या हॉटेल्सचा उल्लेख या पाठामध्ये आला आहे.
- टुरिस्ट खात्याची तत्परता: या बेटावर येणाऱ्या पर्यटकांची (टुरिस्टांची) व्यवस्था पाहण्यासाठी इथले टुरिस्ट खाते सदैव तत्पर असते, मध्यरात्री आलेल्या पर्यटकांचेही हसतमुखाने आणि प्रसन्नपणे हॉटेलमध्ये स्वागत केले जाते.
- या बेटाचे बदलते रूप: डोक्यावर घरघरणारी विमाने, रेडिओचा वापर, तंबूत लागलेला सिनेमा, उपलब्ध वर्तमानपत्रे या आधुनिक युगाच्या साधनांनी या बेटाचे रूप बदलत चालल्याचे लेखकाने नमूद केले आहे.
- निसर्ग सौंदर्य: समुद्रकिनारी हॉटेल लगत गर्दे राई आहे. माडापोफळीच्या राया आहेत, ताज्या टवटवीत फुलांनी बहरलेली रोपटी आहेत.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?