English

Marathi Board Sample Paper 2024-2025 Commerce (English Medium) Class 12 Question Paper Solution

Advertisements
Marathi [Board Sample Paper]
Marks: 80 CBSE
Commerce (English Medium)
Science (English Medium)
Arts (English Medium)

Academic Year: 2024-2025
Date: March 2025
Advertisements

सर्वसाधारण सूचना:

  1. या प्रश्नपत्रिकेत A, B, C, D असे चार विभाग आहेत.
  2. सर्व विभाग आवश्यक आहेत.
  3. यथाशक्य सर्व विभागाची उत्तरे क्रमाने यावीत.
  4. एकाच विभागातील सर्व प्रश्नांची उत्तरे क्रमानेच यावीत.

विभाग A: वाचन व आकलन (15)
[10]1

पुढील परिच्छेद लक्षपूर्वक वाचा आणि त्याआधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

माणसाखालोखाल मला निसर्ग मला प्रिय आहे. तशाच आवडत्या आहेत माझ्या बालपणाच्या आठवणी. त्यातूनही मला विषय मिळत गेले. माझ्या वाचनाला काही शिस्त नाही. लहानमोठे, बरेवाईट, भव्य-क्षुद्र सारे मला वाचायला आवडते. या वाचनातून काहीतरी अवचित डोळ्यांना दिसते. मनात घुसते आणि हो... माझ्या आवडत्या मांजरांनी तर अनेकदा मला लेखनाला विषय दिले आहेत. राजकारण आणि समाजकारण यात मला फारसा रस नाही त्यामुळे त्या विषयाचा मात्र माझ्या लेखनात अभाव आहे.

माझे बरेचसे ललित लेख वृत्तपत्रांतून सदर चालवताना लिहिले गेले आहेत. वृत्तपत्रात सदर चालवणे ही गोष्ट काही लेखकांना कमीपणाची वाटते. हे लेखन शाश्वत नसते, त्यात फक्त तात्कालिक घटना प्रसंगावरच लिहिले जाते, त्याला एक चुरचुरीत उथळपणा असतो, जीवनाचा सखोल तळ गाठण्याची त्या लेखनात कुवत नसते, आजचे वृत्तपत्र ही उद्याची रद्दी असते, हे आणि तसेच कितीतरी आक्षेप वृत्तपत्रातल्या सदरावर घेतले जातात. त्यातल्या काहींमध्ये सत्याचा अंश असू शकेल. तरीही वृत्तपत्रात एखादे सदर नियमितपणे चालवणे, यात लेखकाला कमीपणा आणणारे काही आहे असे मला वाटत नाही. निदान माझा तरी असा अनुभव नाही. वाहत्या प्रवाहात अंग झोकून पाण्यावर तरंगताना पोहणाऱ्याला जो अनुभव मिळतो, तोच आनंद असे मुक्त लेखन सातत्याने करताना मला लाभला आहे. ललितलेख लिहिण्यासाठी कोणते गुण आवश्यक असतात? पूर्वग्रहरहितता, मनाचे डोळसपण, जीवनाबद्दलचे उदंड कुतूहल आणि कोणत्याही लहानमोठ्या गोष्टींना चटकन प्रतिसाद देणारी संवेदनक्षम वृत्ती यांची या लेखनाला फार आवश्यकता आहे असे मला वाटते. शिवाय लिहिण्याची हौस हवी आणि कष्टाची तयारी हवी. अशा प्रकारच्या लेखनाची पहिली प्रेरणा पैसा मिळवणे ही असेल- नव्हे असतेच. पण तो काही त्याचा शेवट नव्हे. निर्मितीचा आनंद, आत्माविष्काराने लाभणारी तृप्ती, इतरांशी संवाद साधण्याची निकड हीच अशा लेखनाची खरी प्रेरणा, खरे पारितोषिक आहे. कवितेच्या खालोखाल ललितलेख हा माझा आवडता वाङ्मयप्रकारआहे. त्याचेही कारण हेच असावे. कारण कविता लिहिताना जे समाधान मला मिळते तीच तृप्ती या ललित लेखनानेही अनेकदा मला दिली आहे.

  1. खालील प्रश्नांची उत्तरे योग्य पर्याय निवडून लिहा(3)  
    1. लेखिकेच्या लेखनात कोणत्या विषयाचा अभाव आहे?   
      1. तत्कालिक घटना
      2. राजकारण आणि समाजकारण
      3. निसर्ग
      4. बालपणच्या आठवणी
    2. कोणते लेखन शाश्वत नसते?   
      1. वृत्तपत्रातील सदर
      2. ललित लेख
      3. निसर्गपर लेखन
      4. कविता
    3. 'शाश्वत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे....  
      1. चिरकाल
      2. चिरंतन
      3. चिरायु
      4. क्षणिक
  2. पुढील प्रश्नांची 15/20 शब्दांत उत्तरे लिहा.  (4)      
    1. ललितलेखनासाठी कोणते गुण आवश्यक असतात?   
    2. ललित लेखनाच्या खऱ्या प्रेरणा कोणत्या? 
  3. पुढीलपैकी एका प्रश्नाचे उत्तर सुमारे 40/45 शब्दांत लिहा.  (3)
    1. वृत्तपत्रात सदर चालवणे काही लेखकांना कमीपणाचे का वाटते?
Concept: undefined - undefined
Chapter:
[5]2

खालील कविता वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

अन्याय घडो कोठेही
चिडून उठू आम्ही,
घाव पडो कोठेही
तडफडू आम्ही.
हाल पाहून हळहळू
होवोत कोठेही,
पिळणूक पाडील पीड आम्हा
असो कुणाचीही.
वजन आमच्या छातीवर
पायातल्या बेड्यांचे दासांच्या,
वळ पाठीवर आमच्या
चाबूक उठो कुठेही.
अवघ्या अभाग्यांचे अश्रू
उभे आमच्या डोळ्यात,
दुःखितांच्या वेदनांच्या
कळा उरात आमच्याही.
संवेदना साऱ्या जगाची
हृदयात आहे भरभरून,
नाते नवीन असे काही
जोडून आहोत आम्ही
मानव तेही मानव आम्ही.
  1. खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायामधून निवडून लिहा.   (2)
    1. कवी कशाने हळहळतो?
      1. दुसऱ्याचे सुख पाहून
      2. प्रेम पाहून
      3. मानवता पाहून
      4. दुसऱ्याचे हाल पाहून
    2. कवीने प्रत्येक हृदयाशी कोणते नाते जोडले आहे?
      1. मित्रत्वाचे
      2. मानवतेचे
      3. शत्रुत्वाचे
      4. गुलामाचे
  2. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.   (3)   
    1. कवी छातीवर कशाचा भार पेलतो?
    2. कवीच्या डोळ्यात कोणाचे अश्रू उभे आहेत?
    3. कवीच्या पाठीवर कशाचे वळ उठतात?
Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग B : लेखन (15)
[10]3 | खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 300 ते 325 शब्दांत निबंध लिहा.
[10]3.A

खालील विषयावर 300 ते 325 शब्दांत निबंध लिहा.

आजच्या विद्यार्थ्यांचे मनोगत

(आजचा विद्यार्थी ______ त्याचे ध्येय ______ शैक्षणिक वातावरण ______ शिक्षक व शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन ______ आपले आदर्श ______ माता-पित्याचा मानसिक दबाव ______ जीवनमूल्यांवर निष्ठा प्रयत्न इ.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]3.B

खालील विषयावर 300 ते 325 शब्दांत निबंध लिहा.

मी पाहिलेले मराठी साहित्य संमेलन

(संमेलन बघण्याचा योग ______ कार्यक्रमाची रुपरेषा ______ आनंदोत्सव ______ पुस्तकातील लेखक. कवी यांचे दर्शन/भेट ______ कवीसंमेलन ______ वैचारिक उद्गोधन ______ पुस्तकांच्या स्टॉल्सना भेट ______ निरोपाचा दिवस ______ अविस्मरणीय क्षण ______ इ.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]3.C

खालील विषयावर 300 ते 325 शब्दांत निबंध लिहा.

राष्ट्रीय विकासात युवकांची भूमिका

(आजची युवा ______ देशाचा आधारस्तंभ ______ राष्ट्र विकासाची कल्पना ______ त्याच्यापुढील आव्हाने सामाजिक राजकीय परिस्थिती ______ जन्मदात्री आई व जन्मभूमी यांचे स्थान ______ ध्येय निश्चिती त्यासाठी प्रयत्न ______ चांगले आदर्श निर्माण करणे ______ इ.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]3.D

खालील विषयावर 300 ते 325 शब्दांत निबंध लिहा.

जगातील पेट्रोल संपले तर ...

(अनेक क्षेत्रात वापर ______ पेट्रोलवर आधारित उद्योगधंद्यांना खीळ ______ वाहनांची गर्दी कमी ______ शेतीवर परिणाम ______ शेतीची साधने ______ कीटकनाशके ______ जंतुनाशके निर्मिती ______ रस्त्यांचे डांबरीकरण इ. वर परिणाम ______ पण प्रदूषण कमी ______ पेट्रोल उत्पादक देशांची आर्थिक स्थिती ______ तेलावरून होणारी युद्धे/स्पर्धा कमी ______ जागतिक दळणवळणाची समस्या ______ पर्यायी इंधन ______ इ.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]4
[5]4.A

खालील विषयावर अंदाजे 60/70 शब्दांत लिहा.

तुमच्या शाळेत 27 फेब्रुवारीला साजरा झालेल्या 'मराठी भाषादिन' या कार्यक्रमाचा अहवाल लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
किंवा
[5]4.B

खालील विषयावर अंदाजे 60/70 शब्दांत लिहा.

'शेतकऱ्याच्या वाढत्या आत्महत्या' यासंबंधी एक वृत्तलेख लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग C : व्याकरण (25)
[25]5 | सूचनांप्रमाणे उत्तरे लिहा. 
[3]5.A
[1]5.A.I

पुढील शब्दासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक समानार्थी शब्द लिहा.

अदब

नम्रता 

राग

हेवा 

तिरस्कार

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5.A.II

पुढील शब्दासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक समानार्थी शब्द लिहा.

कवन

कादंबरी 

काव्य

नाटक 

लेख

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]5.A.III

पुढील शब्दासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक समानार्थी शब्द लिहा.

वासरमणी

चंद्र 

सूर्य

सोने 

रत्न

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]5.B | वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. ( कोणतेही दोन)
[2]5.B.I

वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा.

प्रतिक्षण मोलाचा आहे.

कर्मधारय समास 

इतरेतर द्वंद्व

अव्ययीभाव समास 

विभक्ती तत्पुरुष समास

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]5.B.II

'जीवनशैली' या सामासिक शब्दाचा समास आहे:

अव्ययीभाव समास 

कर्मधारय समास 

द्वंद्व समास 

विभक्ती तत्पुरुष समास

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]5.B.III

यापैकी कोणते पद द्रंद्र समास आहे?

यथाप्रमाण 

सूर्यास्त

झुणकाभाकर 

माहितीपत्रक

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]5.B.IV

यापैकी कोणते पद कर्मधारय समास आहे?

पांढराशुभ्र

मित्रमैत्रिणी

निसर्गसौंदर्य 

वृत्तपत्र

Concept: undefined - undefined
Chapter:
[6]5.C | पुढील वाक्यांचा सूचनेनुसार प्रयोग ओळखा किंवा बदला. (कोणतेही 3)
Advertisements
[2]5.C.I

कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते ते लिहा.

त्यांनी आम्हाला दृकश्राव्य दालनात नेले.

डॉक्टरांनी दात काढला.

विंचू डंख मारतो.

दातांनी माणसाला काय दिले आहे?

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]5.C.II

'आभाळाने तापल्या धरणीला शांत केलं'. या वाक्याचा प्रयोग आहे-

कर्तरी प्रयोग

भावे प्रयोग

भाव कर्तरी

कर्मणी प्रयोग

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]5.C.III

सैनिक शत्रूला रोखतात. (भावे प्रयोग करा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]5.C.IV

मी हलकेच खिडकी उघडतो. (कर्मणी प्रयोग करा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
[6]5.D | वाक्य प्रकार ओळखा किंवा सूचनेनुसार वाक्यप्रकार बदला. (कोणतेही 3)
[2]5.D.I

पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.

सुट्टी मिळाली का?

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]5.D.II

पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.

शिक्षणाचा आनंद कधी संपत नाही.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]5.D.III

'किती मनापासून हसतात ती लहान मुलं !' - या वाक्याचे विधानार्थी वाक्य आहे.

ती लहान मुलं खूप मनापासून हसतात.

ती लहान मुलं मनापासून हसतात का?

त्या लहान मुलांनी खूप मनापासून हसावे.

लहान मुलांनो, मनापासून हसा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]5.D.IV

'पावसाने काय कमी नुकसान झाले का?' याचे होकारार्थी वाक्य असेल-

किती नुकसान केले या पावसाने !

पावसाने खूप नुकसान झाले.

पावसाने काहीच लाभ मिळाला नाही.

पावसाने खूप नुकसान होऊ नये.

Concept: undefined - undefined
Chapter:
[6]5.E | पुढे काही वाक्ये दिली आहेत. त्या वाक्यांत कंसात दिलेल्या वाक्प्रचारांपैकी योग्य त्या वाक्प्रचाराचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा. (कोणतेही तीन)
[2]5.E.I

पुढील वाक्यात पर्यायांत दिलेल्या वाक्प्रचारांपैकी योग्य त्या वाक्प्रचाराचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

पंडित महोदयांचे नवतरुणाने गर्वहरण केले.

मर्दुमकी गाजवणे

दातखीळ बसणे

शंख करणे

चारी मुंड्या चीत होणे

नक्षा उतरवणे

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]5.E.II

पुढील वाक्यात पर्यायांत दिलेल्या वाक्प्रचारांपैकी योग्य त्या वाक्प्रचाराचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

शे-सव्वाशे मावळ्यांच्या पराक्रमापुढे मुघलांची बलाढ्य सेनाही पराभूत झाली.

मर्दुमकी गाजवणे

दातखीळ बसणे

शंख करणे

चारी मुंड्या चीत होणे

नक्षा उतरवणे

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]5.E.III

पुढील वाक्यात पर्यायांत दिलेल्या वाक्प्रचारांपैकी योग्य त्या वाक्प्रचाराचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

या युद्धात हंबीररावांनी खूप मोठा पराक्रम केला.

मर्दुमकी गाजवणे

दातखीळ बसणे

शंख करणे

चारी मुंड्या चीत होणे

नक्षा उतरवणे

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]5.E.IV

पुढील वाक्यात पर्यायांत दिलेल्या वाक्प्रचारांपैकी योग्य त्या वाक्प्रचाराचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

ती अवाढव्य काळी आकृती पाहून उषाकाकूला खूप भीती वाटू लागली.

मर्दुमकी गाजवणे

दातखीळ बसणे

शंख करणे

चारी मुंड्या चीत होणे

नक्षा उतरवणे

Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग D : गद्य-पद्य पाठ आणि उपयोजित लेखन (25)
[12]6 | गद्य-पाठांधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
[2]6.A | योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. (कोणतेही दोन)
[1]6.A.I

आनंदी आयुष्यासाठी सोपे तत्त्व म्हणजे ______.

पुस्तके वाचा.

यश, वैभव मिळावा.

आपल्या आवडीचे काम निवडा.

आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]6.A.II

विजयस्मारक ______ आहे.

लडाखमध्ये 

टायगर हिलवर

पॅन्गोग लेकवर

तोलोलिंगच्या पायथ्याशी

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]6.A.III

बापू गुरुजींच्या गावाला कोणता 'मान' भेटला होता?

साजरं गाव

वाननदीचा गाव

प्रमुख गाव

वीर गाव

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]6.B | पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची प्रत्येकी सुमारे 30/40 शब्दांत उत्तरे लिहा.
[2]6.B.I

खालील प्रश्नाचं उत्तर सुमारे ३०/४० शब्दात लिहा.

मानवी देहाच्या इतर अवयवांपेक्षा दाताची कोणती वेगळी वैशिष्ठे लेखक सांगतात?

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[2]6.B.II

खालील प्रश्नाचं उत्तर सुमारे ३०/४० शब्दात लिहा.

आज गावातील प्रत्येक जण का आनंदित होता? 'गढी' पाठाधारे लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]6.B.III

खालील प्रश्नाचं उत्तर सुमारे ३०/४० शब्दात लिहा.

द्रास, कारगिल आसमंतात भाग्यश्रीला कोणता सुगंध जाणवत होता?

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]6.B.IV

खालील प्रश्नाचं उत्तर सुमारे ३०/४० शब्दात लिहा.

पाखरे आणि पहाट यांचं नातं लेखकाने कसे सांगितले आहे?

Concept: undefined - undefined
Chapter:
[6]6.C | पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे सुमारे 70/75 शब्दांत लिहा.
[3]6.C.I

खालील प्रश्नाचं उत्तर सुमारे ७०/७५ शब्दात लिहा.

यु. म. पठाण पहाटवेळी आपल्या बागेतील वेलीफुलांशी कसे रममाण झाले होते?

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]6.C.II

खालील प्रश्नाचं उत्तर सुमारे ७०/७५ शब्दात लिहा.

ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांनी लेखिकेशी बोलताना कोणते विचार व्यक्त केले?

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]6.C.III

खालील प्रश्नाचं उत्तर सुमारे ७०/७५ शब्दात लिहा.

शिवराज गोर्ले यांच्यामते वाचनाचा आनंद कसा असतो?

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]7
[2]7.A | पद्य पाठांच्या आधारे योग्य पर्याय निवडून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
[1]7.A.I

कवी आषाढातील मेघांना थांबायला सांगत आहे, कारण ______.

हे आषाढघन थांबले नाहीत तर पूर येईल.

आषाढातील पाऊस थांबला तर शेतातील कामे करता येतील.

या आषाढघनांमुळे निर्माण झालेले निसर्गसौंदर्य डोळे भरून पहायचे आहे.

या आषाढातील पावसाचा कंटाळा आला आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]7.A.II

कवी सुरेश भट यांना ______ झळा लागतात.

दुःखाच्या 

सावल्यांच्या

उन्हाच्या 

शत्रूच्या

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]7.A.III

कामक्रोध विंचू चावला ______ घाम अंगासी आला ||

खूप

मम

तम

दारूण

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]7.B | कोणत्याही दोन प्रश्नांची सुमारे 35/40 शब्दांत उत्तर लिहा.
[2]7.B.I

खालील प्रश्नाचे सुमारे 35/40 शब्दांत उत्तर लिहा.

आरशातील स्त्रीचे पूर्वरूप कसे होते?

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]7.B.II

खालील प्रश्नाचे सुमारे 35/40 शब्दांत उत्तर लिहा.

कवी सुरेश भट 'माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी' असे का म्हणतात?

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]7.B.III

खालील प्रश्नाचे सुमारे 35/40 शब्दांत उत्तर लिहा.

'रोज मातीत' या कवितेतील शेतकरी स्त्री कोणकोणती कामे करते?

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]7.C | पुढीलपैकी एका काव्यपंक्तीचा भावार्थ सुमारे 60/70 शब्दांत लिहा.
[4]7.C.I

पुढील काव्यपंक्तीचा भावार्थ सुमारे 60/70 शब्दांत लिहा.

कोमल पाचूंची ही शेतें
प्रवाळमातीमधली औते
इंद्रनीळ वेळूंची बेटें
या तुझ्याच पदविन्यास खुणा.

Concept: undefined - undefined
Chapter:
किंवा
[4]7.C.II

सत्त्व उतारा देऊन |
अवघा सारिला तमोगुण |
किंचित् राहिली फुणफुण |
शांत केली जनार्दनें ||
वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]8
[3]8.A

पुढील प्रश्नाचे ५०/६०  शब्दांत उत्तर लिहा.

माहितीपत्रकाचे स्वरूप सांगून याची गरज का असते ते लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
किंवा
[3]8.B

पुढील प्रश्नाचे 50/60 शब्दांत उत्तर लिहा.

मुलाखतीचा समारोप कसा असावा?

Concept: undefined - undefined
Chapter:

Other Solutions




































Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

CBSE previous year question papers Class 12 Marathi with solutions 2024 - 2025

     CBSE Class 12 Marathi question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our CBSE Class 12 Marathi question paper 2025 serve as a catalyst to prepare for your Marathi board examination.
     Previous year Question paper for CBSE Class 12 Marathi-2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Marathi, you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of CBSE Class 12.

How CBSE Class 12 Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×