Advertisements
Advertisements
Question
खालील परिच्छेद वाचा. त्यातील नामे, सर्वनामे, विशेषणे व क्रियापदे ओळखा.
खूप दिवसांनी अन्वर आज बागेत खेळायला गेला होता. त्याला त्याचा जिवाभावाचा मित्र इरफान दिसला. त्या दोघांना एकमेकांना पाहून खूप आनंद झाला. त्यांनी एकमेकांबरोबर मनमुराद गप्पा मारल्या. त्यानंतर त्या दोघांनी बॅडमिंटनही खेळले. घरी जाताना अन्वर इरफानला म्हणाला, ‘‘मित्रा, आज आपण खूप दिवसांनी भेटलो. मला खूप आनंद झाला आहे. तू नव्हतास तर मला अजिबात करमत नव्हतं.’’ त्यावर इरफानने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला, ‘‘मित्रा, उद्यापासून आपण दररोज बागेत भेटायचं आणि भरपूर खेळायचं.’’ |
Solution
नामे: दिवस, अन्वर, बाग, मित्र, इरफान, आनंद, गप्पा, बॅडमिंटन, घरी, हात.
सर्वनामे: त्याला, त्याचा, त्या, त्यांनी, आपण, मला, तू.
विशेषणे: खूप, मनमुराद, भरपूर.
क्रियापदे: गेलां होता, दिसला, झाला, मारल्या, खेळले, म्हणाला, भेटलो, आहे, नव्हतं, घेतला, भेटायचं, खेळायचं.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.
विधीप्रमाणे-
अनुस्वार वापरून लिहा.
जङ्गल - ______
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घाला.
हो हो आमची तयारी आहे
समूहदर्शक शब्दाची यादी करा.
उदा. धान्याची रास
लाकडाची -
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
अलगूज-
खालील शब्दासाठी शेवट समान असणारा कवितेतील शब्द लिहा.
रास -
खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
माय -
खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
टुकुटुकु पाहणे -
खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.
सभोवार दाट झाडी होती.
खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.
उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.
कुरणावरती -
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
मातृभूमी -
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
तो प्रामाणिक आहे बाबांनी सांगितले.
पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
लंकेची पार्वती -
'गुलगुलीत बिछाना' याप्रमाणे खाली दिलेल्या चौकोनांतील शब्दांच्या जोड्या जुळवा.
'अ' गट | 'ब' गट |
१. टवटवीत | अ. जेवण |
२. चमचमीत | आ. डोळे |
३. ठणठणीत | इ. दगड |
४. बटबटीत | ई. भाजी |
५. मिळमिळीत | उ. आरोग्य |
६. गुळगुळीत | ऊ. फूल |
खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.
खालील तक्ता पूर्ण करा.
शब्द | मूळ शब्द | लिंग | वचन | सामान्य रूप | विभक्ती प्रत्यय | विभक्ती |
(१) कागदपत्रांचे | ______ | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
(२) गळ्यात | ______ | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
(३) प्रसारमाध्यमांनी | ______ | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
(४) गिर्यारोहणाने | ______ | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
खालील शब्दसमूह वाचा. त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा.
मारियाने आकाशाकडे पाहिले.
विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.
सांडणे × ______
अनुस्वार वापरून लिहा.
चेण्डू - ______
खालील उदाहरण अभ्यासा व तक्ता पूर्ण करा.
तू माउलीहून मयाळ। चंद्राहूनि शीतल।
पाणियाहूनि पातळ। कल्लोळ प्रेमाचा।।
उपमेय | उपमान | समान गुण |
तू (परमेश्वर/गुरू) | ||
चंद्र | ||
पातळपणा |