Advertisements
Advertisements
Question
खालील प्रश्नाचं उत्तर सुमारे ७०/७५ शब्दात लिहा.
ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांनी लेखिकेशी बोलताना कोणते विचार व्यक्त केले?
Solution
अनुराधा प्रभुदेसाई यांच्या "वीरांना सलामी" या लेखात कारगिल विजयस्तंभाच्या पहिल्या दर्शनाने मन रोमांचित होतं. त्या क्षणी प्रतिवर्षी सीमेवर जाऊन जवानांना सलामी देण्याची शपथ घेतली. सलग पाच वर्षे त्या ही परंपरा पाळत राहिल्या. शेवटच्या वर्षी ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांनी लेखिकेशी बोलताना हे मिशन सुरूच ठेवावे, असे मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे जवानांना प्रेरणा मिळते आणि त्यांच्या कार्याबद्दल अभिमान वाटतो.
त्यांनी नागरिकांनी देशसेवेसाठी योगदान देण्यावरही भर दिला. याशिवाय, लेखिकेने शहरी मुलांनी किमान पाच वर्षे संरक्षण सेवेत सामील व्हावे आणि मुलींनी सैनिकांशी विवाह करण्यास कधीही मागेपुढे पाहू नये, असे आवाहन करून त्यांच्या विचारांना पाठिंबा दिला. या विचारांनी देशप्रेमाचा खरा अर्थ अनुभवायला मिळतो.