Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील परिच्छेद वाचा. त्यातील नामे, सर्वनामे, विशेषणे व क्रियापदे ओळखा.
खूप दिवसांनी अन्वर आज बागेत खेळायला गेला होता. त्याला त्याचा जिवाभावाचा मित्र इरफान दिसला. त्या दोघांना एकमेकांना पाहून खूप आनंद झाला. त्यांनी एकमेकांबरोबर मनमुराद गप्पा मारल्या. त्यानंतर त्या दोघांनी बॅडमिंटनही खेळले. घरी जाताना अन्वर इरफानला म्हणाला, ‘‘मित्रा, आज आपण खूप दिवसांनी भेटलो. मला खूप आनंद झाला आहे. तू नव्हतास तर मला अजिबात करमत नव्हतं.’’ त्यावर इरफानने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला, ‘‘मित्रा, उद्यापासून आपण दररोज बागेत भेटायचं आणि भरपूर खेळायचं.’’ |
उत्तर
नामे: दिवस, अन्वर, बाग, मित्र, इरफान, आनंद, गप्पा, बॅडमिंटन, घरी, हात.
सर्वनामे: त्याला, त्याचा, त्या, त्यांनी, आपण, मला, तू.
विशेषणे: खूप, मनमुराद, भरपूर.
क्रियापदे: गेलां होता, दिसला, झाला, मारल्या, खेळले, म्हणाला, भेटलो, आहे, नव्हतं, घेतला, भेटायचं, खेळायचं.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
काजवे चमकणे-
खालील वाक्यात आलेली विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.
आवडले का तुला हे पुस्तक
अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.
बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले.
खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारांनुसार चौकटीत वर्गीकरण करा.
तिथे, दररोज, टपटप, क्षणोक्षणी, सावकाश, पलीकडे, अतिशय, पूर्ण, परवा, समोरून, जरा, मुळीच, कसे, वर, थोडा, सतत, झटकन.
कालवाचक क्रियाविशेषण अव्यय | स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय | रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय | परिमाणवाचक/संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय |
खालील परिच्छेद वाचा व त्यातील सर्वनामे अधोरेखित करा.
सलीम नुकताच शाळेत दाखल झाला होता. त्याला शाळेत करमत नव्हते. तो त्याच्या आईबरोबर शाळेत यायचा. तेवढ्यात त्याला त्याची मैत्रीण दिसली. सलीम त्याच्या आईला म्हणाला, ‘‘तू जा. मी आज तिच्याबरोबर घरी येईन." |
शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा ______ वाढला.
खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.
खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.
उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.
कुरणावरती -
खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.
उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.
ऊनसावली -
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
गणू म्हणाला अग आई उद्या सुट्टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही
पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
कळीचा नारद -
तो रस्ता खासगी असल्यामुळे आपले वाहन तेथून नेण्याला ______.
खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.
नवल वाटणे -
एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे. - ______
'गावभर मिरवणे' म्हणजे संपूर्ण गावातून फिरणे. खालील शब्दांना 'भर' हा शब्द जोडा आणि वाक्यांत उपयोग करा. सांगा.
उदा., बाबांनी पोतंभर धान्य आणलं.
क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.
ताई पुस्तक ______
रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.
______ गवत खाते.
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
आवड × ______
पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.
वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का