English

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा: आदर्श विदयालय, अहमदनगर स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष उपक्रम दि. 1 ऑक्टोबर ते दि. 7 ऑक्टोबर - शालेय परिसर स्वच्छता व वर्गखोल्या स्वच्छता - - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

आदर्श विदयालय, अहमदनगर

स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष उपक्रम

दि. 1 ऑक्टोबर ते दि. 7 ऑक्टोबर

- शालेय परिसर स्वच्छता व वर्गखोल्या स्वच्छता -

विद्यालयात 'स्वच्छतादूत' म्हणून काम केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार

सत्कार समारंभ - दि. 7 ऑक्टोबर

दु. 4.00

संपर्क - विभाग प्रमुख, स्वच्छता सप्ताह उपक्रम

[email protected]

अमर/अमृता शाह विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने स्वच्छतादूतांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

Writing Skills

Solution

दिनांक: 9 ऑक्टोबर, २०२४

प्रति,
सन्माननीय स्वच्छतादूत,
आदर्श विद्यालय,
महात्मा गांधी मार्ग,
अहमदनगर
इ-मेल - [email protected]

विषय: स्वच्छता सप्ताहातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल अभिनंदन करणे बाबत.

माननीय महोदय,

मी अमृता शाह, आदर्श विद्यालय, अहमदनगर येथील विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपल्याला हे पत्र लिहीत आहे. दि. १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत आपल्या विद्यालयात स्वच्छता सप्ताहानिमित्त आयोजित केलेला सुंदर उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी मनापासून सहभाग घेतला, परंतु तुम्ही हा उपक्रम केवळ एक कर्तव्य म्हणून न समजता, मनोभावे स्वच्छतेचे कार्य केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन!

तुमच्या या प्रयत्नांमुळे इतर विद्यार्थ्यांनाही कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली. शाळेने तुमच्या योगदानाची दखल घेत दि. ७ ऑक्टोबर रोजी तुमचा विशेष सत्कार समारंभ आयोजित केला, ज्यामध्ये तुमच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.

स्वच्छतेसाठी दाखवलेल्या तुमच्या पुढाकारामुळेच हा उपक्रम यशस्वी होऊ शकला. भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये तुम्ही असाच सक्रिय सहभाग घ्याल, अशी आशा आहे. पुन्हा एकदा तुमचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद!

आपली विश्‍वासू,
अमृता शाह
आदर्श विद्यालय,
अहमदनगर
इ-मेल - [email protected]

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×